जागतिक छायाचित्रदिना निमित्य ..!!

Written by

?जागतिक छायाचित्रदिना निमित्य..!!

१९ आॕगस्ट हा जागतिक छायाचित्र दिन…फोटोग्राफी अर्थात छायाचित्रकला…आज हि कला केवळ फॕशन व निसर्गचित्र यांचे छायाचित्रनापुरती मर्यादित राहिलेली आहे पण याला हस्तकलेची जोड दिल्यास निश्चितपणे आणखीन बहरेल…
अख्ख जग आपल्या प्रतिमेत सामावण्याची ताकद फक्त कॕमर्यात आहे.कॕमर्याची हाताळण्याची कला उमगली की कॕमर्याचा प्रवास सुखद होतो , मग कॕमेरा कोणतीही प्रतीमा हुबेहूब उतरतो भेदाभेद न करता …. निळभोर आकाश …स्वच्छंदी पक्षी .. त्यांनी विणलेली सुंदर घरटी .. ढगांच्या नाना छटा …निसर्गाची भव्यता … संह्याद्रीची दिव्यता…इतिहासाची सखोलता…सृष्टीची तप्तरता …हिरवाईची उत्कटता …पानगळीची खिन्नता …..असे निसर्गचित्रण फक्त कॕमर्यातच कैद होते.
माणसाचे अंतरंग कॕमर्यातुन सहज व्यक्त होते.त्याचे सौंदर्य ..त्याच्या भावभावना …शरीराची प्रमाणबद्धता …चेहऱ्यावरील छटा …कॕमर्याच्या अंतरंगात सामावून घेतल्या जातात.छायाचित्राची ही दुनिया सत्यसत्याने भारलेली …. वास्तवतेचे रुप दाखवणारी खरोखरच विलोभनिय वाटते.
आज १९ अॉगस्ट छायाचित्र दिन मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो.जगभरातील फोटोग्राफर्सना प्रेरणा देणारा हा दिवस आहे.या दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे वेगवेगळ्या देशातील विभिन्न लोक एकत्र यावेत फोटोप्रदर्शन , व्याख्याने , स्पर्धा , यांचे आयोजन करण्यासाठी एक दर्जात्मक व्यासपीठ मिळावे यासाठी छायाचित्र दिन दिमाखात साजरा होतो.
या डिजीटल युगात प्रगत तंत्रज्ञानाने मानवाने गरुडझेप घेतली आहे त्यात कॕमर्याच्या अद्यावत शैलीने मानवाचे सारे क्षण टिपून आठवणींना उजाळा देउन मानवी जीवन आनंददायी करण्यात महत्वपुर्ण भूमिका बजावली आहे.आजच्या या छायाचित्रदिनी फोटोग्राफर्सना नवी प्रेरणा मिळावी व प्रेरक उमेदीने आजच्या दिवसाचा आनंद लुटावा..!!

?जागतिक छायाचित्रदिनास मनःपुर्वक शुभेच्छा ….!!

✍नामदेव पाटील .

प्रतिक्रिया व्यक्त करा