जागते रहो

Written by

जागते रहो

“आई, नको ना शाळेत.झोप येत ग मला” ऋषी परत पांघरुण घेऊन झोपला तशी अनघा वैतागली. तिने रागाने त्याला पांघरुणातुन घेतले आणि थेट बाथरूममध्ये घेऊन गेली.त्याचा थयथयाट चालुच होता.अनघा तोंड ही.
अनंतला जाणवत होत कि ती जरा जास्तच चिड चिड करते आहे पण त्याला ही कळत नव्हतं काय करायचं. रोज सकाळी शाळेत जायचीवेळ आली की त्याच रडणं सुरु. प्रेमाने झाला ,समजावून झाला,रागावून,मारून पण प्रश्न सुटत नव्हता हेच खरं. शेवटी न राहवून त्याने आईला फोन केला आणि घडाघडा बोलुन घेतल सगळं. त्याच त्यालाच बर वाटलं. ती फक्त बर म्हणाली.ती आताशा त्यांच्यात पडत नसे.आपण बोललेले अनघाला आवडत नाही हे लक्षात आल्यावर ती अलिप्त झाली होती. गावी जाऊन एकटीच relax राहात होती.
दुपारी अनघाला फोन आला शाळेतुन ऋषीला खुप जास्त ताप भरला आहे घेऊन जा आणि घरी येऊन बघते तर काय दारात सासु हजर.
त्या अशा अचानक बघुन तिला खूप आश्चर्य वाटले. कारण ती सकाळीच त्यांच्याशी बोलली होती.अनंतला ऋषीला बर नाही हे अजुन कळवलच नव्हत.फार विचार न करता तिने दार उघडल आणि एकीकडे चहा टाकून तिने त्याचा ताप बघितला. डॉक्टरांकडे संध्याकाळी नंबर लावला. तोवर ऋ षी औषध घेतल्यामुळे आजीच्या कुशीत गाढ झोपला होता.
संध्याकाळी अनंत घरी आला तेव्हा त्यालाही आश्चर्यच वाटले.एकदम येईल अस वाटल नव्हत. तिनेही सकाळच्या बोलण्याचा काही reference दिला नाही. झोपायला जातांना एवढंच बोलली ऋषीच शाळेच परत नीट सुरू झाल की मगच जाईन मी.
दुसर्या दिवशीपासून ऋषी आणि अनघा दोघांचीही सुट्टी होती. तीन चार दिवसात त्याचा तापही उतरला. पण जसजसे शाळेत जायची वेळ आली तशी तशी त्याची अस्वस्थता वाढत होती. आजीच्या लक्षात येतं होत की इथेच काहीतरी पाणी मुरतय.
तिने अजुन त्याचा विकनेस कमी होऊ दे या नावाखाली घरीच ठेऊन घेतल.आणि दुपारी झोपेत ऋषी ओरडत होता “काका, बंद करा मोबाईल. मला भीती वाटते आहे खुप.please काका ” ऋषीला खुप घाम फुटला होता. आजीने पदराने घाम पुसला. दोघही बसुन राहीले. “ऋषी….”आजीच्या अलवार हाकेने ऋषी भानावर आला. “आजी नक्की कोणाला सांगणार नाही ना.नाही तर ते काका आईला मारून टाकतील. ” “नाही सांगणार हं कुणाला. ”
“अग मी ज्या बसने शाळेत जातो येतो ना त्यात सकाळी काही मिनिटे आणि दुपारी काही वेळ मी एकटाच असतो.आपल घर सगळयात दुर आहे ना.त्यात दुपारी डायवर काका मध्ये डबा घ्यायला उतरतात. त्या वेळी मी आणि शाम दोघंच असतो गाडीत.” “हा शाम कोण..?”आजी. “अग तो न attendant आहे बसच.तो अगदी मलाच येऊन चिकटून बसतो आणि मोबाईल वर कसले कसले व्हिडिओ लावतो.मला खुप भीती वाटते, घाण पण वाटते.पण तो खुप विचित्र हसतो ग.पण हे नाही सहन होत. तो म्हणाला कोणाला सांगितलंस तर तुझ्या आईला मारून टाकीन.मी काय करू ग आजी तुच सांग ना “आजी नुसतीच थोपटत राहिली.
या आठ वर्षांच्या लेकराच्या पोटात केवढी भीती आहे हे बघुन ती हतबुद्ध झाली. आता याच्या साठी तरी इथे राहायलाच हवं.
रात्री हा सगळा प्रकार तिने अनंत अनघा सांगितला.त्यां नी हया शक्यतांचा विचारच केला नव्हता. आणि ताबडतोब सुट्टी टाकली.हा प्रश्न आधी सोडवायलाच हवा नंतर सगळ.
पालकांनो वेळीच मुलांच्या तक्रारीं कडे डोळसपणे लक्ष दया. या बाबतीतला casual approach मुलांच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करतो.

प्रज्ञा बापट

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा