जब Friendship met Love: भाग 2 (RomCom)

Written by

आम्ही खडकवासल्याल्या पोहोचल्यावर love birds नेहमीप्रमाणे आपल्याच गप्पांमध्ये लपले होते. तर राधिका आणि मी एका दगडावर बसलो होतो. मी अजूनही वैतागलेले होते तर राधिका नेहमीप्रमाणे शांत होती. आमच्यातली शांतता भंग करत तिने मला विचारले,

“विवान कसा मुलगा आहे?”

मी थोडावेळ विचार करत बसले आणि मग म्हणाले,

“तो खूप वेगळाच वाटतो मला म्हणजे he is like complete man ‘Raymond’ types..तो खूप mature आहे पण सोबतच fun loving पण आहे. जसं बघं. आम्ही दोघेही किती वेगळे आहोत.मला कुठलेच life goals नाहीत पण तो त्याच्या futureबद्दल खूप clear आहे तरिही तो माझ्यावर खूप प्रेम करतो. म्हणजे मी पण त्याच्यासारखं असावं,  वागावं, ही त्याची इच्छा नसते. तो मला आयुष्य कसं जगावं ह्याबद्दल शिकवतो, अभ्यासात पण मदत करतो. त्याच्यामुळेच तर कशीबशी मी परीक्षेत पास होतेय. तर असा आहे तो,  कधी कधी मी त्याला गमतीत           ‘गुरुजी’ तर कधी ‘Raymond’  तर कधी शिव्याही मारते. त्याला भेटल्यावर मला असं वाटलं की माझ्यातलं काहीतरी missing होतं ते मला मिळालं..He completes me.आता मी माझ्या आयुष्याची त्याच्याविना कल्पनाच करू नाही शकतं.”

मला माहिती नाही की मी तिथल्या रम्य वातावरणामुळे अथवा नैसर्गिक सौंदर्यामुळे किंवा विवानच्या विचारांमुळे पण थोड्यावेळाने मी एकदम शांत आणि relax झाले. 

परत थोड्या शांततेनंतर “I think you love him..”

मी त्यावर राधिकाला म्हणाले, “Of course, I love him कारण तो माझा मित्र आहे.” 

“मित्र आहे म्हणून नाही Dumbo.. हे प्रेम वेगळ्याप्रकारचं आहे जसं लैला-मजनू,  Romeo-Juliet मधे होतं तसं प्रेम..म्हणून तू त्याला दुसऱ्या मुलीसोबत बघू शकतं नाही आहेस आणि jealous होते आहेस..”

“What nonsense! काहीही…”

“हो, वीरु. हे तसंच प्रेम आहे. तुला ही feeling कळतं नाहीये कारण तू मूर्ख आहेस..बरं मला सांग, तुला त्याची चांगली अथवा वाईट सवयी ह्या दोन्हीही गोष्टी आवडतात की नाही? तू एक दिवस तरी त्याच्याशिवाय, त्याच्याशी न बोलता घालवू शकतेस का? एक दिवस तूझ्याऐवजी तो दुसऱ्या मुलीला priority देईल,  हे तू accept करू शकतेस का? कधीकधी तो तूझ्या आजूबाजूला जरी नसला तरिही तू त्याचा विचार करणं थांबवू शकतेस का?”

“मी तिच्या प्रत्येक प्रश्नाचे मनातल्या मनात उत्तर देत गेले आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी कुठल्यातरी  प्रश्नांचे उत्त्तर थोडीही confuse न होता देऊ शकले. असं exam hall मधे paper उत्तर लिहितांना मला जमलं असतं तर किती बरं झालं असतं ना..प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासोबत का कुणास ठावूक पण मी खूप emotional होत गेले आणि व्या व्या करत रडायला लागले..

“व्या व्या ! आता मी काय करू राधिका? व्या व्या ! माझं पण त्या कुछ कुछ होता है सिनेमातल्या अंजलीसारखं झालंय..मेरा पहला प्यार अधुरा रह गया राधिका..व्या व्या ! आता मी पण ह्या दोघांच्या लग्नात रणबीर कपूर सारखं, ‘अच्छा चलता हूँ..दुवाओ में याद रखना गाणार..व्या व्या !व्या व्या !”

“मूर्खासारखी फालतू  बडबड करू नकोस आणि हे असं तोंड वासून रडणं थांबव आधी..”

“मग काय करू मी आता?” मी माझे डोळे पुसत , हुंदके देत म्हणाले.

“जा त्याच्याजवळ आणि सांग त्याला..”

“पण तो मला girl समजतो की नाही हे ही मला माहिती नाही मग तो मला as a girlfriend कसं imagine करू शकेल?आणि ह्या कायरटलीच्या बच्चीच काय करू?..”

“आधी शांत हो. थोडी relax हो आणि मग त्याला सांगायला जा पण आत्ताच.मी त्या कायराचा काहीतरी बंदोबस्त करते.”

राधिकाने काहीतरी जुगाड करून मुंगळ्यासारखी विवान नावाच्या गुळाला चिटकलेल्या त्या Miss. ऊलाला ला वेगळं केल आणि मला आणि विवानला बोलायला एकट सोडलं.आता मी आणि विवान एकमेकांसमोर उभे होतो. मला कळतं नव्हतं कुठून सुरुवात करू म्हणून मी,

“मला तुला काहीतरी सांगायचं आहे, विव..”फक्त येवढेच बोलले.

आणि नंतर मी काहीतरी बोलणार ही वाट बघत तो माझ्याकडे एकटक बघत राहिला.पुढच्याच क्षणाला परत मला रडवेसे वाटले पण मी स्वतःला कसेबसे सावरले. 

विवान आतुरतेने म्हणाला, “वीरु, बोल काहीतरी..”

“त्या stupid bitch कायरासोबत लग्न करू नकोस.” मी एवढच कसंबस बोलू शकले.

“मी तिच्यासोबत लगेच काही लग्न नाही करणार आहे. ती सध्या फक्त माझी girlfriend आहे. कदाचित एके दिवशी करेलही पण ते बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. आमचं किती जुळतंय त्यावर ते सगळं ठरेल पण ती bitch नाही.please, dont use such a bad word for her.”

“No. I mean..I think.. तू तिच्यासोबत ब्रेकअप कर..”

विवान नेहमीप्रमाणे गोड हसत शांततेने म्हणाला,

“आणि मी तसं का करू?  सध्यातरी breakup करण्यासारखं असं काहीच कारण नाही आहे.”

“कारण..कारण..हां..कारण मला ती आवडतं नाही.”

“पण मला ती आवडते.”मी परत थोडावेळ स्तब्ध झाले.

विवान परत मला म्हणाला, “वीरु तुला काय बोलायचं ते स्पष्टपणे सांग. मला अजूनही तुझा मुद्दा कळलेला नाहीये.”

“Okay ..Okay.. हे बघं मला हे सगळं कसं सांगतात माहिती नाही,  in fact मला कोणतीच गोष्ट कशी करावी ते कळतं नाही..मला देवदासचा female version बनायचं नाहीये. मला दारू पिऊन तूझ्या लग्नात, ‘ तू प्यार है किसी और का तुझे चाहता कोई और है..’ हे गाणं गायचं नाहीये..मला तूझ्या friendzone मधे नेहमीसाठी पडायचं नाहीये..मी तुला दुसऱ्या कुठल्याच मुलीसोबत बघू शकत नाही. मला नेहमीसाठी तूझ्यासोबत रहायचं आहे..forever..”आणि परत माझ्या डोळ्यांतून अश्रू वहायला लागले.

तो माझ्या जवळ आला,  माझा चेहरा त्याने एकदम नाजूकपणे, प्रेमाने त्याच्या ओंजळीत घेतला आणि माझ्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले..Oh my God ! ती जगातली सगळ्यात सुंदर भावना होती..थोडावेळ सगळ्याच गोष्टींचा विसर पडला. सगळं जग थांबल्यासारखं वाटलं असं वाटलं की कुणीच अस्तित्वात नाही आहे. फक्त आम्ही दोघेच तिथे आहोत असे वाटत होते.. पण काय होतं त्याच्या मनात अजूनही कळत नव्हतं.. Was  it A kiss of love or friendship?

शेवटी मी माझं प्रेम confess केलंच पण त्याला काय वाटतंय हे अजूनही मला ठाऊक नव्हतं.

विवान हसत हसत म्हणायला लागला, “तुला माहिती नाही वीरु पण तू मला तूझ्या प्रेमाची कबुली देत आहेस,  असं मी बऱ्याचदा imagine केलंय. पण हे फारच unique होतं. हे तुझं प्रपोज़ करणं खूप मजेशीर आणि थोडं stupid होतं but I liked it a lot..हे खूप cute होतं..”

तो काय बोलत होता मला काही कळतंच नव्हतं. मी थोडावेळ त्याच्याकडे बघतच राहिले.

“मला सुद्धा बऱ्याच दिवसांपासून तुझ्याबद्दल तेच वाटतंय जे तुला आता माझ्याबद्दल..मला माहिती होतं की तुझं पण माझ्यावर प्रेम आहे पण मला ते तूझ्या तोंडून ऐकायचं होतं , तूझ्या style मधे.. आणि तुला स्वतःहून ते जाणवू द्यायचं होतं म्हणून मी कधी ते व्यक्त केले नाही..कायरा माझी girlfriend नाही. ती माझ्या एका मित्राची मैत्रीण आहे.. ती फक्त मला मदत करत होती. तुझे क्या लगा, मोटु? prank सिर्फ तू ही कर सकती है..” आणि तो मोठ्याने हसू लागला..

मला हसावे की रडावे  की रागवावे तेच कळतं नव्हते. मी खोट्या रागाने त्याला स्वतःपासून दूर ढकलले पण त्याने परत मला त्याच्या जवळ ओढले..मी नुसतेच हसले, आणि मी त्याच्या डोळ्यांत बघितले तेव्हा त्याच्या डोळ्यांत फक्त मीच दिसले आणि सोबतच त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहणारा आनंद दिसला. असं वाटलं की आता काहीतरी घडणार तेवढ्यात त्याने त्याचे ओठ माझ्या ओठांवर टेकवले..

“Wow! ” तो म्हणाला.

मला वाटलं त्याला ते kiss आवडल..माझं पहिलं kiss इतकं perfect होतं म्हणून तो wow म्हणाला असावा.

आणि मग म्हणाला, “ह्या kiss वरून मला हे कळलंय की आता मला तुला kiss करणे सुद्धा शिकवावे लागणार..” परत मोठमोठ्याने हसायला लागला..

मी त्याला ठोशे मारत त्याच्यावर “साले,  beep, beep, beep..” अश्या शिव्यांचा वर्षाव केला.

“का देवा का? मी तुला नाजूक, सौज्वळ girlfriend मागितली होती आणि तू मला असला सैतान, मारकूट्या boyfriend दिलास..” असं म्हणून तो मला चिडवू लागला..

“Go to hell..I hate you..” मी ओरडून म्हणाले.”Okay.okay..first timer च्या हिशोबाने इतकं वाईट पण नव्हतं..”

अजूनही तो हसतच होता..मी अजूनही रागावली असल्याच नाटक करतं होते पण मनातून हसत होते आणि विवान हसत होता माझ्या डोळ्यांत…that’s how our friendship met love…forever.. ??

समाप्त..

कथा वाचल्या खूप खूप धन्यवाद..तर मित्रमैत्रिणींनो,

प्रेम करताय ना करायलाच पाहिजे..

कधी प्रेम तर कधी रुसवेफुगवे..

कधी हुशारी तर कधी वेंधळेपणा..

करतं राहाल की आयुष्याची खरी मजा येते..

हसत रहा आणि कथा आवडली असेल तर like , comment आणि share सोबतच मला follow करायला विसरू नका..

  © 2017 Nisha Adgokar Rase

All rights reserved. No part of this publication may be reproduced, distributed, or transmitted in any form or by any means, including printing , photocopying, recording, or other electronic or mechanical methods, without the prior written permission of the writer, except in the case of brief quotations embodied in critical reviews. For permission requests, contact the writer Nisha Adgokar Rase on [email protected]
आम्ही खडकवासल्याल्या पोहोचल्यावर love birds नेहमीप्रमाणे आपल्याच गप्पांमध्ये लपले होते. तर राधिका आणि मी एका दगडावर बसलो होतो. मी अजूनही वैतागलेले होते तर राधिका नेहमीप्रमाणे शांत होती. आमच्यातली शांतता भंग करत तिने मला विचारले, "विवान कसा मुलगा आहे?" मी थोडावेळ विचार करत बसले आणि मग म्हणाले, "तो खूप वेगळाच वाटतो मला म्हणजे he is like complete man 'Raymond' types..तो खूप mature आहे पण सोबतच fun loving पण आहे. जसं बघं. आम्ही दोघेही किती वेगळे आहोत.मला कुठलेच life goals नाहीत पण तो त्याच्या futureबद्दल खूप clear आहे तरिही तो माझ्यावर खूप प्रेम करतो. म्हणजे मी पण त्याच्यासारखं असावं,  वागावं, ही त्याची इच्छा नसते. तो मला आयुष्य कसं जगावं ह्याबद्दल शिकवतो, अभ्यासात पण मदत करतो. त्याच्यामुळेच तर कशीबशी मी परीक्षेत पास होतेय. तर असा आहे तो,  कधी कधी मी त्याला गमतीत           'गुरुजी' तर कधी 'Raymond'  तर कधी शिव्याही मारते. त्याला भेटल्यावर मला असं वाटलं की माझ्यातलं काहीतरी missing होतं ते मला मिळालं..He completes me.आता मी माझ्या आयुष्याची त्याच्याविना कल्पनाच करू नाही शकतं." मला माहिती नाही की मी तिथल्या रम्य वातावरणामुळे अथवा नैसर्गिक सौंदर्यामुळे किंवा विवानच्या विचारांमुळे पण थोड्यावेळाने मी एकदम शांत आणि relax झाले.  परत थोड्या शांततेनंतर "I think you love him.." मी त्यावर राधिकाला म्हणाले, "Of course, I love him कारण तो माझा मित्र आहे."  "मित्र आहे म्हणून नाही Dumbo.. हे प्रेम वेगळ्याप्रकारचं आहे जसं लैला-मजनू,  Romeo-Juliet मधे होतं तसं प्रेम..म्हणून तू त्याला दुसऱ्या मुलीसोबत बघू शकतं नाही आहेस आणि jealous होते आहेस.." "What nonsense! काहीही..." "हो, वीरु. हे तसंच प्रेम आहे. तुला ही feeling कळतं नाहीये कारण तू मूर्ख आहेस..बरं मला सांग, तुला त्याची चांगली अथवा वाईट सवयी ह्या दोन्हीही गोष्टी आवडतात की नाही? तू एक दिवस तरी त्याच्याशिवाय, त्याच्याशी न बोलता घालवू शकतेस का? एक दिवस तूझ्याऐवजी तो दुसऱ्या मुलीला priority देईल,  हे तू accept करू शकतेस का? कधीकधी तो तूझ्या आजूबाजूला जरी नसला तरिही तू त्याचा विचार करणं थांबवू शकतेस का?" "मी तिच्या प्रत्येक प्रश्नाचे मनातल्या मनात उत्तर देत गेले आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी कुठल्यातरी  प्रश्नांचे उत्त्तर थोडीही confuse न होता देऊ शकले. असं exam hall मधे paper उत्तर लिहितांना मला जमलं असतं तर किती बरं झालं असतं ना..प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासोबत का कुणास ठावूक पण मी खूप emotional होत गेले आणि व्या व्या करत रडायला लागले.. "व्या व्या ! आता मी काय करू राधिका? व्या व्या ! माझं पण त्या कुछ कुछ होता है सिनेमातल्या अंजलीसारखं झालंय..मेरा पहला प्यार अधुरा रह गया राधिका..व्या व्या ! आता मी पण ह्या दोघांच्या लग्नात रणबीर कपूर सारखं, 'अच्छा चलता हूँ..दुवाओ में याद रखना गाणार..व्या व्या !व्या व्या !" "मूर्खासारखी फालतू  बडबड करू नकोस आणि हे असं तोंड वासून रडणं थांबव आधी.." "मग काय करू मी आता?" मी माझे डोळे पुसत , हुंदके देत म्हणाले. "जा त्याच्याजवळ आणि सांग त्याला.." "पण तो मला girl समजतो की नाही हे ही मला माहिती नाही मग तो मला as a girlfriend कसं imagine करू शकेल?आणि ह्या कायरटलीच्या बच्चीच काय करू?.." "आधी शांत हो. थोडी relax हो आणि मग त्याला सांगायला जा पण आत्ताच.मी त्या कायराचा काहीतरी बंदोबस्त करते." राधिकाने काहीतरी जुगाड करून मुंगळ्यासारखी विवान नावाच्या गुळाला चिटकलेल्या त्या Miss. ऊलाला ला…

User Rating: 3.98 ( 3 votes)
0
Article Tags:
· ·
Article Categories:
प्रेम · मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा