जय जय विठ्ठल… जय हरी विठ्ठल…!

Written by

जय जय विठ्ठल… जय हरी विठ्ठल…!

” विठ्ठल… ओ विठ्ठल….ओ धनी…!”
त्याची रुखमा त्याला आवाजच देत होती…
पण कुठं ऐकायला जात त्याला…रागात ,मनानं खचून रणरणत्या उन्हात खूप दूर निघून गेला होता तो…!

विठ्ठल…पंढरपूरचा गावाजवळील राहणारा एक शेतकरी… खूप विश्वास त्याचा त्याच्या विठ्ठलावर… काहीही झालं तरी विठ्ठल त्याची साथ सोडणार नाही हे ठाऊक होत त्याला…! त्याच मन सदा त्याच्या भक्तीत रमत असे. शेतात दिवसभर राबल्यावर सांजेला देवळात जाऊन त्याच्या विठ्ठलाचा ठाई तो बसे. त्याच्या गावात वारी पोहोचतच टाळ, मृदंगाच्या नादात तन मन धनाने तो ही आषाढ एकादशीच्या वारीत सामील होत असे.

आपल्या जीवनातील वाट ,आपली अपूर्णता, आपले दोष , मिळालेला सदाचाराचा मार्ग ,माफक गोष्टीकडे वळणारे आपलं मन, ह्या विश्वात आपल्या थितेपणाची जाणीव, ह्या अखंड विश्वाची विशालता ह्यांचा अर्थ मिळाल्या शिवाय परमार्थ भेटायचा नाही, तोच शोधायला तो विठ्ठल वारीला जात…

सगळं कस सुरळीत चाललं होतं. त्याच्या कष्टाच त्याला दरमहा त्याला भरगोस पीक मिळतं होत. त्याच शेत हिरवळीने फुललेलं असायचं. त्याचा पिकातला पहिला वाटा हा विठ्ठलालाच अर्पण व्हायचा.

ह्यातच अचानक दुष्काळी सावट गावावर यायला लागलं. पावसाचा कुठेही नामोनिशाण नव्हता. सगळ्या जमिनी ओस पडायला लागल्या होत्या. कोणतही पीक जमिनीत पाण्याअभावी येत नव्हतं. गावकऱ्यांवर अगदी मरणाची वेळ येऊन ठेपली होती. घरात अन्नाचा एक कण देखील नसल्या मध्येच जमा होत. शेतकरी कर्जबाजारी झाले. हताश होऊन सगळे स्वतःला संपविण्याचा मार्गावर लागले . त्यात विठ्ठलही काही वेगळा नव्हता.

” असं कसं करू शकतो विठ्ठल आपल्या संग..?”

मनात हजारो प्रश्न घेरा करून बसले होते.
हळूहळू त्याच्या विठ्ठलावर असलेल्या त्याचा अघाड विश्वास कुठेतरी ढासळत होता. आणि त्यानेही आपल्याला संपविण्याचा निर्णय घेत घरातून पाय काढता घेतला . त्यात त्याची पत्नी रुखमा त्याला थांबविण्याचा पुरेपूर प्रयत्नात त्याचा मागे धावत होती.

” आर धनी ,असं रागा करुन काय मिळणार आहे. हार मानून कसं चालायचं. तुझा विठ्ठलात खूप वात्सल्य आहे बघ… ज्याच्यासाठी सर्व सृष्टी समान आहे ,तो सर्वांना समान सावलीत ठेवतो त्यावर कसला रे त्रागा…परिक्षा घेतो आहे बघ त्याच्या भक्तांची. स्वतःला त्याचा भक्त म्हणून घेतो, पण मग अस कुठे निघाला झपझप पावलांनी ..?”

असे म्हणत रुखमाने त्याला खूप थांबून ठेवण्याचा प्रयत्न केला …पण नकळत डोक्यात गेलेला विठ्ठलावर असलेला राग शांत झाला नव्हता. आपल्याला विठ्ठलाने का दुःखाच सावट आणलं म्हणून बघता बघता तो पंढरपूरचा विठ्ठलाच्या वारीजवळ येऊन पोहोचला होता.

जय जय विठ्ठल… जय हरी विठ्ठल…!”

“ज्ञानबा तुकाराम ..ज्ञानबा तुकाराम ....”

असे अनेक नामाचे गजर त्याच्या कानावर पडले आणि तो भानावर आला. वाटेत वारकरी अगदी तल्लीन होऊन नाचत ,गात विठ्ठलाचा जप करीत होते.

कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही… देवाच्या दरबारात सर्व भक्त समान. हेच त्याच्या नजरेने धिरले. तहान भूक विसरुन फक्त भक्तीत तल्लीन झालेले वारकरी दिसले.

अनेक लोक जे कधीचे भुकेले ,उपाशी आहेत अशांनी सुद्धा ‘पंढरीची वारी ‘ धरली होती. पोटभरुन खायला तरसलेले हजारो चेहरे त्याच्या डोळ्यादेखत सरकत होते.

वाटेत उभा असतांना पोळीचा एक तुकडा खाली पडला आणि तो विठ्ठलाने पाहिला. तो खाणारच इतक्यात मागून एका लेकराची भुकेने तळपती हाक त्याच्या कानी आली आणि तिथेच त्याच्या अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो पोळीचा तुकडा उचलून विठ्ठलाने त्या लहानग्या लेकराला दिला आणि ढसाढसा तो तिथेच रडू कोसळला..

पाऊस येत नाही म्हणून आपल्या विठ्ठलावर आपण रागावलो आणि त्याच विठ्ठलाने आपल्या ला आपली चूक निर्देशनास आणून दिली.

जगात फक्त आपलंच दुःख मोठं आहे असा गोड गैरसमज त्यांनी दूर केला. असे कितीतरी लोक आहे ज्यांना डोक्यावर झप्पर नाही , दोन वेळ जेवायला ही किती मरमर करावी लागते. पण म्हणून सगळे देवाला दोष देत नाहीत. आपल्याला नशिबाने ते दिले आहे.

जगात कोणताही द्रवाचा प्रवाह वरून खाली येतो. नद्यांचा उगम देखील वरूनच. पण जेव्हा हा प्रवाह खालून वर जातो म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधारातून प्रकाशाकडे, विरोधातून विकासाकडे तेव्हा हा मार्ग सत्संगती घडवून आणणारा असतो , ह्यात आनंद, दुःख, सत्य असत्य असे अनेक पडाव येतात पण कोणताही मार्ग शोधण्यासाठी विवेक हा आवश्यक असे ह्यात दुवा नाही.

हे विठ्ठलाला कळून चुकले. स्वतःचे काही बरेवाईट करण्याआधीच विठ्ठलाने त्याला मार्ग दाखविला होता. वारीत आपल्या हातून झालेली पाप धुतली जात नसेल ,पण चालतांना वाट्यास येणार ऊन ,पाऊस ,सावली देणारे ढग ,भेटणारा निर्सग ह्या द्वारे सर्वोच्च शक्तीशी जोडणं त्याला सोप जाणवलं.

हे जाणत विठ्ठलाने आपल्या रुखमाचा हात धरत आषाढ एकादशीच्या पंढरीच्या वारीत “जय जय विठ्ठल… जय हरी विठ्ठल…!” टाळ मृदंगाच्या तालावर सुरेल नाद करीत स्वर्गीय आनंद मिळविला…

मैत्रिणिंनो, देव भावाचा भुकेला असेल तरी, त्याला जिंकण्याचा मार्ग सुद्धा त्याच्या पोटातूनच जातो ,असे म्हणणे वावगे ठरणार नाही….

कथा आवडल्यास तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरु नका..like करा , फ़ॉलो करा…तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत तुमची सखी…

नेहा खेडकर✍❤

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा