जिंदगी न मिलेगी दोबारा…..

Written by

@अर्चना अनंत धवड

आज खूप अस्वस्थ वाटत्ये….. अस वाटत का जगतो आपण……. मरता येत नाही म्हणुन…… की मरणाची हिम्मत नाही म्हणुन…. पण का मरावे आपण…. मरण्यासाठी कशाला पाहिजे हिम्मत….. हिम्मत जगायला पाहिजे…… अणि मी जगणार…. अणि मला जस जगायचे आहे तस जगणार…. माझ आयुष्य मी माझ्या मार्जिने जगणार…. आता बस झालं… आता नाही सहन करणार……. शरयू नी डोळे पुसले…. एक वेगळीच चमक तिच्या डोळ्यात आली… तिनी बदलीचा अर्ज लिहिला अणि साहेबाच्या टेबल वर ठेवला…

सगळ्या ऑफिस मध्ये एकाच चर्चा होती… शरयू नी बदली साठी अर्ज केला . आम्ही सगळ्या बदली न व्हावी म्हणुन आटापिटा करतोय अणि हिने इतक्या लांब बदली मागितली… वेडी झाली का शरयू…. सीमा विचारात पडलीय शरयू नी अस का कराव… दृष्ट लागावी अस कुटुंब असताना अस इतक्या लांब बदलीसाठी अर्ज का करावा…. सीमा संध्याकाळी तिच्या घरी गेली…. शरयू स्वैपाक घरातील कामे करीत होती… अग ऑफिस मध्ये काय चर्चा सुरू आहे… शरयू नी डोळ्यानी शांत रहायला सांगितले….. शरयू दारापर्यंत सोडायला आली म्हणाली उद्या ऑफिस मध्ये बोलू…..

लंच टाइम मध्ये शरयू भेटली….. अग तुला आश्चर्य वाटतय ना माझा निर्णय ऐकून….. तुला जी आनंदी, उत्साही शरयू दिसते ना तो एक मुखवटा आहे….. त्या मुखवट्याच्या आत एक वेगळी शरयू आहे… त्या शरयू ला आता जगायचे आहे…
अग अस कोड्यात का बोलतेस… स्पष्ट स्पष्ट सांग ना…
ऐक…. ..

शरयू च्या डोळ्यासमोर तिचा सगळा प्रवास दिसू लागला…… लग्न झाले.. तेव्हा शरयू जेमतेम एकवीस वर्षाची… लाजाळू.. अबोल… कुणातही पटकन न मिसळणारी… ….. नवर्‍या बद्दलच्या फार अपेक्षा नाही…. तिला समज आल्यावर तिनी एक वाक्य कुठल्याशा पुस्तकात वाचलेले…… मुझे ऐसा पति चाहिए जो कभी ना रूठे……. और मुझे रूठनेका मौका ही न दे फिर भी मै रूठ जाऊ तो वो मुझे जल्दी से मनाए…… तिला ते वाक्य इतक आवडल की… मला असाच नवरा पाहिजे… अस मनोमन वाटू लागल…..कधी कधी वाटत्ये देवाची ऐकण्यात काहीतरी चूक तर झाली नसावी……. किवा त्यांनी पण देवाला तेच तर मागितले नसावे…. तशीही माझ्यापेक्षा त्याची देवावर जास्त श्रद्धा……. म्हणून त्याचे मागणे पूर्ण केले असावेत….

लग्न झाले.. सासरी आले… नवरा चांगलाच होता. पण थोडा हट्टी होता . अतिशय काळजी घेणारा.. शरयू मात्रा तेवढीच बिनधास्त. टापटीपीचा तर अगदी कहर.. कुणाला देण्यासाठी सुटे पैसे टेबल वर काढून ठेवले तरी थोड्या वेळात डब्यात जाणार अणि शरयू मात्र शोधत राहणार. एक भांडणाचे मुख्य कारण म्हणजे.. . शरयू ला रात्री पुस्तक वाचले कि उशाशी ठेवायची सवय अणि त्याला जागच्या जागी ठेवायची.. मग त्यामुळे त्याचा होणारा त्रागा… शरयू त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करायची पण चार दिवस.. परत येरे माझ्या मागल्या..

.. पण प्रतेक गोष्ट त्याच्या   मनाप्रमाणे व्हायला हवी…. …. थोड जरी बिघडले तरी अबोला…. अणि अबोला मात्र स्वतःहूनच कधीच तोडणार नाही…. त्याच म्हणणं अस की माझी चूक नाही तर मी का बोलाव…… कधि कधि तर त्याला राग कशाचा आला हे सुद्धा मला कळायचे नाही… मग मी आठवण्याचा प्रयत्न करायची…. आपल काय चुकलं….. मग आठवायचं.. मी काहीतरी बोलली होती…. अणि त्यानी त्याचा तुझ्या दृष्टीने अर्थ घेऊन डोक्यात राग घालून घेतला होता… मग परत मी न केलेल्या चुकीची माफी….. दर वेळी शरयू नी च पुढाकार घ्यायला हवा … …. एवढ्या वर्षात त्याच काही चुकलस  नसेल का .. …… अणि हो नसेल ही चुकल  तरी आपल्या माणसाची माफी मागण्यात पण वेगळच समाधान असत….. कधी कधी माफी चुकत म्हणुन मागायची नसते ….. आपल्याला आपल्या नात्याची किम्मत असते म्हणुन मागायची असते………माफी मागणे म्हणजे प्रेम व्यक्त करण्याच माध्यम असत…… पण त्याच्या दृष्टीने मात्र माफी मागणे म्हणजे कमीपणा घेणे………
अग, लग्न म्हणजे दोन वेगळी व्यक्तिमत्त्व एकत्र येतात…. तेव्हा त्यांना त्याच्या गुण दोषा सोबत स्विकारायच  असते…. हे त्याला कधीच कस कळल नाही .

..
मला अशा  कितीतरी गोष्टी आवडायच्या…..मला गाणी म्हणायला आवडते… चित्र काढायला आवडते….  फिरायला जायला आवडते …हॉटेलिंग आवडते… पण त्याला आवडत नाही म्हणुन मी कधी मनात देखील आणल्या नाहीत……. मला हे सगळे कळत की प्रतेक माणूस वेगळा असतो…. त्याप्रमाणे तो त्याच्या जागी बरोबरच होता …..
पण मी पण माझ्या जागी बरोबर असू शकते हे कधी त्याला कळलच नाही ……….

नोकरी सांभाळून घरची कामे व्यवस्थित करणे… त्याची मर्जी सांभाळणे…. यातच माझा पूर्ण वेळ जाऊ लागला……मला ते माझ हक्कच घर कधी वाटलच नाही…
अशातच दोन मुलाची आई झाले… मुलाला आई बापाचे प्रेम मिळावेत म्हणुन मी माझ्या आवडी निवडी बाजूला ठेवून त्याला जसे पटेल तसे वागायचे ठरविले….बरेचदा नैराश्य यायच… आत्महत्येचे विचार यायचे पण मुलाकडे पाहून जगायचे ठरविले… आता दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेर आहेत… मुलांप्रती असलेली माझे कर्तव्य आता संपले… मी मात्र आता थकली ग… ..आता मला माझ आयुष्य जगायचे आहे.. माझ्या मार्जिने… मला संगीत शिकायचे आहे… चित्र काढायची आहे…. फिरायला जायचे आहे…. हॉटेलिंग करायचे आहे…. अणि हे सगळे त्याच्या सोबत राहून शक्य नाही…. ईतके दिवस त्याच्या मना प्रमाणे वागले… आता इथे राहून त्याच्या मनाविरुद्ध वागून त्याला दुखवू शकत नाही….
म्हणून मी बदली मागितली…. मला माझ आयुष्य जगायचे आहे….मला मोकळा श्वास घ्यायचा आहे.. कारण जिंदगी न मिलेगी दोबारा…

सीमा ला फार आश्चर्य वाटले… आपण शरयू ला एक आदर्श बायको समजत होतो पण ती आत मधून इतकी दुःखी होती…..

शरयू नी स्विकारलेला मार्ग चूक की बरोबर कॉमेंट्स द्वारे कळवा…

सदर लेखाच्या वितरणाचे व प्रकाशनाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव

शेअर करायचे असल्यास नावासकट करायला हरकत नाही

धन्यवाद

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा