जातीचा उंबरठा भाग अंतिम…

Written by

आता भाग तिसरा व अंतिम पुढील प्रमाणे
पोलिसांचा फोन आला… आणि आम्ही सगळे जण तालुक्याच्या ठिकाणी.. दवाखान्यात गेलो.
तिथे शवगृह.. जिथे dead bodies ठेवलेल्या असतात. त्या बाजूने आम्हाला नेण्यात आले.
मनात होतच की झालं.. आपली प्रिया गेली सोडून ??. पण कुठेतरी वाटत होतं. सिरीयल, सिनेमासारखं.. “नाही ही आमची प्रिया नाही ” ??. हे सगळं फक्त आभासी जगात होतं.. आपल्या real life मधे पुन्हा रिटेक नसतोच ग अनिका.. ???
आई.. रडू नकोस ग.. प्लीज.
अग ते आठवलं तरी अंगावर काटा येतो बेटा.. आणि तुला सांगतांना तर प्रत्येक घटना नजरेसमोर घडतेय की काय असं वाटत आहे.
त्या दवाखान्यात पाय ठेवताच धस्स झालं हृदयात. एक एक पाऊल उचलणं जड जात होतं.. पोलीस होते सोबत. त्यांनी ज्या रस्त्यानी आम्हाला न्यायला सुरुवात केली.. तो तर ????.. नाही… मी ??नाही सांगू शकत पुढे.
आई.. मला ऐकायचं आहे प्रिया ताईच काय झालं.. प्लिज सांग न…
कसबस स्वतःला व एकमेकांना हिम्मत देत आणि त्या शवगृहात पोहचलो. पोलिसांनी प्रियाच्या बाबाला बोलावलं, सोबत म्हणून तुझे बाबा गेले होते. शवाची ओळख पटवण्यासाठी.
आतून आम्हाला फक्त.. “नाही… नाही.. नाही.. ” इतकेच शब्द कानावर आले..तुझे बाबा.. मोठेबाबाना.. कसतरी सावरत बाहेर घेऊन आले. मुलीची ही अवस्था पाहून ते बेशुद्ध झाले होते.. त्यांना लगेच डॉक्टर ला दाखवण्यात आल.
प्रियाच्या आईने खुप हिम्मत एकवटुन शवगृहात जाण्याची हिम्मत केली.. तिथे मी ताईसोबत होते.. बॉडी च्या नावावर तिथे काहीच नव्हतं ग.. इतकी सुंदर पोर ती.. पण छिन्न विछिन्न मृतदेह होता.. ओळखणे देखील कठीण होतं तिला..
तिच्या काही वस्तू होत्या.. त्यावरून कपड्यावरून ही प्रियाचं आहे याची खात्री पटली.. त्या वस्तू मधे एक मंगळसूत्र आणि तिने लिहिलेल शेवटचं पत्र होत..तिच्या आई -बाबांसाठी, आमच्यासाठी.
त्यात लिहिलं होतं..

प्रिय,
आई -बाबा, आणि घरातील सर्व जणांना माझा शेवटचा नमस्कार ?. मला असं बघून तुम्हांला काय वाटेल याची जाणीव आहे मला. मी तुमच्यावर खुप प्रेम करते. प्रेम करताना ते फक्त घरच्यांवर करावं असं नाही न. मी सुद्धा सागरच्या प्रेमात पडले. माहिती होतं मला आपला समाज आमच्या या प्रेमाला कधीच मान्यता देणार नाही. आणि हा जातीचा उंबरठा मला पार करता येणार नाही.
मी सागर शिवाय राहू शकत नाही.. आणि तुम्ही आम्हाला सोबत राहू देणार नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला.
लग्न म्हणजे सात जन्माचं बंधन असते न ग आई. तू वटपौर्णिमा करायचीस, तेंव्हा सांगत होतीस न. हाच नवरा सात जन्म मिळावा म्हणून तू तो उपवास व पूजा करतेस. म्हणून मरण्याआधी आम्ही लग्न केल. आता पुढच्या जन्मात कोणीही आम्हाला पती -पत्नी होण्यापासून थांबवू शकणार नाही.
आई -बाबा प्लिज मला माफ करा. तुमच मन दुखवत आहे, माझ्या या वागण्यामुळे तुमची खुप बदनामी होईल माहिती आहे मला. पण सागरचं प्रेम देखील तितकच महत्वाचे आहे मला.
मी कितीही तुम्हांला विनवण्या केल्या असत्या तरी तुम्ही तयार झाले नसते आमच्या लग्नाला, का तर.. “समाजाच्या लाजेसाठी “. तुम्हांला तुमची मुलगी जास्त महत्वाची नाही जितका तुमचा मान व ईज्जत महत्वाची आहे.
या सगळ्यांचा विचार करूनच मी हा टोकाचा निर्णय घेतला.
मला खुप जगायचं होतं. मोठ होऊन काहीतरी बनायचं होतं. मात्र या सर्वात मला तुमच्या सोबतच सागर देखील हवा होता. आणि तो मला मिळणार नाही याची 200%गॅरेंटी होती. मला सर्वांचे स्वभाव माहिती आहे न.
आज मी जातीचा उंबरठा पार केला.. आणि त्याच सोबतच आयुष्याचा देखील. एक विनंती, ?या जाती.. पातीच्या, मान -अपमानाच्या, उच्च -निचतेच्या बेगडी वलयातून बाहेर या. पुन्हा कोणत्याही प्रियाला असा टोकाचा निर्णय घ्यावा लागू नये. ???
मी चुकले की नाही याचा विचार केला नाही. मला जे योग्य वाटलं ते मी केलं. जमेल तर मला माफ करा. कारण तुम्ही करणार नाही हे माहिती आहे. माझ्या या कृत्याला कुणालाही दोषी ठरवू नये.. ही विनंती. ?
सर्वांना माझा अंतिम नमस्कार…? अनिकाला खुप सार प्रेम. ❤
तुमची, प्रिया सागर…..

हे एकूण ताईंची हालत देखील खुप वाईट झाली होती..शब्द तर नाही फक्त अश्रू ओघळत होते.. तितक्यात त्या मुलाचे आई -वडील देखील आले..
त्यांना तर विश्वासच बसेना.. की आपला मुलगा जो दोनवदिवसाआधी आपल्या सोबत होता तो आज निर्जीव होऊन पडला आहे.. ते बघताच त्याच्या आईने टाहो फोडला.. त्याच्या बाबाने कपडे व सामानावरून “हा आपलाच मुलगा आहे” याची खात्री केली.. त्याने सुद्धा एक पत्र आई -बाबांसाठी लिहून ठेवले होते.

प्रिय, आई -बाबा
मला माहिती आहे मी तुमचा विश्वासघात केला. तुमच्या खुप अपेक्षा होत्या माझ्याकडून, माझ्यासाठी तुम्ही प्रियाला स्वीकारलं देखील असत.
पण
प्रियाच्या घरचे स्वीकारणार नाही हे तिला माहिती होतं.. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला. तो चुकीचा की बरोबर हे नाही माहिती.
मी पुन्हा पुढच्या जन्मात तुमच्या पोटी जन्म घेईलआणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करीन. जमेस्तोवर मला माफ करा.. माझ्या या कृत्यासाठी कुणालाही दोषी ठरवू नये ही विनंती.
तुमचा… सागर प्रिया

सागरच्या आई -बाबांची देखील खुप वाईट स्थिती होती.. शेवटी त्यांनी देखील मुलगा गमावला होता. ??
एकमेकांना दोष देण्यात काही उपयोग नव्हता पण शेवटी मानवी स्वभाव.. त्यामुळे सागरची आई नको.. नको ते बोलत होती.

त्या दोघांनी.. मंदिरात लग्न केलं.. तिच वय 18होतं.. आणि त्याचंही. त्यामुळे कानूनी त्यांच्या लग्नाला मान्यता मिळणार नव्हतीच, म्हणून त्यांनी एकमेकांचा हात हातात घेऊन… रेल्वे खाली आत्महत्या केली.. ????
इकडे मोठे बाबांची प्रकृती खूपच खालावत चालली होती. त्यांना ऍडमिट केल होतं.
आम्ही dead body घेतली आणि अंतिम क्रियेसाठी घरी आलो. अंतिम संस्कार करून माणसं परत येत नाही तोच . दवाखान्यातून फोन आला..”पेशंट सिरीयस आहे”
धावपळ करत तिथे जात नाही, ते कळलं की मोठे बाबा गेले. एक दुःख काय कमी होतं जे दुसरं तयार. ताईंना कस सांभाळायचं हे मलाही कळत नव्हतं.
एकाच दिवशी दोन अर्थी उठल्या आपल्या घरून. ती रात्र देखील काळाची होती.. ताई सारख्या विचारात गढल्या होत्या. त्यांचे अश्रू तर कधीच आटले होते. नजर फक्त शून्यात गढलेली होती.
दिवस निघून जात होते.. आणि लोक त्यांचे टोमणे देखील सुरूच होते. बाहेर निघणं देखील कठीण झाल होतं.
आणि एक महिन्यांनी.. ताई व प्रकाश.. रात्री झोपले खरे पण सकाळी उठले नाही.. ???
ताईंनी मुलाला विष दिल आणि आणि स्वतः देखील घेतलं.
कस बस प्रिया व तिच्या बाबांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत नाही तोच पुन्हा हा अनपेक्षित धक्का. ???
ताईंनी मागे एक पत्र ठेवलं होतं.
“काय लिहू यात… माझ्या मुलीने केलेल्या चुकीची शिक्षा मला मिळायला हवी. मात्र आपला सर्व परिवार ती शिक्षा भोगत आहे. बाहेर निघणं देखील कठीण झालय. माझ्या मुलाला देखील हे लोक सुखाने जगू देणार नाहीत. आणि माझी जगण्याची इच्छा नाही. माझ्या माघारी मुलाच तुमच्यावर ओझ नको म्हणून मी त्याला सोबत नेत आहे. माझ्या या कृत्याचा तुम्हाला फार धक्का बसेल पण मला या शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही..
जमेल तर मला माफ करा.. ”
असं पत्र सापडलं.. पुन्हा एकदा.. आपल्या घरून दोन अर्थी उठल्या… आणि त्या घटनेने आम्हीच नाही तर अख्खा गाव देखील हादरला.
मुलीची चूक म्हणावं की काय… त्याची शिक्षा अशी भोगावी लागली सगळ्यांना.
आजही तो विषय लोक चघळत असतात. त्याचं कामच आहे ते.
कदाचित समाजाने असे जातीचे उंबरठे निर्माणच केले नसते.. तर आज प्रिया आणि तिचा परिवार जिवंत असता.???
तुझ्या बाबांची सक्त ताकीद होती तेंव्हा पासून. की “मुलींचं असे वाकडे पाऊल पडू न देण्याची जबाबदारी सर्वस्वी आईची आहे ”
त्यामुळे तुला जातांना मी, काकू व आत्या ने समजावले होते.
आणि खरं सांगू बेटा. तुझं असं हरवल्यासारखं वागणं बघून मला तुझ्यावर जरा शंका आली. ती चुकीची असू शकते. त्यासाठी सॉरी ग.
अजूनही आपला समाज इतका पुढारलेला नाही की तो अशा विवाहाला मान्यता देईल.
प्रेम काही जात बघून होतं नाही.
पण
समाज तो जातीचा उंबरठा ओलांडण्याची परवानगी देत नाही…
मुलींनी मन मारून जगाव असं मी म्हणतं नाही पण एकदा घरी सांगून बघावं आपल्या प्रेमाविषयी.. जर मानले घरचे तर ठीकच.. नाहीच मानले तरी आत्महत्या हा पर्याय नसावा. ????
आई… विश्वास ठेव माझ्यावर आपल्या कुटुंबात अशी घटना पुन्हा घडणार नाही… अग मैत्री आहे माझी मुलांसोबत…
आणि, आता हे ऐकून ती मैत्रीची सीमा कधीच ओलांडणार नाही.
मुलं, मुली आपल्या प्रेमासाठी दोन्हीही कडील कुटुंब उध्वस्त करतात. ते निघून जातात आणि सर्व घरच्यांना वर्षानुवर्षे ऐकावं लागत.
आई, समाज कधी सुधारेल ग???
अग आज बरेचजण आनंदाने म्हण किंवा भीतीने.. अशी मुलांची लग्न करून देत आहे.
आपल्या कडे झालेल्या इतक्या मोठ्या घटनेला कस काय विसरणार न. त्यामुळे अजूनही आपल्या घरी ती मान्यता मिळणार नाही, तुझ्या बाबांकडून तर अजिबात नाही.

आई.. विश्वास ठेव माझ्यावर..
हो. माझ्या बळावर विश्वास आहे माझा. म्हणून तर इतकं सगळं सांगण्याची हिम्मत केली मी. माझ्या हातात असत न बेटा तर मी जाती ठेवल्याचं नसत्या. फक्त माणुसकी ही एकच जात ठेवली असती…
पण……. पण..
चल.. बरीच काम राहिलीत..
आई हे सगळं सांगून निघून गेली आणि अनिका.. मात्र विचार करत होती… मैत्रीची सीमा तीच मन पार करण्याआधी तिने स्वतःला सावरल.आणि मनाला स्वतःच बंधन घालून दिल..
तुझ्या प्रेम वर्षावात मला चिंब भिजायचं होतं…
अनाहूत त्या प्रेम सागरात मला उतरायचं होतं…
तुझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात मला सुद्धा यायचं होतं…
पण…
जातीचा उंबरठा ओलांडण्याच धाडस माझ्यात तरी नव्हतं…
✍️अनिका….
आज पहिल्यांदा अनिकाने काहीतरी लिहिलं होतं.. त्यातून तिने घेतलेला निर्णय देखील स्पष्ट होता..
मन मारून, संस्कार जपून, आई -बाबांचा मान ठेऊन तिने त्यावेळी घेतलेला निर्णय योग्यच होता.
समाप्त……. ©®जयश्री कन्हेरे -सातपुते
या लेखाद्वारे मला.. प्रेम करू नका हे सांगायचे नाही आहे. आज समाज खुप सुधारलेला आहे. तरी देखील काही जागी हेच घडत आहे. ते घडू नये हे मुलं…मुली व आई -वडिलांवर अवलंबून असत.
मुलांनी विश्वासात घेऊन घरच्यांना सर्व सांगावं. आणि घरच्यांनी समाजापेक्षा मुलांच्या आनंदाचा विचार करून त्यांना समजून घ्यावं, समजून सांगावं आणि योग्य तो निर्णय घ्यावा. आवडल्यास like करा… कमेंट करा, शेअर करायचा असेल तर नावासहित करा. ©जयश्री कन्हेरे -सातपुते फोटो साभार गुगल..

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा