तिची किंमत (भाग 2)

Written by

#तिची_किंमत (भाग 2)

मागील भागात आपण पाहिलं की निशा ला तिचा नवरा “तुझा वीट आलाय” असं म्हणाला…

निशा च्या डोळ्यासमोरून भूतकाळ सरसर गेला…

कॉलेज मध्ये मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं..

निशा तशी राजेश हुन हुशार…पण राजेश च्या प्रेमाने तिला आंधळं केलं होतं…

कॉलेज मध्ये प्लेसमेंट सुरू होत्या, निशा ची जागा पक्की झाली होती…

कंपनीच्या फक्त 50 जागा भरायच्या होत्या, दुर्दैवाने राजेश चा नंबर मार्क्स नुसार 51वा होता…राजेश हताश झालेला..त्यावेळी निशा ने मुद्दाम इंटरव्ह्यू ला जाणं टाळलं… एक जागा रिकामी झाली आणि राजेश ला संधी मिळाली…

राजेश च्या प्रेमासाठी केलेला हा पहिला त्याग…

नंतर आई वडिलांच्या संमतीशिवाय लग्न…

सासरी आल्यावर सासुरवास सहन करण्याचा आणि आपल्या स्वप्नांवर पाणी सोडण्याचा त्याग…

राजेश च्या प्रेमासाठी आजवर तिने फक्त त्याग केला होता..

कसलीही तक्रार न करता केवळ राजेश आणि तिच्या संसारासाठी ती झटत राहिली…

संसारवेलीवर 2 फुलं उमलली….मुलगा सातवीत तर मुलगी चौथीत शिकत होते….

तिने कुटुंबाला फुलसारखं जपलं…सगळ्यांना वेळेवर नाश्ता, जेवण, सर्वांची काळजी आणि घराला अगदी स्वर्ग बनवलं होतं..

एवढं सगळं करूनही तिला कौतुकाचे 2 शब्द कोणी बोलले नव्हते…तिची तशी अपेक्षाही नव्हती..

आज राजेश च्या अश्या वागण्याने तिच्या मनावर आघात झाला होता…

ती चांगलीच वागत गेली पण म्हणून तिला गृहीतच धरलं गेलं…तिने 10 चांगल्या गोष्टी केल्या त्याचं कौतुक नाही पण एखादी गोष्ट चुकली की राजेश आकाशपाताळ एक करायचा…

मुलंही वडिलांच्या बाजूने असायची…

एक दिवस ती सहज तिच्या बहिणीकडे गेली …2 तास तिथेच होती…

घरी राजेश आणि मुलं होती…निशा घरी नाही बघून राजेश ने घरातली किरकोळ कामं आणि साफसफाई केली, निशा घरी आल्यावर राजेश म्हणतो,

“तू घरात नसताना बघ उलट अजिबात पसारा होत नाही..काय घर आवरतेस तू? एकही काम धड करत नाही…”

“खूप झालं आता, खरंच तुम्हाला माझा वीट आला असेल तर काही दिवस माहेरी जाते मी…8 दिवस तुम्ही माझ्याशिवाय राहू शकत असाल तर मीही मानेल की मी चुकतेय….” डोळे पुसत निशा म्हणाली..

क्रमशः

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा