ज्येष्ठत्व

Written by

 

ज्यावेळेस मी खूप लहान होते,त्यावेळेस आपल्या पेक्षा मोठ्या वडीलधाऱ्या वयक्तिकडून दोन ओळीं मी नेहमीच ऐकत असे.त्या दोन ओळी म्हणजे “लहानपण देगा देवा, हाती मुंगी साखरेचा रवा.”
त्यावेळेस असं वाटायचं की,सर्व मोठ्यांना लहानपणच का आवडत. मला तर असं वाटायचं ,की मी केव्हा मोठी होईन आणि आकाशाला गवसणी घालीन.
पण निसर्गाच्या नियमाला कोण चुकतंय,सर्वाना त्यातून जावंच लागतं.
बालपण सरलं, तारुन्यही स्वप्नांना झुलवण्यात गेलं. मुलीच लग्न झालं, मुलगा नौकरीवर लागला .इतकं सर्व होईपावतर वयाची पंचेचाळीशीओलांडलीच.आता खूप फावला वेळ मिळतोय.परत एकदा एकटेपणा खुनावतोय,पण मी मात्र त्याला माझ्याकडे फिरकू सुद्धा न द्यायचा पक्का विचार केलाय.संसार चालवताना ,मुलांना मोठ आणि संस्कारीत करताना मला काय करायचय? यांकडे मात्र खूप दुर्लक्ष झाले म्हणण्यापेक्षा मला तशी आवश्यकताच भासली नाही.कारण मुलं आणि त्यांच्या गरजा यातच वेळ कसा निघून गेला कळलच नाही.
पण आताशा एकटेपणा जाणवतोय,माझ्या आवडीचे माझे बेस्ट friend म्हणजे माझी पुस्तक , paintigs चे ब्रश,कलर्स,पेंसिल्स, पेन,पेपर,माझा आवडीचा writing टेबल हे सर्व जणू मला चिडवतात,असा भास होतोय.जणू काही ते मला म्हणतायत,काळजी करू नकोस जरी तुझी पाखरं उडाली आपल्या पंखांना बळकट करायला , तरी आम्ही आहोत तुझ्या सोबतीला….मी खरं सांगतेय,परत मी त्यांना आपलंसं केलंय.
मैत्रिणींनो आपणा सर्वांना माहिती आहे की,आयुष्याचं उत्तरार्ध हे खूप कठीण असतं, नवीन नवीन बिमाऱ्यानि पछाडन्याच हे वय असतं. पण….
ह्याला न घाबरता आपण जर सकारात्मक विचारांनी जगायला सुरवात केली,तर अशक्य असं काहीच नाही.
नवीन कार्य करायला थोडा वेळ लागेल,पण हिम्मत नाही हरायची, यशस्वी नक्कीच होऊ,असा आत्मविश्वास बाळगा.
आयुष्याचं उत्तरार्ध जगतांना आपण किती वर्षाचे झालोय,हे कशाला बघायचं….मन जर तरुन असेल ना तर वयाच्या
सत्तरीतही वार्ध्यक्याचा लवलेशही जाणवणार नाही.
कुणाला नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं तर तो खुश होतोना! मग…वयोमानापरत्वे ज्येष्ठ होणे म्हणजे आपले प्रमोशनच ना! मग का दुःखी व्हायचं.
मी मात्र पक्का विचार केलाय,येणाऱ्या वेळेला स्वीकारायचं,निराशेची झळ सुद्धा पोहचू द्यायची नाही.जेवढं आयुष्य देवानी आपल्याला दिलंय, तेवढं दिलखुलास जगायचं,कारण आपल्याजवळ ना बऱ्याच अनुभवांची शिदोरी असतें, कारण बऱ्याच उन्हाळ्या,पावसाळ्याचा त्यांत समावेश असतो.
माझ्या मुलांच माझ्यावर खूप खूप प्रेम आहे,त्यांनी माझ्यासोबत घालवलेले अमूल्य क्षण मला नवसंजीवनीचे बळ देतात..मी काहीतरी नवीन करावं ह्यासाठी नेहमीच प्रोत्साहित करतात, त्यांची इच्छा मी मात्र नक्किच पूर्ण करणार.

लता राठी

Article Categories:
इतर

प्रतिक्रिया व्यक्त करा