जशास तसं वागून तर बघा…

Written by

 

जशास तसं वागून तर बघा… ?✒️जयश्री कन्हेरे -सातपुते

“अग परी ती बॅग, सॉक्स, शुज कुठे ठेवलेस.. हे काय टिफीन बॅग पन इथेच पडली आहे.. कितीदा सांगायच ग तुला जागेवर ठेवत जा, कळत नाही का? ” रोजच्या सारख मी आजही परीला बोलले.. तीच ही ठरलेल उत्तर “नंतर ठेवते न ग… आत्ताच तर आले शाळेतून.” 

तिच्या रूममध्ये जाऊन बघते तर युनिफॉर्म बेडवर लोळत होता.. टाय बेल्ट खाली लटकलेले बघूनच माझं पुन्हा तेच वाक्य.. व परीच ठरलेल उत्तर.. तिचे खेळणे.. वस्तू काहीही सांगितले आवरायला तरी तीच तेच उत्तर ” नंतर करते न ग… माझा मूड नाही “ तिच्या या वाक्याचा कंटाळा आला होता मला.. काय कराव जेणेकरून हिला सवयी लावू शकेल..?  मारून व रागावून उपयोग नव्हता, ती आणखी हट्टीपणा करायची व माझी पण चीडचीड व्हायची… याच विचारात होते.. तितक्यात सुहास आला.. “कसला विचार करतेयस ग?”..  

तुझ्या राजकन्येचा…

“आज काय केल माझ्या पिल्लू ने?.. तु तिच्या सारखी मागे लागतेस प्रिया.. लहान आहे ग ती.. ” सुहास म्हणाला

वाटलच मला तु असचं म्हणशील मला.. अरे लहान आहे परी,पण हेच वय आहे तिला चांगल्या सवयी लावण्याचं... आता तिचा ९ वा वाढदिवस येईल.. बघता बघता किती मोठी झाली न परी… मला वाटतं तिला योग्य ते वळण लावाव.. तिला काही सांगायला गेले की तीच वाक्य ठरलेल असत.. “नंतर करते न ग आई… आता मूड नाही आहे” 

हो… ग प्रिया.. मी पण तिच्या तोंडून हल्ली हे वाक्य खुपदा ऐकल आहे.. बर मी एक सांगू का? बघ पटल तर. आपण उद्या पासून तिचच वाक्य वापरायच… अग मारून, रागावून बघीतलस न तू मग एकदा अस वागून बघायला काय जात आपल.. 

पटतय रे मला पण….

आता पण नाही आणि बिन नाही.. बस उद्या पासून “नंतर करतो.. मूड नाही माझा” चल झोप आता, उद्या परीक्षा आहे आपल्या पालकत्वाची.. बेस्ट ऑफ लक परीची आई..
सकाळी परी शाळेत गेली… सुहास पण आॅफीसला गेला.. सर्व काम आवरून मी परीची वाट बघत होते.. तोच तिच्या स्कुल बसचा हॉर्न ऐकायला आला पण मी तिला घ्यायला गेले नाही..

आई आज मला घ्यायला का नाही आलीस ग.. 

काही नाही ग माझा मूड नव्हता म्हणून नाही आले..

आई मला भूक लागली आहे. जेवायला दे न.. 
 

नंतर देते… थांब..

थोड्यावेेळाने “आई आता तर दे ग भूक लागली मला…” 

माझा मूड नाही द्यायचा… तुझ तू घे जेवण..

जेवण आणल्यावर.. आई कार्टून लावन ग.. 

माझा मूड नाही चॅनल चेंज करण्याचा.. मी

परीला काही कळेना.. मागच्या एक तासात तिने मूड नाही माझा..हे वाक्य तिनदा ऐकल होत.. जेवण करूण परी खेळणे खेळली… नंतर अभ्यासाला बसली… तिला अडचण आली… पुन्हा माझ्या कडे येवून..

“आई हे समजावून दे न ग उद्या मॅडम विचारणार आहेत”..

नंतर सांगते परी… माझा मूड नाही आता…. परी धुसफूस करतच बाकीचा अभ्यास करत बसली.. अभ्यास झाल्यानंतर बाहेर खेळायला गेली…

कस वागलो न आपण आपल्या बाळाशी… आता सुहास कस हाताळतो हे सगळ देव जाणे.. या विचारात होते तेच ६ वाजले.. सुहास आला फ्रेश होऊन हॉलमधे चहा घेत बसला.. तितक्यात परी आली…नेहमीप्रमाणे दिवसभरात जे घडल ते सांगायला सुरुवात केली.. “बाबा आज नाही का….”

सुहासने तिला थांबवत.. परी नंतर सांग… आता माझा मूड नाही ऐकण्याचा.. परी गप्प झाली.. थोड्यावेळाने…

बाबा हे मला सांगा न, आईने पण नाही सांगितल.. उद्या मॅडम विचारणार आहेत व नाही सांगितल तर शिक्षा करतील… 

परी बेटा मी थकलो ग.. नंतर सांगतो… तसही आता माझा मूड नाही..

परीचा बांध फुटला.. रडतच म्हणाली.. “काय लावल तुम्ही दोघांनी.. मूड नाही.. नंतर सांगतो,नंतर सांगते हे तुम्ही समजावून दिल नाही तर मला उद्या शिक्षा होईल न.. ??? परी रडायला लागली..

 

सुहासने तिला जवळ घेऊन शांत केल.. समजावून सांगितले की बेटा आई तुला रोज वस्तू जागेवर ठेवायला, रूम निट ठेवायला सांगते तेव्हा तू काय म्हणतेस “आई नंतर करते न ग… मूड नाही माझा..” आज आम्ही पण तेच केल, जे तुला जेव्हा पाहिजे होत तेव्हा दिल नाही व तुझ वाक्य वापरल.. किती वाईट वाटल न तुला.. आपल कुणी ऐकत नाही… मॅडम पण मारतील.. रडायला लागलीस तू… आई जे काम तुला सांगते ते तु वेळेवर करत नाही.. त्याच तिला पण वाईट वाटत न ग.. मग ती रागावते तुझ्यावर.. तु जर त्याच वेळेस केलस तर आईला पण छान वाटेल न.. व महत्वाचे म्हणजे तुला नीटनेटके पणाची सवय पण लागेल… सकाळी त्या वस्तू शोधण्यासाठी आईची जी धावपळ होते ती होणार नाही.. आई सुध्दा थकते न ग….. 

माझी परी बाबांच बोलण अगदी शांतपणे व समजदार मुलासारखे ऐकत होती… मी हे सगळ ऐकूण स्तब्धच झाले… ज्या गोष्टी साठी मी चीडचीड करत होते.. रागावत होते… ती किती सहज समजावून दिली सुहासने… 

बाबा सॉरी.. मी ऐकेल या नंतर…

अग पिल्लू मला साॅरी नको म्हणूस.. सकाळी तू शाळेत जातेस मी पण दिवसभर घरी नसतो… तुझ हे वाक्य मूड नाही.. नंतर करते.. आईच ऐकते न दिवसभर.. तुला साॅरी म्हणायचेच असेल तर आईला म्हण… 

परी किचनमधे आली व मला बिलगून “आई साॅरी ग” म्हणाली… ?

दरवाज्यातून सुहास बघत होता…त्यांनी ?केल. तिच साॅरी म्हणजे आमचा रिझल्ट होता पालकत्वाच्या परीक्षेचा. ज्यात आम्ही पास झालो होतो..

समाप्त…. ?जयश्री  कन्हेरे -सातपुते

रागावून, मारून मुलांना वळण लावल्या पेक्षा हा मार्ग आवडला मला.. महत्त्वाचे म्हणजे एका बाबानी आपल पालकत्व सिद्ध केल होत.. याचा खुप अभिमान वाटत होता मला… शिस्त, वळण फक्त आईनेच लावायची अस असते पण माझ्या परीचा बाबा म्हणजे वेगळाच आहे… आम्ही हे पालकत्व दोघेही निभावतोय.. एकमेकांच्या साथीने.. आणि असाच पालकत्वाचा प्रवास पुर्ण करू आम्ही… आणि तुम्ही?

काय वाटत तुम्हाला आम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे की नाही? प्रतिक्रिया नक्की कळवा… आमचा पालकत्वाचा प्रवास आवडल्यास like नक्की करा, आवडल्यास माझ्या नावासकट शेअर करा.?धन्यवाद

Comments

प्रतिक्रिया व्यक्त करा