तंटा नाय तर ………?

Written by

अरे…..हे असं होऊच कसं शकतं?

दोन आख्खे दिवस…..इम्पॉसिबल!

मी पण त्याचाच विचार करतोय?

नाही, तुझं माझ्यावर प्रेमच राहीलं नाही आता?

अगं हे काय …..

गेले दोन दिवस तुझं लक्षच नव्हतं माझ्याकडे?

असं नाही गं……

तुला एकही गोष्ट खुपू नये माझी, नीट लक्ष असतं तर पन्नास गोष्टी खुपल्या असत्या……

काल सकाळी चहा एवढा गुळमाट झाला होता , तू चहा वरून माझ्या स्वैंपाकावर घसरून माझी उणीदुणी न काढता निघून गेलास?

कसा??

आणि काल मी, तू ऑफिसमध्ये असताना तुला कॉल केल्यावर अजिबात न व्हसकता चक्क 6 मिनिट आणि 20 सेकंद न पकता माझ्याशी बोललास?

कसा??

आणि काल संध्याकाळी फिरायला जाताना मला मनसोक्त नट्टापट्टा करून दिलास…..

एवढा!! एवढा पेशन्स कधीपासून आला तुझ्यात?

वरून तू मला कॉम्प्लिमेंट पण दिलीस?

Tell me howwwww??

इतके वर्ष “बरी” दिसतेस, मधेच अडकणारी तुझी गाडी ”छान” पर्यंत पोचलीच कशी?

तुम तो ऐसें ना थे कभी !?

तुला झालय तरी काय???? मन उडालं का तुझं माझ्यावरून?

अगं….अगं….. अगं…… थांब जरा थांब

तू मला म्हणतेस, दोन दिवस झाले तुझं तरी लक्ष आहे का माझ्याकडे?

उठता बसता माझ्या नावाने खडे फोडणारी तू एवढी साळसूद झालीस तरी कशी?

काल चहा पिताना कपाचा कान तुटला माझ्याहातून तर तू हात मोडलेत का वरून सुरू होऊन माझ्या सगळ्या जन्मांतल्या वेंधळेपणाबद्दल ताशेरे नाही ओढलेस???

कसं काय??

ऑफिस मध्ये फोन केलास तेव्हा नेहमीप्रमाणे पकपक सुरू न करता पाच मिनिटं बोलू शकते का, वेळ आहे का असं विचारलंस मला?

कसं बाई कसं??

नट्टापट्टा करताना पहिल्यांदा माझी ओढणी कुठाय, बघ ना जरा, कंगवा बेड खाली पडला वाटतं, वाकून काढ ना जरा , एकमेकांत अडकलेली कानातली गळ्यातली सोडवायला नाही लावलीस, सगळं तुझं तू गुपचूप करत होतीस, मी निवांत बसलेला बघवलं चक्क तुला?

Tell me howww??

आता सांग कोण बदललं…..तू का मी?

अय्या कसं झालं रे असं?

माझंच चुकलं मी नको असं वागायला पाहिजे होतं…..

जाऊदे ग माझंही चुकलंच की……

असा ट्रॅक सुटायला नको हं आपला……☺️

भांडाभांडीत वेळ किती छान जातो नाही…..कसंनुसंच झालेल मला तर ……?

म्हटलं एवढा प्रेमाचा माहोल आहे सगळीकडे….आपण पण बघूया थोडसं शिंपडून…..

Exactly, मी पण तोच विचार केला ग?

नाही बाबा नाही,हे आपल्याला झेपणाऱ्यातलं नाही?

हो ना, कित्ती प्रेशर आलं होतं मला तुझ्या इतक्या सालस वागण्याचं?

मलाही…….?

चल जाऊ दे, झाल गेलं विसरून जाऊ आणि पुन्हा नव्याने संसाराला सॉरी सॉरी भांडायला लागू…….

फिलिंग सो मच भांडू भांडू ??

Yeh… Me too?

 

©️स्नेहल अखिला अन्वित

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा