#तिचं जगणं#

Written by

तिने फुलांची टोपली उचलली अंमळ जरा उशीर झाला होता. फुलांचा साठा संपेल का? शेठ आज कावणार, आजचा मोबदला पदरात पडतो का नाही हा प्रश्न तिच्या बालमनाला सतावत होताच पण उशिरा निजल्यावर डोळ्याची झापडं तरी कशी उघडतील?
रात्री ‘बा’ ने लईच तमाशा केला होता. तिने साठवलेली पूंजी हिसकावून घेतली.ज्या पूंजीत तीची स्वप्न बांधून होती…
पिंट्यांचा वाढदिवसाच्या दिवस लई पाठी लागलं होतं पोट्ट.आईच दवा अन धाकल्या साठी दुकानात खुणविणारी आवाजाची खेळणी. या स्वप्नाचा चुराडा क्षणात ‘बा’ न केला.
उठली आवरले ओल्या कापडात गुंडाळली फुलं तीनं टोपलीत भरली. चिरगुडात शिळी भाकर गुंळाली. अंथरुणावर खिळलेल्या आईला बोलली! आयं आज लई उशीर झालाय पडून रहा! आल्यावर आवरिन तुझं. पिंट्या बिगीन आवर पळ शाळत देईल शाळेच्या फाटका जवळ आणून डबा. बघते कमाई होते का? लगबगीने पळाली डोक्यावर फुलांची टोपली घेऊन पकडली मुंबईची लाइफलाइन. मनातल्या स्वप्नांना मनात दाबले. देवावर भरवसा ठेवून गाडीतल्या नजरा झेलत दिली आरोही! ‘घ्या ताजी फुलं sssss!’ ..
टोपलीतल्या फुलागत गर्दीत ही दडलेले होतं काटेरी गुलाब, वासनेच्या टप्प्यात घुटमळणाऱ्या त्यांच्या नजरा! पण हे सगळ झेलत हि कळी फुलत होती, कारण या कोवळ्या वयात ही ति आपल्या कुटुंबीयांच्या कर्तव्याने बांधली होती, आपली स्वप्न टोपलीतल्या गुलाबाच्या खाली अच्छादून…

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा