तीच काय चुकलं?

Written by

आता बघता बघता नीता आता आठवी ला गेली होती. अभ्यासासोबत ती इतर उपक्रमात पण सामील भाग घ्यायची.शाळेत प्रत्येक स्पर्धेत नीतूचा पहिला नंबर असायचा. ती उत्तम वक्ता होती .तसेच कवियत्री पण होती . मनातले सारे भाव ती कवितेत उतारावयाची.शाळेत सगळ्याची आवडती होती. पण घरात नावडती बनत चालली होती.शेजारच्या मुली विणकाम करायच्या,सुट्टीच्या दिवशी शेतात कामाला जायच्या रांगोळी काढायच्या पण नितुला असलं काहीच जमायचं नाही. म्हणजे आवडच वाटायची नाही. मग आईचे आणि आजीचे टोमणे भेटायचे.इतरांशी तुलना सुरू व्हायची. अशातचं एक दिवस नितु मोठी झाली. त्यामुळे तर आता तिच्यावर अजूनच सूचनांचा वर्षाव चालू झाला.पण तिला खूप वाचावस. अगदी किराणा सामानात आलेला न्यूज पेपर असो किंवा एखाद्या मासिकाच पान ही तिच्या हातून न वाचता सुटायचं नाही. आता नितु मोठी झाल्याने तिच्यासाठी सर्व नातेवाईक हिरीरीने स्थळ शोधत होते. आता नितुला शाळेतून सुट्टी टाकून आठवड्यातून 3 दा शेतात नेलं जाई. रोज घरातील काम करावी लागत. विवाहपूर्व प्रशिक्षण चालू झालं होतं. नितु बिचारी उदास झाली होती. शाळा- अभ्यास बुडत होता.ती पूर्ण तणावात होती कोनाशीही बोलावसं वाटायचं नाही तिला.
एक दिवस आजी शेजारणीशी गप्पा मारत बसली होती. बोलता-बोलता विषय नितुबाईवर येऊन ठेपला. आणि पोरीचं कसं होईल असं म्हणत आजीनं डोळ्याला पदर लावला.शेजारीण बाईनी आपुलकीने धिर दिला.
“नका ताण घेऊ सरजबाई ! व्हईल सगळं नीट. मी काय म्हणते कुठं देवाधरमाच, भाईरवाशाचं तर बाग की”

“आक्षी मनातली बोललीस आजच रातच्याला रामाला बोलते”आजी बोलली.”

“मह्या लेकीच्या नंदाच्या पूतनीला बी असंच व्होयच”

” मंग व “

” मंग काय ! पिपरीच्या देवकरणीला दाखवील तीन आसरा काढून देल्या ”

” अस्सं “

” व्हय ! मग तिच्या माइन मानून घेतलं आता लगीन व्हवून दोन पोर हायत आता, लई नादर झालंय बघा आता “
” व्हय का ? कुठली पिपरी वं “

” आवं ती गंगापलीकडची पिपरी, तिथं बसस्टंडवर उतरलं की कोणी बी नेऊन सोडतय बया ”

” बया मंग नीतीला बी नेव्हा कानू तिकडं”
” न्या माय लई गुण येतंय बघा “

झालं रात्री घरात जेवना नंतर एकमताने विचार झालं की आता पिपरीला न्यायचं. मंग काय दुसऱ्या दिवशी आजी तिला घेऊन गेली पिंपरीला.
बघणाऱ्या बाईचं घर म्हणजे झोपडचं होत घरात विविध देवाच्या मूर्ती फोटो होते. बाहेर लोकांची रांग लागलेली होती नाराळ्याच्या करवन्याचा खच पडला होता. कपूरच्या डबाचा ढीग होता. नितुचा नंबर आल्यावर तिला आजी आत घेऊन गेली.
ती बाई केस मोकळे सोडून बसली होती कपाळावर हळदी कुंकाचा मळवट भरला होता. आजीनं नितुला तिच्या अंगात देवी आली. ती नितुच्या आजीला सांगू लागली.
” पोरीला लइ मोठं इगिन आलं होत बघा. पण आसरा मूळं टळल”

” बया ” आजीला गल बलून आलं.
बाई सांगत होती.
” लई जबरदस्त करणी केलीय, करणारी जवळचीच हाय. पोरीच्या पाळीचा कपडा अन केस नेऊन भावली केली आन आमुशाला पोरीच्या वलांडन्यात घातला बघा”
आजी ध्यान देवुन ऐकत होती.
” खरं तर पोरीला येडच करायचं हुत पण साती आसरा माय बहिणी धावून आल्या आन, थोडक्यात निभावल बघा “
आजीला गलबलुन आलं.तीन भक्ती-भावान त्या बाईचे पाय धरले व बोलली ” पोरीला तुमच्या पायावर घातलय तवा आता पोरीचं चांगले करा ”

त्या बाईन डोळे झाकले आणि म्हणाली
” बघा दर शनिवारी वाण्या करावं लागतील पाच वाण्या केल्या की गुण येईल.आसरा मंदी आल्यात तवा आसराच्या तूपपोळ्याच्या सवसनी घाल शुक्रवारी ” आजीनं कबूल करून घेतलं त्याबाईन नितु वरून 5 लिंब कापून पाच दिशेला फेकली आजीनं पाया पडून 101 रुपया पुढं ठेवला आणि घरी आली.

रामराव आणि राधाबाईंनी लगेच सवसनी घालायचा बंदोबस्त केला
राधाने शुक्रवारी न्हाऊन- धुऊन आसराच्या तूपपोळ्याच्या सवसनी घातल्या.

आजी दर शनिवरी नितुला घेऊन पिंपरीच्या पाच वाण्या करू लागली नितुच्या मनात मात्र घालमेल सुरू होती. वार्षिक परीक्षा तोंडावर आली होती.घरात हे असं सगळं चाललेलं होत. ती अजूनच डिप्रेशन मध्ये गेली. पाच वाण्या करून पण काही गुण येत नव्हता. मग अजून दुसऱ्या अजून तिसऱ्या अशा बघणाण्याकडे दाखवलं. आसरा , मसोबा, बाहेरचं पण बघून झालं व्रत वैकक्य झाले. काही फरक पडेना.

हा ! फरक पडला तो नितुच्या शरीरावर.

तणावात राहून तिचा चेहरा काळवडला. चेहऱ्यावर मुरूम आली केस गळू लागले. आणि आडोदरच दुहेरी हाडाची नितु अजून लठ्ठ झाली.
नितुला आठवीची परीक्षा झाली होती. आणि आता नितुला पाहुणे बघायला यायला सुरूवात झाली.
क्रमशः

तुम्हाला काय वाटतं … .
होईल नितुच लग्न…….
पोरगी पुस्तक वाचते म्हणून असं बाहेरचं बघण कितपत योग्य आहे.. ..
कमेंट करुन सांगा.

पुढील भागासाठी खालील फेसबुक पेज ला लाईक कराhttps://www.facebook.com/irablogs/

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा