“…. डिफॉल्ट पीस सारखेच !! “

Written by

तसं तर ते दोघे एकदम हटके आहेत…
हा , डिफॉल्ट पीस सारखेच…
ती पब्लिक प्लेसमध्ये पण मोठ्या मोठ्याने हसत बसणार..
तो तर एकतांत देखील फक्त स्मित हास्य करणार…
ती भर रस्त्यात त्याचा कान पिळणार…
पण त्याला ते सारं बालिश वाटणार…
तीला उनाडपणे फिरण्याची भारी हौस …
तो PMT मध्ये लोकांना औबसर्व करत बसणार…
तसं तर ते दोघेना एकदम हटके आहेत…
हा , डिफॉल्ट पीस सारखेच…
कॉफीशिवाय तिचा दिवस सुरू होत नाही…
टपरिवरचा चहा त्याला अजूनही सोडवत नाही…
तिला नाटकं आवडतात….
अन याला भारी कन्टेन्ट वाले सिनेमे…
इंग्लिश गाण्याचा हिला लई नाद…
तर तो अजूनही किशोर कुमार ऐकत बसणार…
तिला दररोज काहीतरी नवं हवं असतं…
तिकडे त्याला जुन्या गोष्टी सोडवत नाहीत… तसं तर ते दोघे एकदम हटके आहेत…
हा , डिफॉल्ट पीस सारखेच…
पिझ्झा बर्गर हीचा जीव की प्राण…
गरम गरम भजी शिवाय याला चैन पडत नाही…
ती याला DJ नाईट ला जाण्याचा आग्रह धरणार…
अन हा बहाद्दर शास्त्रीय संगीताचे तिकीट काढणार…
हो , कधी-कधी होतात भांडण…
ती आदळआपट करत रडत बसते…
तो कोपऱ्यात जाऊन रुमालाने डोळे पुसतो…
नाही म्हटलं तरीही त्या दोघांचा जीव तुटतो…
तिची बडबड आणि त्याची शांतता
हेच त्या दोघांच जग आहे…
तसं तर ते दोघे एकदम हटके आहेत…
हा , डिफॉल्ट पीस सारखेच…

 

( टीप – ही कविता एका अनामिक कवीच्या कवितेचा आधार घेऊन लिहिली आहे !! सारे श्रेय त्या अनामिक कवीचं !! मी केवळ निमित्त मात्र आहे )

Article Categories:
कविता

प्रतिक्रिया व्यक्त करा