जीवनाचा संघर्ष (अंतिम भाग)एए

Written by

मी मात्र गर्भपात करण्यासाठी तयार नव्हते. माझ्यातील अंशाला ,त्या कळीला जन्माला येण्या आधीच कशी कुस्करून टाकू ?
त्यामुळे मी घटस्फोटाचा जो निर्णय घेतला .तो शंभर टक्के योग्य होता .घटस्फोटानंतर मला माहेरी देखील जागा नव्हती. त्यांनीही पाठ फिरवली. कारण, नवर्‍याच्या विरोधात मी कोर्टात धाव घेतली होती. हि गोष्ट घरच्यांना काही रुचली नव्हती.शेवटचा पर्याय म्हणून मी महिला आश्रमात धाव घेतली. त्यामुळे माझ्यात वाढत असलेल्या वंशाला घेऊन महिला आश्रमात आसरा घेतला. काळजीने माझा जीव अर्धा झाला होता. माझ्या संसाराचे वाटोळे झाले होते.
पण, मी हार न मानता जीवनाशी संघर्ष करण्याचे ठरविले. महिला आश्रमात माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. जसेजसे दिवस जात होते, तसतसा माझ्यातही बदल होऊ लागला. माझ्यात वाढत असलेल्या अंशाला काळजीने सांभाळू लागली. परंतु, माझे भविष्य मला अंधकारमय दिसत होते. पण, म्हणतात ना, एक दरवाजा बंद झाला तरी,देव आपल्या साठी दुसरा नशिबाचा दरवाजा उघडतो.घडलेही तसेच…. तिथेच माझी ओळख सुरेशशी झाली. सुरेश तिथे कार्यालयीन कामकाज, बँकेची कामे सांभाळत होता. तोही एकटा आणि मी देखील एकटी होते.सुरवातीला फक्त ओळख झाली .
हळुहळू आम्ही कधी प्रेमात पडलो ते कळलेच नाही. आश्रमातही आमच्या प्रेमाची गोष्ट समजली. मला तिथल्या ताईंनी खुप मदत केली. मला देखील कोणाच्या तरी आधाराची गरज होतीच आणि माझा आधार सुरेश झाला.
आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझ्या सोबत माझ्या बाळाला बाबांचे नाव लावण्यासाठी सुरेश तयार होता. माझ्या सारखी माझ्या बाळाची फरफट होऊ नये हा त्याचा प्रामाणिक प्रयत्न होता.
आज आपण जे काही एकत्रितपणे सुखाचे क्षण उपभोगत आहो. ते फक्त सुरेश मुळेच शक्य झाले .
सुनंदाचा कंठ दाटून आला. मुद्दामच या गोष्टी पासून तुला दुर ठेवले होते.पण,जाऊ दे आता!
सुरेश बोलु लागला,अगं सुनंदा किती त्रास करुन घेशील? आपली मुलगी खुप समजुतदार आहे. तिची चुक ती सुधारण्याचा ती नक्कीच प्रयत्न करेल.
हो, आई ,पुर्वी सारखीच नंदिनी आईच्या गळ्यात पडून बोलु लागली .तिघांच्याही डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या. पण, आई तू मला आधीच का नाही सांगितले. माझा तुमच्या दोघां बाबतीत किती मोठा गैरसमज झाला होता. मी थोडीशी भरकटले होते. आज हे सत्य ऐकून मी तुमची माफी मागते. माझे माझ्या आई बाबांवर खूप प्रेम करत होते आणि करतच राहणार. सुनंदा आणि सुरेश एकमेकांकडे समाधानाने बघू लागले.
नंदिनीने दोघांनाही लाडाने सांगितले, की यापुढे आपल्या प्रेमात, आपल्या नात्यात कोणाचेच वितुष्ट येणार नाही.मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. मी तुम्हाला वचन देते.

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा