जाणीव

Written by

जाणीव
जेव्हापासून तुझ्या येण्याची चाहूल मला लागली
तेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम करायला लागली
पाहिलं ही नव्हतं तुला तरिही
माझा असल्याची जाणीव झाली.
तुझं अस्तित्त्व मी माझ्यातच शोधू लागली.
कधी तुला हातात घेते याची आस लागली.
दिवसा मागुन एक-एक
दिवस मोजत बसली.
नऊ महिन्यांनी ती घटिका आली,
तान्हुल्या बाळाच्या गालांवर माझी
दोन आसवे तेव्हा पड्ली,
आई झाल्याची जाणीव
कायमची सुख देऊन गेली.

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत