#तीच काय चुकलं? अंतिम

Written by

नीतू रडत रडत चालत होती कोनीही लोक नुसती तोंडाकडे बघत होती.कोणीही येऊन विचारपूस करत नव्हती.खूप रात्र पण झाली होती आणि नितुला भूक पण लागली होती. ती रेल्वे स्टेशन वर आली आणि एका बाकड्यावर बसून राहिली.कुठं जायचं हा प्रश्न समोर होता.जवळ तर पुरेसे पैसे पण नव्हते.काय करावं काहीच सुचत नव्हतं. नितुने विचार केला. आता बस्स झाला संपवाव आता हे एकदाच समोर जी गाडी येईल तिच्यासमोर उडी घ्यायची. बस्स! निर्णय पक्का झाला. गाडी आली.नीतू हळूहळू पावलं टाकीत पुढे जाऊ लागली.
आज सगळं संपणार होतं. 17 वर्ष वनवास भोगलेल्या शरीराचे तुकडे तुकडे होऊन ते मुक्त होनार होत.गाडी जवळ आली. नितुने डोळे झाकले. ती उडी मारणार…
एवढ्यात कोणीतरी तिला बाजूला खेचलं. डोळे उघडून पहिल तर rpf चा जवान होता.
“क्या मॅडम जी !किधार जना है?जरा साईडसे चलो गीर जाती ना…”
“नाही.. वो..घरवाले… पप्पा…”

“आच्छा घरवाले काहा है? थोडा देर बैठो एधर”
अस म्हणून त्याने तिला एक बाकड्यावर बसवलं.तेवढ्यात तिला तो आणि त्याचा भाऊजी येताना दिसले.तिच्या काळजात धस्स झालं. ती उठून पळणार एवढ्यात ते तिच्या जवळ पोहचले.त्याने तिच्याकडे डोळे मोठे करून बघितलं आणी मोबाईल हातात घेतला.तिला तो इशारा कळला आणि सकाळच्या व्हिडिओ ची आठवण झाली. त्याने तिला चालण्याची खून केली आणि ती त्याच्या मागे चालू लागली अगदी तशीच… जशी थोड्यावेळापूर्वी ट्रेन कडे जात होती.

तिला घरी घेऊन गेल्यावर सगळ्यांनी मिळून मारहाण केली. पण आता ती काय करणार होती.
तिला कळून चुकलं आता हेच आपलं जगणं. तीन ते मान्य पण केलं.2-3 दिवस गेल्यावर त्याची बहीण तिला एका कंपनी त घेऊन गेली तिथं तिला कामाला लावली.कंपनीत झाडूमारण्याच तिचं काम होत.ती आता गुपचुप आपलं नशीब समजून काम करू लागली. तिला ना त्याच्याबद्दल प्रेम होतं ना त्याच्या फॅमिली बद्दल आदर होता.1-2 महिने निघून गेल्यावर अचानक एक दिवस तो तिला घेऊन गावी गेला. तिच्या गावापासून 5-6 किलोमीटर अंतरावर एका गावात तो तिला घेऊन शेतात राहू लागला. ती पण शेतात मजुरी करू लागली तो कामाचे पैसे हिसकावून घ्यायचा. जेमतेम खायला मिळायचं तिला.ती अशीच जगात होती. कोणत्याही कारणाशिवाय. एकदिवस तो तिला घेऊन जवळच्या गावात बाजारात गेला. त्याच गावात तर नितुच कॉलेज होत. जवळून गेल्यावर नितुच्या काळजात कालवाकालव झाली. तिला वाटलं असही आयुष्य खराब झालाय. पण बघू पुढे काय होतंय ते. तेवड्यात नितूची मॅडम तिथून जात होती. तिने नितुला पाहिलं आणि जवळ येऊन नितुला बोलाली की” नीतू तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती ग का केलास तू अस”
नितुने काही उत्तर दिलं नाही फक्त एवढंच बोलली “मॅडम मला पुढं शिकता येईल का?”
मॅडम बोलल्या “तू घरी ये माझ्या.” आणि त्या तिथून निघून गेल्या. त्या दिवशी नीतूने दिवसभर विचार केला आणि शेवटी ती धीर करून त्याला बोलली की “मला मॅडम ला भेटायला जायचंय. त्या मला चांगलं काम देणार आहेत”

त्याला वाटलं जाऊदे गेली तर कुठं कामला लागली तर आपल्यालाच 4 पैसे जास्त मिळतील.
त्याने सांगितले “जा पण लक्षात ठेव आता जर पळून गेलीस किंवा मॅडमला काही सांगितलंस तर तुला माहितीच आहे. सगळ्या गावात फोटो आणि विडिओ पाठविलं लक्षात ठेव”
ती मॅडम कडे गेली तिने त्यांच्याकडे शिकायची इच्छा व्यक्त केली. मॅडम ने तिला खूप प्रेमाने विश्वासात घेऊन विचारलं तरी तिने एका शब्दाने पण काही सांगितल नाही. त्यांनाही वाटलं जाऊदे सांगेल हळुहळु. त्यांनी नितुला कॉलेज ला ऍडमिशन घेऊन दिल. सोबताच त्यांनी त्यांच्या घरच धुण्याभांड्याच काम पण नितुला दिल.नीतू परत अभ्यासाला लागली. मॅडम सोबतच इतर शिक्षकांकडे घरी धुणीभांडी करू लागली पैसे कमवू लागली.तो तिच्याकडून सगळे पैसे काढून घ्यायचा.आता ती पगार झाला की काही पैसे मॅडम कडे ठेवायची त्यातून पूस्तके वैगरे घेऊ लागली. त्यातच एक दिवस तो तिला घेऊन वीटभट्टी वर कामाला गेला.जवळच होती वीटभट्टी आता नीतू पहाटे 1ला उठून विटा थापायची.सकाळी 9 ला गावात येऊन कॉलेजमध्ये जायची. दुपारी धुणीभांडी करून परत वीटभट्टी वर जायची. असेच 2वर्ष निघून गेले. नितुने आता BA व्दितीय वर्षाची परीक्षा दिली. एक दिवस त्याच्या एका मित्राने फोन करून त्याला पुण्याला यायला सांगितलं कामासाठी. चांगला पगार देतो बोलला. तो तिला घेऊन पुण्यात गेला. नीतू कंपनीत कामाला जाऊ लागली. उन्हाळ्याचे दिवस होते. नीतू रोज लवकरच कामाला जायची दुपारी घरी यायची. तो मात्र रात्री उशिरा यायचा आणि पहाटे लवकर जायचा. नीतू कामावरून आली की दारासमोर गॅलरीत बसायची पुस्तक वाचत.त्यांच्याच बिल्डिंग मध्ये बाजूला काही मुलं राहायची. येता जाता ती कधीतरी बोलायची.त्याच्यातच एक राहायचा “अजय”.
अजय दिसायला खूपच छान दिसायचा. अगदी हँडसम.असेल 20 वर्षाचा. येता जाता नितुला काहीतरी बोलायचा.’जेवलात का?’ वैगरे.
एक गोष्ट नितुच्या लक्षात येऊ लागली की ‘हल्ली तो जरा जास्तच नितुच्या अवतीभोवती असतो सारख बाहेर उभा राहतो. तिच्याशी बोलायचा प्रयत्न करतो.कदाचित त्याला मी आवडत असावी का?तिला आपल्या विचाराच हसू आलं.
दुसऱ्या क्षणी मनात विचार आला की ‘काय विचार करतेस नीतू आग तो कुठं तू कुठं’ तिने ते विचार झटकले. नितुला पण तो आता आवडायला लागला होता.त्याच हसण बोलणं सगळ आवडायचं तीला. एक दिवस त्याने हिम्मत करून नितुला प्रपोज केलं आणि थोडा वेळ विचार करून नितुने सुद्धा अजय च प्रेम स्वीकारले. आता नीतू तीचा भुतकाळ विसरून गेली. रोज ती कामावरून आली की, अजयसोबत बाहेर फिरायची. तो पण तिला खूप हासवायचा. गबाळी राहणारी नीतू आता मात्र टापटीप राहायची. उदास असणारी नीतू आता खुश दिसू लागली. हा बदल त्याच्या लक्षात येऊ लागला. नीतू अजयच्या प्रेमात बुडाली हाती पण तिला एक सल होती की, अजयला जर माझा भूतकाळ कळला तर…पण असं फसवून प्रेम करण तीला पटत नव्हतं.
एकदिवस हिम्मत करून तिने अजयला सगळं खरं खर सांगून टाकले.आणि निघून गेली.तिला वाटलं आता काय अजय तिला भेटणार नाही. संध्याकाळी अजयने तिला भेटायला बोलावलं. ती गेली.तिला वाटलं अजय तिला रागवेल.पुन्हा तोंड दाखवू नको म्हणेल. ती गेल्यावर दोघे गार्डनमध्ये एका बाकड्यावर बसले. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हतं. थोड्यावेळाने अजय बोलला “नीतू मी दिवसभर खूप विचार केला. एक वेळ राग आला तुझा पण… जे झालं त्यात तुझा काय दोष ग. तुझा भूतकाळ खूप वाईट होता पण तुझा भूतकाळ खूप चांगला असेल. नीतू मी तुझ्यावर खरं प्रेम केलाय ग तू कशीही असो मला तू हवी आहेस ग.बोल ना लग्न करशील माझ्याशी”
ईतक्या वेळ शांतपणे एकणाऱ्या नितुच्या बांध फुटला आणि ती ऑक्सबोकसी रडू लागली. अजयने तिला जवळ घेतलं. आणि हळूच तिच्या कानात बोलला “मी आहे ना. नको काळजी करू।”आज अजयच्या मिठीत तिला खूप सुरक्षित वाटत होतं.
ती दोघेही आज खूप भटकली. बाहेर जेवली.हातात हात घेऊन फिरत असताना वेळेचं भान नाही राहील.ती घरी आली तेव्हा तो घरी आला होता. त्याने तिला कुठं गेली होती म्हणून जाब विचारला तर तिने त्याला काहीच उत्तर दिलं नाही.त्याने तिला मारहाण करायला सुरुवात केली. तो तिला कुत्र्यासारख मारत होता.आजूबाजूचे कोणीही तिची मदत करत नव्हतं.अजयला जेव्हा कळलं तो धावत आला आणि त्याने नितुला त्याच्या तावडीतून सोडवलं आणि त्याला मारायला सुरुवात केली.धडधाकट अजय समोर त्याचा निभाव लागला नाही. अजय नितुला घेऊन पोलिस स्टेशनमध्ये गेला. नितुने पोलिसांना सर्व घडलेली हकीकत सांगितली. पोलिसांनीं त्याला बोलावून घेतलं. पण नितुने त्याच्या विरोधात कुठलीही केस न करता फक्त त्याला समज दयायला लावली. नितुने मॅडम ला फोन करून सगळी घटना सांगितली. मॅडम ने नितुला बोलावून घेतले. धीर दिला. नीतू आता होस्टेल ला राहू लागली. अभ्यास करू लागली. अजय तिला सपोर्ट करायचा. त्याची साथ तिला होती. अजय आता चांगल्या नोकरीत लागला. आणि ग्रॅज्युशन झाल्यावर नितुने स्पर्धा परीक्षा द्यायचं ठरवलं.ती अभ्यास करत होती. नितुला mpsc तुन पोस्ट मिळाली.अजयने नीतूशी लग्न केलं. नितुला खुप छान सासर मिळालं.सासूबाई अगदी आईसारखी माया करायच्या.पण नितुने जॉब न करता तिने IAS ची तयारी करायची ठरवलं. तसेच अजय व नितुने मुलांनी स्पर्धापरिक्षेकडे वळावे म्हणून मार्गदर्शन केंद्र आणि ग्रंथालय सुरू केले.
आता आईवडील बहीण भाऊ पण गुपचुप येऊन भेटतात.पैसेपाणी मागतात.पण आज ही त्यांना आपल्या मुलीला गावी आणि घारी न्यायची लाज वाटते. कारण समाजातील लोक आज पण तिला एक पळून गेलेली बदनाम मुलगी समजतात…
पण खरं सांगा तीच कुठं चुकलं?
जर आईवडिलांनी तिला कुठल्याही भेदभावाशिवाय शिकवलं असत तर..
तिच्यावर विश्वास ठेवला असता तर…
कदाचित नितुला पळवुन नेल्यावर वेळीच पोलीस केस केली असती तर…
आणि महत्वाचे
अजय जर भेटला नसता तर..

ड्राईव्हर ने ब्रेक दाबला तस नीतू विचार तंद्रीतून बाहेर आली. सत्कार समारंभ उत्साहात सुरू झाला. नीतू बोलायला उभी राहिली.
” तुम्ही सगळ्यांनी मला जो बहुमान दिला मी तुमची खूप आभारी आहे.माझ्या यशाचं सगळं श्रेय मी माझ्या पतीला देते.
मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की, मुलींना शिकवा. मुलगा मुलगी भेदभाव करू नका. आणि हो मुलींवर विश्वास ठेवा.करण प्रत्येक नीतू वेळीच सावरू शकणार नाही.प्रत्येक नितुच्या आयुष्यात अजयपन येणार नाही. पण तुम्ही तिला बळ दिल तर प्रत्येक नीतू अधिकारी जरूर होईल.”

समाप्त.

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा