टिकली, मंगळसूत्र आणि जोडवे

Written by

खरं तर टिकली, मंगळसुत्र आणि जोडवे हे आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा एक भाग. त्यामागे शास्त्रीय कारण सुद्धा आहेत. लग्न झालेल्या स्त्रियांचा हमखास हा शृंगार असतोच, पण या गोष्टी जर एखादीला आवडत नसेल तर ते लादण्यात काही अर्थ आहे का?

परवाच घरी पाहुणे आले, एक आजीबाई होत्या, आल्या आल्या माझ्या पायांकडे त्यांचे लक्ष, आणि डोळे मोठे करून ‘जोडवे कुठे आहेत?’ हे प्रश्न. त्यांना काय उत्तर द्यावं हे खरंच समजत नव्हतं.

कॉलनीतल्या बायका गॉसिप करतात, ‘अगं अमक्याची सून काहीच घालत नाही बर का, काही संस्कारच नाहीत’

अहो, तुम्हाला असलं स्वातंत्र्य मिळालं नसेल कधी पण म्हणून दुसऱ्याला का नावं ठेवता?

बहुतांश वेळचा माझा हाच अनुभव आहे, एखादी नवीन लग्न झालेली स्त्री कोणासमोर आली की तिला नखशिखांत न्याहाळायचे, कुठे काही कमी आहे का, नाकात, कानात,पायात, गळयात सगळं आहे का हे लोकं बघत असतांना समोरच्याला सुद्धा कळतंय की आपण त्यांच्याकडे अशा नजरेने बघतोय तरीही सवयीने या गोष्टी करणं… खरंच सगळ्यांनाच हा अनुभव असेल.

भलेही मग त्या स्त्री मध्ये एखादी चांगली कला असेल, ती उच्चशिक्षित असेल पण शृंगारासमोर या सर्व गोष्टींना दुय्यम मानणाऱ्या व्यक्ती खरंच डोक्याला ताप.

पाहुण्यांनी यावं, स्त्रीच्या शृंगारापेक्षा तिच्यातले गुण पाहावे, तिच्याशी तिच्या शिक्षणाबद्दलच्या , करियर संबंधित गोष्टी विचाराव्या हे किती लोकांना जमतं??

टिकली, मंगळसूत्र घालणे ही सक्ती नसून आजच्या काळात आपापल्या आवडीचा भाग आहे, त्यात हे कोणाला आवडत नसेल तर नक्कीच निर्बुद्धपणे हा शृंगार करून केवळ लोकांसाठी करण्यात अर्थ नाही.

साडीवर हा शृंगार उठून दिसतो यात काही वाद नाही, पण निदान जीन्स शर्ट वर तरी या सगळ्यांची सक्ती नका करू, नाहीतर देश आणि विदेशाची भयंकर फॅशन एकत्र आल्यासारखी दिसते.

आजकाल कित्येक स्त्रिया हे सगळं न घालणं पसंद करतात, आणि त्यांच्या या निर्णयाचा आदर व्हायला हवा, शेवटी प्रत्येकाला मतं आहेत आणि स्वातंत्र्य आहेच.

एखाद्या स्त्री चे व्यक्तिमत्व लग्ना आधी खूप सुंदर असते, मात्र लग्न झालं की तिच्यावर हा शृंगार लादून तिचं व्यक्तिमत्व बदलून टाकणं हे मला तरी न पाटण्यासारखं आहे.

तुमची मतं काय आहेत ते सांगा कंमेंट मध्ये .

 

असेच सुंदर सुंदर लेख वाचण्यासाठी आमच्या खालील फेसबुक पेज ला लाईक करा

https://www.facebook.com/irablogs

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत