जीवनसाथी #प्रेमकथा

Written by

आज सुट्टीचा दिवस असल्याने निशा जरा रिलॅक्स होती. कॉफीचा कप एका हातात अन एका हातात पेपर घेऊन तिचे शांतपणे वाचन चालू असता तिचे बाबा तिचा रूम मध्ये आले.
निशा जरा बोलायचे आहे मला, आज संध्याकाळी तू घरीच थांब . बाबा

का? काही काम आहेका? निशा

हो. अग माझा मित्र आहे, त्यांना तू पसंद आहे त्यांचा मुलासाठी. त्यांनी मागे एका लग्नात पहिले होते तुला. मीही भेटलो होतो त्या मुलाला .राहुल नाव त्याचे. मला मुलगा चांगला वाटला म्हणून म्हणतो तू एकदा भेट. तुला आवडला तरच पुढचे बोलायला. बाबा
पण बाबा मला अजून एक वर्ष तरी लग्न वगैरे नाही करायचे तुम्हाला माहिती आहे.राणू चे हे महत्वाचे वर्ष आहे. निशा

हो पण तरी एकदा भेट त्याला माझा साठी.सोन्यासारखी माणसं आहेत ही. अग श्याम माझा कॉलेज चा मित्र, चांगले सुशिक्षित कुटुंब त्यांचे.राहुल एकुलता एक आहे. सिव्हिल इंजिनीयर आहे अन वेल सेटल आहे. एकदा भेट तर, लग्नाचे मग ठरव.राणूचे म्हणशील तर तीही हुशार अन समंजस आहे, ती नक्कीच समजून घेईल.
बाबा
ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसे. निशा
तर ही निशा-स्वभावाने शांत, हुशार सरळ. कुणाचा अध्यात मध्यात नाही अशी. फक्त आपले काम चोखपणे पूर्ण करणारी. ती एका कंपनीत HR होती. राणू तिची लहान बहीण. तिचे यंदा बारावीचे वर्ष होतेना. दोघी बहिणी म्हणजे एकमेकींचा बेस्ट फ्रेंड्स. ती शेंडेफळ असल्याने राणू जरा जास्तच लाडकी होती घरात.यांची आई मात्र घरापेक्षा समाजसेवेत जास्त रस घ्यायची. त्यामुळे घराची बरीच जबाबदारी निशावर च होती.

ठरल्याप्रमाणे संध्याकाळी राहुल अन त्याचे कुटुंब निशाचा घरी आले.
राहुल दिसायला स्मार्ट, उंच, सावळा वर्ण असा. पाहता क्षणी आवडेल असा.
तर निशाने छान लिंबू कलर ची साडी नेसली होती, केसांची सैलसर वेणी घालून अगदी हलकासा मेकअप केला होता. दोघांचाही कुटुंबाची ओळख वगैरे करुन सर्वजण गप्पा मारत बसले होते. दोघांची नजर एकमेकांना सारखी पाहत होती, चोरून चोरून बघणे चालू होते. ते म्हणतात ना पेहले नजर का प्यार, तसेच काहीसे झाले होते त्यांचे. तेवढ्यात च बाबा बोलले.
तुम्हांला पाहिजे तर दोघे बाजूचा रूम मध्ये जाऊन बोला अन मग ठरवा.जा निशा, “राहुल ला ने तुझा रूम मध्ये”. नि. बाबा

दोघेही मग निशाचा रूम मध्ये गेले.दोघांची नजरानजर झाली. एक स्मित करून शांततेचा भंग करत राहुलनेच बोलायला सुरुवात केली.
मी तुला मागे एका लग्नात पाहिले होते, तेव्हाच मला तू आवडलीस पण तेव्हा तुझे कॉलेज चे लास्ट इयर आहे असे कळाले सो मी आता हा विषय काढला आपल्या फॅमिली समोर. मी डायरेक्टच विचारतो, “बोल होशील का माझा आयुष्याची जोडीदार. देशील का मला आयुष्यभर साथ”.
तिलाही तो पाहता क्षणीच आवडला होता.त्याचा स्पष्टवक्तेपणा तिचा मनात घर करुन गेला. तीने थोडे लाजूनच त्याला होकार दिला. मग काय फोन नंबरची देवाणघेवाण झाली.
लग्नाची तारीख 6महिन्यानंतर ची ठरली. दोघांचा साखरपुडा पुढच्याच आठवड्यात झाला. ते ऑफिसिअली एंगेज झाले. दोघेही जॉबला असल्याने रोज नाही पण बऱ्याचदा भेटायचे, बाकी फोनवर बोलणे होत होते. दोघेही खूप कमी दिवसात मनाने खूप जवळ आले होते. दोघाना एकमेकांची खूप सवय झाली होती. लग्न जरी अरेन्ज होते तरी दोघे लग्नापूर्वीच प्रेमात आकंठ बुडाले होते.
पण नियतीपुढे कधीच कुणाचे चालत नाही.एखाद्याने सुंदर रंगीत चित्र रेखाटन करावे अन त्यावर अचानक करुन काळी शाई पसरून ते चित्रच नष्ट व्हावे, असेच काहीसे झाले निशाचे.
राहुल त्याचा कंपनीतर्फे दहा दिवसासाठी बाहेरगावी गेला होता. इथे निशाचे रोजचे रुटीन चालू होते. एकदिवस ऑफिस ला जात असतांना अचानक तिचा मोठा अपघात झाला.तिला तिचा मैत्रिणीने ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल केले.उपचार ताबडतोब सुरु झाले. पण निशाने तिचा एक पाय गमावला .जेव्हा तिला कळाले तेव्हा खूप रडली. तिचे आई वडील राणू.सर्वजण तणावात होते.
“हे बघ बाळा तू रडू नकोस, तू ठीक आहेना. हेच खूप आहे आमचा साठी”. आई
“हो ग . पण आता कसे होईल, मी काय करू अन राहुल चे काय?? “ती रडतच बोलत असते.
“आई, एक काम कर माझे प्लीज”.निशा
काय?
तू राहुल अन त्याचा घरच्याना काहीच कळू नको देऊ माझा अपघाताचे. मी नकार देईल ह्या लग्नाला.
“काही काय बोलतेस निशा”, बाबा.
तुम्ही प्रेम करताना एकमेकांवर?? अन नकारा चे कारण काय सांगणार? बाबा

रागात बोलते,” मला काहीच माहित नाही पण मी आता त्याला नाही भेटणार यापुढे… मी त्याचा आयुष्याचे माझ्यामुळे नुकसान नाही होऊ देणार..माझ्यामुळे त्याला दुःखी नाही होऊ देणार”.
तितक्यात तिथे राहुल येतो अन बोलतो, “पण माझे सुख फक्त तुझ्यात आहे…निशा तुझ्याशिवाय मी राहण्याची कल्पनाही नाही करू शकत”.
तू इथे? निशा
“हो तू फोन उचलत नाही म्हणून मी राणूला कॉल केला तेव्हाच तिने सांगितले अन लगेच इथे आलो, पण तू तर मला परके करतीये.आपले नाते इतके कमजोर आहे का”? Rahul
“अरे मलाही जरा समजून घे. तुला पुढे त्रास नको अन मला कोणाचीही सहानुभूती नकोय”.थोडी चिडून पण रडतच बोलते.निशा
“मलाएक सांग निशू, जर माझ्यावर अशी वेळ आली असती तर तू मला असेच सोडले असते का”??
निशा मानेनेच नाही बोलते.
“मग प्लीज मला सोडण्याची भाषा करू नकोस. मी जगू नाही शकत तुझ्याशिवाय. आपले प्रेम इतके कमजोर नक्कीच नाही. होना.शरीर तर नश्वर असते, मनाचे मिलन महत्वाचे. तुझा रूपापेक्षा मला तुझा प्रेमळ अन समंजस स्वभाव जास्त भावला.
बोल होशील ना माझी अर्धांगिनी”?? त्याने अगदी काकूळतीने विचारले.
निशा साश्रुनयनाने मानेनेच होकार देते.

तेवढ्यात राहुलचे आई बाबा रूम मधे येतात, तिला थोडे दडपण आलेले पाहून त्या म्हणतात, “अग जे झाले ते तर कोणीच बदलू नाही शकणार, पण तुम्ही तुमचे भविष्य एकमेकांचा साथीने तर उज्वल नक्कीच घडवू शकाल, तुम्हा मुलांचा सुखात च आमचे सुख “.
“आम्हाला आमचा मुलाचा अभिमान आहे की, ह्या परिस्थिती मध्ये सुद्धा तो त्याचा निर्णयावर ठाम राहिला. यालाच तर म्हणतात खरे प्रेम,नाहीका”?? राहुल चे बाबा बोलले.
त्या तिघांचा समजूतदारपणा पाहून निशा व तिचा घरचे भारावून गेले.
मग पुढे काही दिवसातच त्यांचा ठरलेल्या दिवशी त्यांचा विवाह संपन्न झाला.
निशा ही जिद्दी होती, रडत बसणाऱ्यां मधली नव्हती. तिने थोडया दिवस ब्रेक घेऊन, पुन्हा जॉब जॉईन केला. दोघेही खूप खुश होते अन एकमेकांचा साथीने सुखाचा संसार करू लागले.
लग्न ठरवून असो किंवा प्रेम विवाह असो,
कोणत्याही नात्यात प्रेम, विश्वास अन समजूतदारपणा असला तरच नाते टिकून राहते अन आपले सुख ही.फक्त एकमेकांची साथ महत्वाची.

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत