जागतिक चिमणी दिन…

Written by

🔴जागतिक चिमणी दिन..

या चिमण्यांनो परत फिरा
वाट पहातो आम्ही घरा

तान्हुल्याचे भिरभिरले डोळे
आवाजाने ते अंगणात खेळे

दाणे टिपण्यास तुमची गडबड
भितिने तुमची वाढती धडधड

भिरदीसी उडतो तुमचा थवा
एकीचा आदर्श आम्ही घ्यावा

खोपा तुमचा फारच सुंदर
कलेचा तुमच्या करतो आम्ही आदर

अंगणात तुमचा हवा आहे चिवचिवाट
चिऊताईचा आहे वेगळाच थाट

पर्यावरणाचे संरक्षण करुया
चला चिमण्यांना वाचवुया

©नामदेवपाटील ✍️

Article Categories:
कविता

Comments are closed.