ज्वारीची भाकरी… आणि तिचे महत्व

Written by

*ज्वारीच्या भाकरीचे महत्व* …

?✒️जयश्री कन्हेरे -सातपुते

आज मला अचानक आठवलं माझं लहान पण सहा /सात वर्षाची असेल. आई सोबत आईच्या माहेरी म्हणजेच माझ्या आजी -आजोबांन कडे गेले होते. छोटस गाव.. छोटी -छोटी घर व प्रशस्त अंगण.. माझ्या आजीच्या घरी अंगणातच विहीर होती. घराजवळ विठ्ठल मंदिर होतं.मंदिराच्या आवारातच खुप सारी फुलझाडं गाव म्हंटल की आजीचं गाव डोळ्यासमोरून जातं, मला आठवत अजूनही सगळं आम्ही शहरातून आलो म्हणून लोकं बघायला यायची. आजी कडे गेल्यावर आई भाकरी बनवायला लावायची आवडीने.. आमच्याकडे कधी भाकरी केलेल्या आठवत नाही मला.. आई करतही असेल तरी पण मी खाल्ली नाही कधी..
आजी कडे गेल्यावर त्या… चुलीवर बनवलेल्या गोल गोल भाकरी बघून मी “हे काय ग आजी ”
“भाकरी व बाई” आजी म्हणाली.. (आमच्याकडे लहानमुलीला बाई म्हणतात लाडाने )
मी कधी खाल्ल्या नाही म्हणून, “ये आई मला नाही खायच्या या भाकऱ्या, मला पोळी पाहिजे ”
अग केली आहे तुझ्यासाठी मला आवडते न म्हणून मी माझ्या आईला बनवायला लावल्या भाकरी “… आई

त्यावेळी मला या भाकरीच महत्व कळलं नाही.. पोळी चवीला छान… बनवायला सोपी आणि श्रीमंतांची ओळख करणारी होती माझ्या लहानपणी 25वर्षाआधी माझ्या वयाच्या सहा -वर्षात बर का…

गव्हाचे दुष्परिणाम पण माहिती नव्हते.. हळू हळू या ज्वारीची जागा गव्हाणे घेतली आणि भाकरी जेवणातून बाद झाली.मला आठवत 1 /2रुपये किलो ज्वारी असेल व गहू 5/6 रुपये किलो.. तांदूळ नाही आठवत. गावात बाबांची आई विकायची न घरून धान्य.. त्यामुळे लक्षात राहील ते.. तेंव्हा राशन कार्ड वर असं बमबाट धान्य नव्हतं मिळत.. आता काय गरीबही दोन दिवस मजुरी करतो तेलामिठाची सोय म्हणून, बाकीचं सरकार देतोय की गहू, तांदूळ, डाळ. तीही इतकी की लोकं ते राशन कार्डवरच धान्य साठवून विकतात. तो आपला विषयच नाही.. तर भाकरी महत्वाची का? हे महत्वाचे आहे..
स्वस्त असल्यामुळे गरिबांच्या जेवणात भाकरीला रोजच स्थान होतं.. गव्हाच्या पोळ्या किंवा पुऱ्या या सणालाच व्हायच्या..म्हणून की काय त्यांच आरोग्य सुदृढ असायच..
आता आजूबाजूला बघा, BP, शुगर, मूळव्याध, किडनी स्टोन, ऍनिमिया, अतिलठ्ठपणा, असे अनेक रुग्ण आढळतात. घरातच मिळतील एक… दोन मोठ कुटुंब असेल तर लहान असेल तरी एक तर नक्कीच सापडतो रुग्ण.
आता म्हणाल “हे कॉमन झालय आता. या बिमाऱ्या नाही तर श्रीमंत असण्याचं सर्टिफिकेट आहे ”
हो नक्कीच तुम्ही श्रीमंत झाल्याचं सर्टिफिकेटच आहे या बिमाऱ्या.. तर आता ज्वारीची भाकरी का खावी, ज्वारीच्या भाकरीचे फायदे व ती कधी खावी त्याविषयी थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे.. जी माझ्या वाचण्यात आली ती तशीच सांगतेय….

गव्हामुळे तुमच्या रक्तातली साखर अत्यंत नाटकीय पद्धतीने वाढते. काही विदेशी संस्कृतींमधले लोक जे गहू खात नाहीत ते यामुळेच अधिक सडपातळ आणि निरोगी असतात.

*जेवणात का खावी ज्वारीची भाकरी… ?*

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या अमायनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते.

बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होत नाही.

तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते.

ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृदयरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे रक्तदाब (ब्लडप्रेशर) नियंत्रणात राहतो.

भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

*ज्वारीचे फायदे*

1) ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.

2) ज्वारी पचनास सुलभ असल्यामुळे आजारी व्यक्तीस दूध भाकरी फायदेशीर ठरते.

3) ज्वारीमुळे पोटाचे विकार कमी होतात.

4) रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.

5) हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

6) शरीरातील इन्शुलिनची उत्पादकता कायम, योग्य प्रमाणात व कार्यक्षम ठेवण्यास मधुमेह असणाऱ्यास, तसेच इतरांनाही ज्वारीचा वापर उपयुक्त ठरतो.

7) शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करण्यासाठी, कातडीचे आजार, जठरातील आम्लता कमी करण्यास उपयोगी.

8) महिलांच्या गर्भाशयाचे आजार, प्रजोत्पादन संस्थेचे विकार असणाऱ्यांना ज्वारी उपयोगाची आहे.

9) ज्वारीत काही घटक कर्करोगावर नियंत्रण आणतात.

10) शौचास साफ होण्यासाठी ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

11) काविळीच्या आजारात पचायला हलक्या अन्नाची आवश्यकता असते. त्यामुळे काविळीच्या आजारामध्ये व नंतर वर्षभर ज्वारीच्या भाकरीचे नियमित सेवन केल्यास फायदेशीर ठरते.

*ज्वारीला दररोजच्या आहारात प्राधान्य द्या आणि गव्हाचा सणावाराला उपयोग करा.*
काही भागात अजूनही सगळेच लोकं निदान एक वेळ तरी भाकरी खातात…ते खुप छान आहे. पण नवी पिढी….त्यांना भाकरी बनवता येत नाही व करण्याचा कंटाळा येतो तसेच नेहमी खात नाही म्हणून आवडत पन नाही.. मी पण त्यातलीच एक बर का.. आता मात्र म्हणजे 4वर्षाआधी मला या ज्वारीच्या भाकरीची महती कळली व कशीही का बने न… मी भाकरी बनवणे शिकले. आणि कधीतरी नावडत्या “भाकऱ्या ” मला आवडू लागल्या. माझी मुलगी मात्र खात नाही. कदाचित माझ्याएव्हडी झाल्यावर तिलापण या ज्वारीच्या भाकरीच महत्व कळेल .
तोपर्यंत वेळ नको निघून जायला म्हणजे झालं..

समाप्त…….?जयश्री कन्हेरे -सातपुते
थोडक्यात पण गमतीशीर या ज्वारीच्या भाकरीचे महत्व कसे वाटले ते.. सांगा. likeकरा. व माहिती उपयोगी असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद ??????

प्रतिक्रिया व्यक्त करा