सई

Written by

दादर स्टेशनवर सुमनताईंना एका बाकावर बसवून तिकीट काढून आलोच म्हणत त्यांचा मुलगा राम तिकीट घरच्या दिशेने गेला..
सुमनताई राम सोबत आज गावी जाणार होत्या..तो परत येईपर्यंत विरंगुळा म्हणून इकड तिकडची गम्मत बघणं चालू होतं..सर सर सापासारख्या इकडून तिकडे सरपटणार्या रेल्वेगाड्या ..२ मिनीटं गाडी स्टेशनवर थांबलेल्या वेळात गाडीतले बाहेर आणी बाहेरचे आत ढकलले जाणारे गर्दीचे लोंढे .. फेरिवल्यांची लगबग.. गाडी पकडण्यासाठी लोकांची दादर्यावरून,प्लेटफॉर्म वरून पळापळ ..इतक्यात गर्दीत आईबाबांचा हात सुटून हरवलेलं एक छोटं पोरगं रडायला लागलं.. नि सुमन ताईंची तंद्री भंगली..त्या पटकन त्या बाळाजवळ गेल्या तोपर्यंत एक फुलवाली त्याच्या जवळ गेलेली ती ही लहानच ,तिच्या परिने त्याला फुल देऊन खेळवायचे, शांत करायचे प्रयत्न करत होती.. सुमन ताईंना त्याही परिस्थीत तिचं कौतुक वाटलं..घाई घाई ने त्यांनी त्या मुलाला कडेवर घेतलं नी जवळच्या पोलिसांकडे नेलं.. फुलवाली ही नकळत त्यांच्या मागोमाग चालत गेली..
पोलिस बाळाचे कपडे वगैरे पहिले तर त्यात खिशात एक चिठ्ठी मिळाली त्या  मुलाचे नाव,आईपप्पांचे नाव  ,मोबइल नं.,पत्ता सगळं व्यवस्थित लिहिलेलं..त्या नंबरवर फोन केला तर लगेच आईवडिलांशी संपर्क झाला, ते ही बिचारे बाळ सापडत नसल्यामुळे हवालदील झालेलेच होते.. मोजून १५ मिनिटात बाळ सुखरुपपणे आईबाबांच्या हातात होतं..
हे असं आपल्याला ही सुचलं असतं तर…?
सुमन ताई नकळत भूतकाळात हरवल्या.. ५-६ वर्षांपूर्वीची गोष्ट तेव्हा सुमन ताई, राम , त्याची बायको जान्हवी,आणि 3 वर्षांची चिमुरडी सई सगळे बाहेरगावाहुन घरी परत निघालेले.. जान्हवी आणि राम गाडीत खायला लागेल म्हणून खाण्या पिण्याच्या गोष्टी आणायला गेले.. सई सुमन ताईंसोबत खेळत होती.. बाकावर उभी राहुन बाजुच्या गाडीवरची गंमत बघत होती.. लोखंडी कढईत गरम तेलाचे चटके लागुन उड्या मारणारे छोटे छोटे वडापाव पाहतांना तिला मज्जा येत होती..इतक्यात समोर एक मुलगी गाडीतून उतरताना धपकन पडली .. बाकी लोक गंमत बघत बसले .सुमन ताई मात्र पटकन गेल्या नि तिला उठायला मदत केली.. तिला स्वत:कडली पाण्याची बाटली दिली आणी त्या माघारी वळल्या.. पण.. बाकावर सई नव्हती…..

त्या वेड्यासारख्या इकडे तिकडे शोधू लागल्या . राम आणि जान्हवी पण आले.. हे कळल्यावर दोघं ही हवालदील झालेले.. रडून रडून जान्हवीने स्वत:चीही तब्ब्येत खराब करुन घेतली.. सुमन ताई सुद्धा स्वत:लाच अपराधी समजायला लागल्या.. जान्हवी इतक्यात खूप चिडून बोलली-” मुद्दाम केलंत ना..तुम्हाला नकोच होती दत्तक मुलगी.. म्हणून अस वागलात ना काय केलंत माझ्या मुलीचं?कुठेय ती? सांगा लवकर सांगा.. ”
-“अगं तसं नाही गं.. हा, मला वाटत होतं तुम्ही दत्तक घेण्याची घाई करु नये अजुन फक्त 4 वर्ष तर झालेत लग्नाला..आणि डॉक्टर बोललेले ना तुम्हाला प्रॉब्लम नाही काही उशीरा होऊ शकेल बाळ म्हणून वाटत होतं ग पण तुम्ही निर्णयावर ठाम होतात तेव्हा मी मधे आले नाही.. ”
“-म्हणून मग आता असं वागलात? असा सूड उगवला त्या एवढ्याश्या जीवावर?”
-” नाही गं बाळा मी मुद्दाम काही नाही केलं.. ज्या पोरीने मलाच इतका लळा लावलाय..मीच तिच्या शिवाय राहू शकत नाही.आपण पोलिसात जाऊ नक्की सापडेल ती.. ”
जान्हवी त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागली..
-“आई नक्की सापडेल ना हो ती ..sorry मी रागात काहीही बोलले..आधी तुमचा नकार असला तरी आता तुम्ही तिच्यावर किती प्रेम करता माहितीये मला.. मिळेल ना हो आई आपली जुई..??”
“नक्की मिळेल..बेटा शांत हो तू..”
तिला समजावलं,पण स्वत:च साशंक होत्या ..
पोलिस स्टेशन च्या फेर्या झाल्या..
देवाला पाण्यात ठेवून साकडे घालुन झाले.. पण काही उपयोग नाही..
५ ६ वर्ष अशीच निघून गेली..
घराचं घरपण हरवलं..
सगळे अजुनही सईच्या आठवणीत जगणं विसरलेले..
खूप जिवाभावाचं एक माणूस दूर असणं आयुष्यावर किती परिणाम करतं ना..

आज हे चित्र पुन्हा जसं च्या तसं डोळ्यासमोर उभं राहिलेलं..इतक्यात डोळ्यासमोर चुटकी वाजली ;तश्या त्या भानावर आल्या..
“आज्जी ..ए आज्जी..अगं जा की घरी ..गेलं ते बाळ त्याच्या आईपप्पा जवळ.. कसला विचार करतीस एवढा..?”-फुलवाली बोलली आणी पुढे निघाली..
इतक्यात सुमन ताईंनी तिला आवाज दिला
-“अगं फुलवाली.. ”
ती मागे वळली..
…माझी सई पण एव्हढीच असेल ना..त्यांच्या विचारांची गाडी पुन्हा पळायला लागली.. कशी छोटीशी विठू माऊली..सावळा रंग..बोलके डोळे..चेहर्यावर हसू..सूर्याच्या किरणांनी उजळून गेलेलं हातातलं सोनेरी कडं .. मुकुटावर लालचूटूक गुलाबांची आरास..
फुलवाली पुन्हा वैतागली.. जोरात डोळ्यासमोर हात हलवत बोलली.. “बाई मी जाते तू विचार करत बास माझी अजुन बोहनी नायी झाली आन तू सारखी थांबवती..”
तिने हात हलवला तेव्हा त्यांना तिच्या हाताच्या पंजावर असलेलं तुळशीचं पान दिसलं..तिची जन्मखूण .. तिला घरी आणली तेव्हापासुन असलेली..
ओळख पटली..
.. सई..
फुलवाली- काय ?? मी  सई नाय..मला काय  कोन नाय नाव बिव ठेवायला मंग फुलवाली च म्हंता सगळे..तेच नाव ए माजं..”
“नाही तू माझी सई आहेस..”

एव्हाना रामपण सुमन ताईंना शोधत शोधत पोलिसांच्या desk जवळ आलेला..
“राम बघ सई.. आपली स­ई …”
त्यालाही ओळख पटली..
तिला आणि पोलिसांना सर्व कहाणी ह्या दोघांनी सांगितली..सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन तिला घरी न्यायची परवानगी मिळाली..
“बाळा.. आपल्या घरी चलशील ना आई वाट पाहतेय तुझी…..”
एकाच अटीवर..
मला रोज घरी अशी छान छान खूप सारी फुलं आनूं द्यायची आनि पुढच्या वेळी मला स्टेशनवर सोडून कुटेच जायचं नायी…..
Sorry बेटा पुन्हा असं अज्जिबात होणार नाही म्हणून राम कानाला हात लावून उठबशा घालायला लागला.. ते बघुन ती एकदम खळखळून हसली.. घरी जाताच जान्हवीच्या कुशित शिरल्यावर मात्र दोन्ही मायलेकींच्या डोळ्यात आनंदाचा महापूर सुरु झाला..
जान्हवी-Thank you आई..आज तुमच्या मुळे माझी चिमणी परत मिळाली..आणि आपल्या चिमणीलाही तिचे आई ,बाबा ,आज्जी परत मिळाले.. हे म्हणतच जान्हवीही सुमन ताईंच्या कुशित शिरली..
आज त्यांचं कुटुंब पुन्हा एकदा खर्या अर्थाने पूर्ण झालं होतं..पुन्हा घराला घरपण मिळालं होतं..आनंदाचं वारं घरात खेळत होतं..
वरून विठू माऊली सुद्धा त्यांची दृष्ट काढत होती..

-प्रणाली.

(मित्र मैत्रिणींनो, गर्दीत लहान मुल हरवलं तर काय परिणाम होऊ शकतो हे मला सांगायचं होतं. एक कुटुंब विस्कळीत होऊ शकतं.. इथे फार वाईट असं घडलेलं नाही पण न कळतं मुल चोरीला जाणं,त्यांना भीक मागायला लावणं,,drugs देऊन झोपवून ठेवणं,विकणं हे काहीही घडू शकतं..आपण आपल्या परिने काळजी घेऊन हे टाळू शकतो..जसं लहान मुलांना समजायला लागल्यावर घरचे मोबाइल नंबर पाठ करायला लावणे,पत्ता पाठ करुन घेणे,काहीही अडचण आली तर आधी पोलिसांकडे जाणे,अनोळखी लोकांकडून चॉकलेट वगैरे काहीही न घेणे असं सगळं शिकवून हे टाळता येईल..आणि फार लहान बाळ असेल तर अशी किमान माहिती असलेली चिठ्ठी बाळाच्या कपड्यात ठेवता येईल..
बाकी तुम्ही काळजी घेत असालच…
Bbyeee… happy sunday..)

Article Categories:
सामाजिक

Comments are closed.