ज्ञान रुपी दीप… अज्ञान रुपी अमावस्या.. दीपअमावस्या

Written by

माय.. मी आता वस्तीतून आलो… आज समद्यायच्या घरी आपल्या झोपडीतल्या वाणी दिवे लागले हाय.. थे लोक बी आपल्या वाणी गरीब झाले काव?…. अज्या बोलला(अजय)

नायी पोरा.. थे गरीब नायी झाले..
आज “दीप अमावस्या” हाये.. आजच्या दिसी घरामधी असलेल्या दिव्यायची पूजा करते लोक.. अन दिवे लावते.

माय… मग आपल्या घरी त रोजच असते व हे दिव्यायची अमावस्या.. अज्या

मनूनत तुले मणतो… लय मोठ शिक, शिकून साजरा सायब बन… आपल्या झोपडीत रोज दीप अमावस्या हाये.. कारण आमच्या जवळ ज्ञान रुपी दिवा नायी...आमी चार पुस्तक शिकलो असतो तर कामधंदा केला असता.चार पैक ज्यादा मिळवले असते.

माय…मी लावीन ज्ञान रुपी दिवा अन अज्ञान रुपी अमावस्या दूर करीन. मग आपण बी “दीप अमावस्या”साजरी करू दिसावर….अज्या

100शब्दांची गोष्ट.. समाप्त ©®जयश्री कन्हेरे सातपुते ?धन्यवाद ?फोटो साभार गुगल 

Article Categories:
मनोरंजन

Comments

  • छान लेख प्रेरणादायी.

    Triveni 2nd ऑगस्ट 2019 9:26 pm उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत