जीवनात षड्रिपू गरज आहे काय??

Written by

जीवनात षड्रिपू गरज आहे काय??

@अर्चना अनंत धवड

एकदा मी टीव्ही पाहात बसली होती. काहीतरी आध्यात्मिक कार्यक्रम सुरू होता. ते बाबा सांगत होते की काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, षड्रिपू चा त्याग करा. हे षड्रिपू मानवाचे सहा शत्रु आहे. मानवाचे मन एकाग्र करायला त्यामुळे अडचणी येतात. संत महात्म्यांसाठी अगदी योग्यच आहे. संसारी माणसाचे काय ❔ संसारी माणसाने षड्रिपू चा त्याग केला तर संसाराचे चक्र चालेल का. मला वाटते संसाराचे चक्र चालण्यासाठी योग्य प्रमाणात या षड्रिपू ची आपल्याला गरज आहे. प्रथम आपण संसाराच उदाहरण घेऊ या. समजा माणसाच्या जीवनात काम भावनाच नसेल तर……. संसार पुढे चालेल…. क्रोध….. आपण बोलताना नेहमी म्हणतो…. की त्याला अस म्हटल की राग येतो… म्हणुन मग आपण त्याच मन जपतो. समजा राग ही भावनाच नसती तर….. आपण नेहमी म्हणतो की माझ्या नवर्‍याला हे आवडत नाही.. अस वागले की त्याला राग येतो….. नवरा पण वागताना आपल्या रागाचा विचार करतो….. समजा राग आलाच नसता तर…. आपल्या वागण्यात काही धरबंध राहिला नसता अणि काही अंशी जीवनातली शिस्त नाहीशी झाली असती…..मोह अणि मत्सर…. मोह असणे पण किती आवश्यक आहे मोह ही भावनाच नसेल तर आपण उद्याचा विचारच करणार नाही आज कमविले आणि खाल्ले अणि उद्याचे उद्या बघू  मत्सर …. त्याला एवढे मार्क मिळाले… मला पण मिळायला हवेत…. असा मत्सर… त्यामुळे मूल जास्त अभ्यास करतात… जॉब मध्ये त्याला प्रमोशन मीळाले मला पण मिळायला हवे या मत्सरापोटी आपण प्रयत्न करतो….. संसारात या षड्रिपू ची आवश्यकता  आहे….. पण  प्रमाणात

सुखी संसारासाठी या गोष्टींची योग्य प्रमाणात आवश्यकता आहे.  आता प्रमाणाच्या बाहेर षड्रिपू झाले की काय घडत……

काम, क्रोध, लोभ मोह, मत्सर, मद  या भावना प्रमाणाच्या बाहेर झाल्या की चोरी, घरफोडी, लूटमार, अशा घटना घडतात. अणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल पोलिस खाते बनवले आहे. या विभागात शिपाया पासून ते आयुक्ता पर्यत लाखो लोक काम करतात. मानवाच्या मानत हे षड्रिपू नसते तर…… कुठलाही अनुचित प्रकार घडला नसता…. मग पोलिस विभागाची गरजच उरली नसती. या लाखो लोकांना या षड्रिपू मुळे रोजगार मिळाला.  पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्यावर कोर्टात केसेस चालतात. म्हणजे परत या कोर्टातील शिपाया पासून ते न्यायाधीशा पर्यत लाखो लोक काम करतात.  त्या लाखो लोकांना या षड्रिपू मुले रोजगार मिळाला.

पोलिस स्टेशन पासुन ते कर्मचाऱ्याच्या कार्टर पर्यत बांधकाम करण्यासाठी किती लोकाना रोजगार मिळतो. कारपेंटर, गवंडी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर अशा कितीतरी लोकांना रोजगार मिळतो.  लोभ, मोह,, या अवगुण मुळे लोक अन्नामधे  भेसळ करतात. अधिकांश आजार हे भेसळयुक्त खाल्याने होतात म्हणजे हॉस्पिटल स्टाफ चा रोजगार सुद्धा या षड्रिपू वर अवलंबुन आहे.  कोर्ट, पोलिस स्टेशन, न्यायालय,,हॉस्पिटल, इथे जाण्यासाठी वाहतुकी च्या साधनाची गरज पडते. त्यामुळे पेट्रोल पंप, ड्राइवर, कंडक्टर, वाहतुक विभाग, आरटीओ, या विभागातील रोजगार सुद्धा या षड्रिपू वर अवलंबुन आहे.  कधी कधी माझ्या मनात असा विचार येतो हे षड्रिपू जर माणसाच्या स्वभावत नसते हे पृथ्वीवरील जिव चक्र कसे चालले असते म्हणुन देवानेच जाणीवपूर्वक या षड्रिपू ची निर्मिती मानवाच्या मनात केली असावी.  या मध्ये एकाच व्यवसाय असा आहे की जो षड्रिपू वर अवलंबून नाही तो म्हणजे शिक्षण. म्हणुनच शिक्षणाचे कार्य पवित्र कार्य म्हणतात.  कल्पना करा की माणसाच्या मनात राग, लोभ, क्रोध, मोह, मद, मत्सर, या भावनाच नसत्या तर………..  म्हणून षड्रिपू हे वाईट गुण असले तरी…………..

सुखी  संसारा साठी……  जसी भाजी मधे मिठाची गरज असते……. तस आहे  …… अन्यथा   जीवन नावाची भाजी अळणी होईल ना ……..

जसे एखादा पदार्थ बनविताना मसाल्याचे प्रमाण बिघडले…..किवा प्रमाणाबाहेर झाले तर पदार्थाची चव बिघडते………..

त्याचप्रमाणे….. माणसाची निर्मिती करीत असताना षड्रिपू नावाच्या मसाल्याचे प्रमाण बिघडले की……. बेचव पदार्थ तयार होतो……….. जसा बेचव पदार्थ आरोग्यासाठी घातक असतो त्याचप्रमाणे षड्रिपू चे प्रमाण बिघडलेला  बेचव पदार्थ समाजासाठी………

तरीसुद्धा……  think positive…….  Negative thanksgiving. …….

©अर्चना अनंत ✍️

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत