तिचं काय चुकलं?

Written by

( नमस्कार मी खुशी शिंदे तुमच्या साठी घेऊन येत आहे एक सत्यघटनेवर अधारित कथा
गोपनीयता राखण्यासाठी फक्त नाव व स्थळ याबरोबरच इतर थोडा बदल केलेला आहे
कथा मोठी असुन पार्ट मध्ये लिहिली जाईल)

तीचं काय चुकलं?

लेखिका: खुशी शिंदे

अजय व निता च्या घरात आज सकाळी पासुन खूप धामधूम चालली होती. शुभेच्छा देण्यासाठी कितीतरी कितीतरी काॅल येत होते. आज गावीही तीचा भव्य सत्कार ठेवला होता.
कालच upsc चा रिजल्ट आलेला आणि आपली नितु IPS झाली होती. नितु खिडकीतुन बाहेर बघत बसली होती. हळुच अजयने मागुन येवुन तीला मिठी मारली आणि हळुच कानात पुटपुटला, ” Thanks ”
तीने वळुन त्याच्या कडे बघितले. तिचे डोळे भरून आले आले, तिच्या मनातील घालमेल त्यालाही समजली. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन त्याने नेहमीच वाक्य म्हणलं ” मी आहे ना! ” आणि ती गोड हसली. हे वाक्यच तर तीची ताकद होतं. तेवढ्यात सासुबाईंचा आवाज आला.
“नितु कार्यक्रम ला जायला साडी कुठली घालु गं? ”
आणि ती पटकन त्याच्या खोलीत पळाली.

अजय व नितु च्या लग्नाला ५ वर्ष झाली होती २ वर्षाची गोड परी त्यांच्या आयुष्यात आली होती. मायाळू सासु, प्रेमळ सासरा, आणि भावासारखे प्रेम करणारा दिर
सगळं कस गोकुळासारख घर होत. अजयला चांगली सरकारी नोकरी होती. आणि आज तर नितु ips झाली होती.
पण हे सगळं नितु ला सहज मिळालं होतं का?
तीचा भुतकाळ खरचं काय असेल …… ?

दुपारी नितु सत्कारासाठी गावी जायला निघाली.गाडीच्या वेगासोबत तिच्या मनातील विचारांनी सुध्दा वेग घेतला .नकळत तिच मन भूतकाळात जाऊन पोहचल . रामावर आणि राधा बाईचं पहिलं आपत्य म्हणजे नितु लग्नाच्या 7वर्षानंतर झालेली. तिच्या पाठीवर भाऊ पुन्हा बहीण पुन्हा भाऊ असे 4 भावंडं झाले. नितु लहान पणा पासून हुशार होती. गोरी गोरी पान गोबऱ्या गालाची, छोटस नाक ,घारे डोळे असलेली नितु अगदी बाहुली सारखीच दिसायची बोलायला पण चुन चुणीत होती दिवस जात होते.नितु मोठी होऊ लागली रामरावांची नितुला शाळेत टाकले. छोटीशी नितु शाळेत जायला लागली.अभ्यास आवडीने करायची. कविता म्हणायची. भावंडासोबत मस्ती करायची. दिवस सरत होते. आणि नितु सोबत तिचा भावंड पण शाळेत जाऊ लागली. पण नितुच्या लहान भावाला मात्र अभ्यासात काही रस नव्हता.आता शाळेत व बाहेर दोघांची तुलना चालु झाली होती. जशी जशी नितु मोठी होऊ लागली तसतसं तिला एक गोष्ट जाणवू लागली. ती म्हणजे घरातील भेदभाव भेदभाव ???
होय,भेदवावच ! मुलगा व मुलगी भेदभाव तस रामरावांच कुटुंब शेतकरी.घरी शेती पण भरपूर होती. पण विचार मात्र मागासलेले होते. अस म्हणायला हरकत नाही.
रामरावांना वाटायचं मुलगा शिकुन मोठा अधीकारी व्हावा. पण त्याला अभ्यास सोडून इतर उद्योग आवडायचे. नितु हुशार, पण तरीही रामरावांना तीच कौतुक नव्हतं. दोन्ही मुलांना रामरावांनी चांगलं खुराक लावला. पण पोरींना रोजच जेवण मिळायचं.नितु पाचवीला गेली होती. तिचा अभ्यास वाढला होता आणि घरातलं काम पण वाढलं होत. सकाळी उठून शेण काढायचं दूध घालून यायचं , शाळेतून आलं की भाकरी शिकायच्या असा दिनक्रम चालु झाला . नितुला कामाचा कंटाळा यायचा . तिला पुस्तकं वाचावी वाटायची . कविता म्हणान्या वाटायच्या. पण काय करायचं……….
एकदा नितु शाळेतून घरी आली तर रामरावांनी गावावरून सफरचंद आणले होते . त्यांनी मुलांना एक एक सफरचंद दिल. आणि नितुला आणि गीताला ( लहान बहीण ) अर्ध-अर्ध कापून दिल.नीताला खूप वाईट वाटलं तुने रामरावांना विचारलं ” बाबा तुम्ही भाऊ ला अन दादाला आख्य सेफ दिला आणि मला अन नीताला अर्धा का दिला आम्हाला पण आख्खा पाहिजे ” तेव्हा रामराव ओरडले.”पोर हायत ते . शाळेत मुलगा- मुलगी एकसमान असतात असं शिकणाऱ्या वर्षाच्या नितुला मुलाला पूर्ण फळ आणि मुलीला अर्ध का भेटत याचा अर्थ काही केल्या कळेना.
एकदा असच आज्जीन लोणी कढवल तूप काढून उरलेल्या खरवडीत साखर टाकून भाऊला खायला दिल. ते बघून नितुन पण मागितलं खायला तर लगेच आजी खेसकली ” तुला कशाला पाहिजे पोरीच्या जातीला ” खातांन कुटून अन जातान उठून ” परक्याच धन ते ” नितुला काही कळलं नाही. नीतून भावाच्या वाटीत हात घालून तूप साखरेचा तोबरा भरला तेवढ्यात भावानं बोब जोरात बोब मारली ” आज्जे , हीन माझं तूप खाल्लं ! आज्जीन रागा रागात फुकणी फेकून मारली. नितुला वर्मी घाव बसला गळ्यातून हुंदका बाहेर पडला. डोळ्यातील पाण्यासोबत मनातील तूप खाण्याची वासना पण वाहून गेली.
आज तिला कळलं होतं. तिच्या कडून पाप घडलय. हो ! मुलगी म्हणून जन्माला आल्याच पाप. रोज घरात मिळणारे धडे एवढे अनुभव देऊन गेले की शाळेतले समानचे धडे मात्र खोटे वाटायला लागले………
तीच मन तिला एकच प्रश विचारत होता की मी मुलगी म्हणून जन्मले ह्यात माझं काय चुकलं ? क्रमशः

( काही अपवाद वगळता अजून ही खेड्यापाड्यात ही वास्तूस्थिती पाहायला मिळते, तुम्हाला काय वाटतं ).#तीचं काय चुकलं?

पार्ट-2

लेखिका – खुशी शिंदे

आता बघता बघता नीता आता आठवी ला गेली होती. अभ्यासासोबत ती इतर उपक्रमात पण सामील भाग घ्यायची.शाळेत प्रत्येक स्पर्धेत नीतूचा पहिला नंबर असायचा. ती उत्तम वक्ता होती .तसेच कवियत्री पण होती . मनातले सारे भाव ती कवितेत उतारावयाची.शाळेत सगळ्याची आवडती होती. पण घरात नावडती बनत चालली होती.शेजारच्या मुली विणकाम करायच्या,सुट्टीच्या दिवशी शेतात कामाला जायच्या रांगोळी काढायच्या पण नितुला असलं काहीच जमायचं नाही. म्हणजे आवडच वाटायची नाही. मग आईचे आणि आजीचे टोमणे भेटायचे.इतरांशी तुलना सुरू व्हायची. अशातचं एक दिवस नितु मोठी झाली. त्यामुळे तर आता तिच्यावर अजूनच सूचनांचा वर्षाव चालू झाला.पण तिला खूप वाचावस. अगदी किराणा सामानात आलेला न्यूज पेपर असो किंवा एखाद्या मासिकाच पान ही तिच्या हातून न वाचता सुटायचं नाही. आता नितु मोठी झाल्याने तिच्यासाठी सर्व नातेवाईक हिरीरीने स्थळ शोधत होते. आता नितुला शाळेतून सुट्टी टाकून आठवड्यातून 3 दा शेतात नेलं जाई. रोज घरातील काम करावी लागत. विवाहपूर्व प्रशिक्षण चालू झालं होतं. नितु बिचारी उदास झाली होती. शाळा- अभ्यास बुडत होता.ती पूर्ण तणावात होती कोनाशीही बोलावसं वाटायचं नाही तिला.
एक दिवस आजी शेजारणीशी गप्पा मारत बसली होती. बोलता-बोलता विषय नितुबाईवर येऊन ठेपला. आणि पोरीचं कसं होईल असं म्हणत आजीनं डोळ्याला पदर लावला.शेजारीण बाईनी आपुलकीने धिर दिला.
“नका ताण घेऊ सरजबाई ! व्हईल सगळं नीट. मी काय म्हणते कुठं देवाधरमाच, भाईरवाशाचं तर बाग की”

“आक्षी मनातली बोललीस आजच रातच्याला रामाला बोलते”आजी बोलली.”

“मह्या लेकीच्या नंदाच्या पूतनीला बी असंच व्होयच”

” मंग व ”

” मंग काय ! पिपरीच्या देवकरणीला दाखवील तीन आसरा काढून देल्या ”

” अस्सं ”

” व्हय ! मग तिच्या माइन मानून घेतलं आता लगीन व्हवून दोन पोर हायत आता, लई नादर झालंय बघा आता ”
” व्हय का ? कुठली पिपरी वं ”

” आवं ती गंगापलीकडची पिपरी, तिथं बसस्टंडवर उतरलं की कोणी बी नेऊन सोडतय बया ”

” बया मंग नीतीला बी नेव्हा कानू तिकडं”
” न्या माय लई गुण येतंय बघा ”

झालं रात्री घरात जेवना नंतर एकमताने विचार झालं की आता पिपरीला न्यायचं. मंग काय दुसऱ्या दिवशी आजी तिला घेऊन गेली पिंपरीला.
बघणाऱ्या बाईचं घर म्हणजे झोपडचं होत घरात विविध देवाच्या मूर्ती फोटो होते. बाहेर लोकांची रांग लागलेली होती नाराळ्याच्या करवन्याचा खच पडला होता. कपूरच्या डबाचा ढीग होता. नितुचा नंबर आल्यावर तिला आजी आत घेऊन गेली.
ती बाई केस मोकळे सोडून बसली होती कपाळावर हळदी कुंकाचा मळवट भरला होता. आजीनं नितुला तिच्या अंगात देवी आली. ती नितुच्या आजीला सांगू लागली.
” पोरीला लइ मोठं इगिन आलं होत बघा. पण आसरा मूळं टळल”

” बया ” आजीला गल बलून आलं.
बाई सांगत होती.
” लई जबरदस्त करणी केलीय, करणारी जवळचीच हाय. पोरीच्या पाळीचा कपडा अन केस नेऊन भावली केली आन आमुशाला पोरीच्या वलांडन्यात घातला बघा”
आजी ध्यान देवुन ऐकत होती.
” खरं तर पोरीला येडच करायचं हुत पण साती आसरा माय बहिणी धावून आल्या आन, थोडक्यात निभावल बघा ”
आजीला गलबलुन आलं.तीन भक्ती-भावान त्या बाईचे पाय धरले व बोलली ” पोरीला तुमच्या पायावर घातलय तवा आता पोरीचं चांगले करा ”

त्या बाईन डोळे झाकले आणि म्हणाली
” बघा दर शनिवारी वाण्या करावं लागतील पाच वाण्या केल्या की गुण येईल.आसरा मंदी आल्यात तवा आसराच्या तूपपोळ्याच्या सवसनी घाल शुक्रवारी ” आजीनं कबूल करून घेतलं त्याबाईन नितु वरून 5 लिंब कापून पाच दिशेला फेकली आजीनं पाया पडून 101 रुपया पुढं ठेवला आणि घरी आली.

रामराव आणि राधाबाईंनी लगेच सवसनी घालायचा बंदोबस्त केला
राधाने शुक्रवारी न्हाऊन- धुऊन आसराच्या तूपपोळ्याच्या सवसनी घातल्या.

आजी दर शनिवरी नितुला घेऊन पिंपरीच्या पाच वाण्या करू लागली नितुच्या मनात मात्र घालमेल सुरू होती. वार्षिक परीक्षा तोंडावर आली होती.घरात हे असं सगळं चाललेलं होत. ती अजूनच डिप्रेशन मध्ये गेली. पाच वाण्या करून पण काही गुण येत नव्हता. मग अजून दुसऱ्या अजून तिसऱ्या अशा बघणाण्याकडे दाखवलं. आसरा , मसोबा, बाहेरचं पण बघून झालं व्रत वैकक्य झाले. काही फरक पडेना.

हा ! फरक पडला तो नितुच्या शरीरावर.

तणावात राहून तिचा चेहरा काळवडला. चेहऱ्यावर मुरूम आली केस गळू लागले. आणि आडोदरच दुहेरी हाडाची नितु अजून लठ्ठ झाली.
नितुला आठवीची परीक्षा झाली होती. आणि आता नितुला पाहुणे बघायला यायला सुरूवात झाली.
क्रमशः

तुम्हाला काय वाटतं … .
होईल नितुच लग्न…….
पोरगी पुस्तक वाचते म्हणून असं बाहेरचं बघण कितपत योग्य आहे.. ..
कमेंट करुन सांगा.तीच काय चुकलं?

भाग3

नितुला खूप स्थळ येत होती. परतू तिच्या जाडपणमुळे नकार येत होते. आणि जिकडे पसंती मिळायची तिकडे नितुच्या वेडाबद्दल कळलेलं असायचं की, पोरीला खूप ठिकाणच्या वैदुकडे दाखवलं आहे. त्या गवमुळे नितुचं लग्न काही जमत नव्हतं. आणि नीतू अजूनही घरच्यांच्या मनातून उतरून जात होती. आता तिला सारखी धुसफुस केली जायची ९ विला नितुच शिक्षन बंद करण्यात आले. शाळा सुरू होऊन २ महिने झाले. तरी नितु शाळेत येत नव्हती म्हणून शिक्षकांनी पण निरोप पाठविले तरी नितु काही शाळेत येत नव्हती.
नितुशेजारी एक बाई राहाय च्या अंगणावाडी शिक्षिका होत्या नितु ची परिस्थिती त्यांना चांगली माहिती होती. त्यांना खूप वाईट वाटायचं पण बोलू शकत नव्हत्या एक दिवस हिम्मत करून त्या नितुच्या घरी गेल्या व तिच्या आई वडिलांना नितुला शाळेत पाठवायची विनंती केली.पण ते काही तयार होईनात तेव्हा बाईंनी त्यांना सांगितले की,” नितुला अस ही कोणी पसंत करत नाही लग्नही जमत नाही, पण जर नितुच्या दहवी निघाली की, कदाचित कोणी पसंद करू शकत आणि तसही आजकाल मुल शिककेल्या मुलींना पसंद करतात.
रामरावांना नाही पण राधाबाईनीं ही गोष्ट पटत होती त्यांनी पण जरा रामरावांना समजावून सांगितले. तेव्हा त्यांनी हो नाही करत परवानगी दिली. आणि नितु परत कधी तरी का होईना पण शाळेत जायला लागली असच वर्ष सरून गेलं. परीक्षा पण झाली. खरतर नितु शाळेत यायची नव्हती . खूप एकल कोंडी झाली होती.
आता दहाविच वर्ष होत. आणि आभ्यासपण वाढला होता. खूप स्थळानी नाकारल्या मुळे तिच्याशी मैत्रीकरत नव्हत्या म्हणून तर आता ती वर्गात आसली तरी खिडकीतून बाहेर बघत बसायची. एक दिवस नितुच्या भावकितील एक मुलीचं लग्न ठरंल खरतर ती तीनु पेक्षा लहानच होती. आता आई- आजी उठता- बसता नितुला टोमणे मरायच्या.
दहावीची परीक्षा जवळ आलेली होती.एक दिवस रामराव टेन्शनमध्ये घरी आले व त्यांनी नितुची सगळी पुस्तके जाळून टाकली. कारण त्यांना कोणीतरी सांगितलं होत की, सगळ्या पहुण्यांमध्ये आफवा आहे की नितु पुस्तक वाचून वेडी झालीय. म्हणून तिचं लग्न जमत नाही. त्याचाच राग त्यांना आला होता.
आज पुस्तक जाळताना पाहून मात्र नितुच्या इतक्या दिवसांनी संताप बाहेर पडला ती ओरडू लागली, किंचाळू लागली, जोरात रडू लागली. खूप दिवसांची मनात साठवलेल आज ती भडास काढत होती.
पण घरातील लोकांना वाटलं की तिच्या अंगात भूत आलं की काय महणून तिला बांधून टाकली आणि वैदू ला बोलावून आणल.रामा वैदू म्हणजे महाभयंकर मानूस सदानकदा समशानात राहायचा. त्याचा भूत भानामती काढायचा busness होता .तर रामा वैदू ने होम पेटवून रिंगणात नीतू ला बसवलं
तिच्या डोळ्यात कसली तरी भूकटी फेकली तशी नीतू जोरात किंचाळु लागली कारण डोळ्याची आग आग होत होती. सगळे घाबरून अंग चोरून बसले होते.
रामा वैदू जोरात विचारत होता
“कोण आहेस तू सांग.”
उत्तरादाखल किंचाळी शिवाय काही ही मिळत नव्हते.
आता रामा चिढला होता त्याने वेतची छडी घेऊन नितुला फटके द्यायला सुरुवात केली.
नीतू जोरात किंचाळत होती .मारू नाका म्हणून विनंत्या करीत होती. पण कोणालाच पाझर फुटला नाही . शेवटी ओरडून बिचारी बेशुद्ध पडली. तेव्हा अंगातील भूत पळालं अस रामाने जाहीर केलं. नितुला उचलुन बाजूला घेतलं गेलं.
त्या घटनेनंतर मात्र नितुत कमालीचा बदल झाला आता ती पुस्तके आणि अभ्यासच नावपण घेत न्हवती.
पुढे कशीबशी दहावी झाल्यावर नावालाच 11वी art ला addmision घेतलं पण आता नीतू ना अभ्यास करायची ना काही वाचायची. ती फक्त लग्न जमाव म्हणून उपवास करायची आणि घरच्यांनी काही बोलू नये म्हणून शक्यतो जास्तीत जास्त प्रमाणात काम करायची.

पण तरीही तिचे भोग संपले नव्हते एक दिवस नितुला बघायला आलेल्या पाहुण्यांनी गीताला पसंत केली. सर्व विचारात पडले की आता काय करावं.
क्रमशः

(तूम्हाला काय वाटत कोणाचं लग्न होईल?)
भाग 4 https://irablogging.com/%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%9a%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-4/
भाग5

तीच काय चुकलं?भाग 5

भाग अंतिम

#तीच काय चुकलं? अंतिम

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा