जेव्हा चांगुलपणा ची “replacement” मिळत नाही

Written by

                       तीच नाव काशीबाई आता वय खुप झाल होत आणि सारखी पाय पिट करण जमत नव्हत म्हणून ती तिथेच असायची दिवस भर जुन घर होत तिच्या सासरेबुवानी बांधलेल. जुन्या काळातल दगडी बांधकाम. असच राहायला दिल होत कुणालातरी त्यांच घर बांधायच होत आणि सोय नव्हती म्हणून. जेवण करुन बांधून घेऊन यायची दुपारी साठी. जनावरांचा गोठा आणी कोंबड्या पण होत्या तिथेच. अंधार पडायला लागला की घरी जायची ती बंगल्यात.                            आता अलिकडे तिला खुप आठवायच मोठ्या सुनेला आपण दिलेली वागणूक आणि तिने आपल्या बद्दल एका शब्दाने न केलेली तक्रार. कारणे देखील तशीच होती त्याला. तिची मोठी सुन आता गावी फारशी येतच नव्हती कारण नवरा बायको मध्ये काहितरी बेबनाव होता ज्याच कारण कुणालाच स्पष्ट माहित नव्हत. ती यायची पुर्वी पोरांना सुट्टी लागली की उन्हाळ्यात. एक महिना असायची. ती त्यावेळची पदवीधर होती पण परिस्थितीशी जुळवून घेण्याचे संस्कार विसरत नव्हती.
म्हातारीला आठवु लागले एक एक गोष्ट नजरे समोरुन सरकु लागली एकदा तिला कुणा नातेवाईकांकडे लग्ना साठी जायचे होते आणि कानातले तिजोरीत ठेवले होते म्हातार्याने आणि ते घेई पर्यंत शेतात निघुन गेले म्हातारे बाबा. पण त्याचवेळी सुनेला नविन फुले आणि झुमके आणले होते ते तिने घातले देखील नव्हते अजून ते तिने सासूला घालायला दिले. परत आल्यावर सासू काढून देऊ लागली तर सुन म्हणाली राहू दया तुम्हाला मी काय केव्हाही करेन तुम्हाला इथे कुठून मिळणार आणि ही गोष्ट घरात पण पटवून सांगितली कारण म्हातारे बुवा तापट स्वभावाचे होते.
दुधाचा रतिब असायचा तर आपण त्या पोरांना दुध घेऊन येत जाऊ नका म्हणून सांगायचो आणि मग आपली सुन सगळ काम झाल की भर उन्हाची जायची पण कधीच कुरबुर करायची नाही. चुलीवर जेवण बनवायची जळण चांगल नसल तरी असेल तस करायची. बैलांना पाणी पाजायला लग्नातली पितळी कळशी ठेवून गेली होती का तर ती जास्त जड नव्हती आणि पाणी आणायला सोप पडायच. त्या काळी लाईट आली नव्हती वस्तीवर रात्री रॉकेल चे दिवे असायचे सुन आतल्या घरात उखळात शेंगदाणे कुटायची तर आपण मुद्दाम दुसरा दिवा घेऊन जायचो शेंगदाणे खातेय का ते पहायला. सुनेच्या माहेरची परिस्थिती बरी होती म्हणून आपल्याला वाटायच की श्रीमंता ची आहे म्हणून आपण तिरस्कार करायचो. त्यावेळी आपल्या जाऊबाई जवळ वाईट साईट बोलायचो. हया सगळ्या गोष्टी आता खुप सलत होत्या कारण आता धाकटी सुन सगळी सूत्रे सांभाळत होती. लेकाच्या गैर हजेरित खुप टाकुन बोलायची. थोरली मोठ्या घरची आहे आणि आपल्याला खटकायच म्हणून तर ही गरिबाची करुन आणली चार बहिणी आणि पाठीवर एक भाऊ. हिच्या बहीणींची लग्न पण काशी बाईच्या धाकट्या लेकानेच केली होती. सुनेच्या बाळंतपणात सगळा खर्च केला होता. एकदा म्हातारी पाऊस आला म्हणून पटकन घरात शिरली पायाचा चिखल फरशीला लागला तर सुनेने किती कांगावा केला म्हातारी म्हणाली मी उद्यापासून जुन्या घरीच राहीन तर सुनेने व लेकाने येताना जुन्या घराच्या खोलीला कुलुप लावलेच नाही म्हातारीने बंगल्यात येउन मग खुप त्रागा केला तिला पदोपदी आठवत होते जिच्या सोबत आपण नीट वागलो नाही तीने आपल्याला दुखवल नाही पण ही तर खुपच आगाऊ निघाली. म्हातारी आता धाकट्या सुने सोबत सलगी नसलेल्या बायकांजवळ जुन्या आठवणी काढत असे. तिला आता कळत होत की चांगुलपणा हा मनाचा असतो गरिब श्रीमंती वरुन नाही. थोरल्या सुनेला आता सुन आली होती.त्या दोघी सासूसुना नाही तर मायलेकी मैत्रीणी झाल्या होत्या. शेवटी काय तर तिने सासूप्रति केलेले चांगूलपणाचे कर्म तिच्याकडे फिरुन आले होते नाहितर उगीच का नवरा सोबत नसताना तिला कधीच एकट वाटत नव्हत. म्हातारी म्हणायची तीच खुप चांगल झालय आणि नकळत मन भरुन आशिर्वाद दयायची.

Article Categories:
इतर

Comments are closed.