तीच काय चुकलं?

Written by
 • ( नमस्कार मी खुशी शिंदे तुमच्या साठी घेऊन येत आहे एक सत्यघटनेवर अधारित कथा
  गोपनीयता राखण्यासाठी फक्त नाव व स्थळ याबरोबरच इतर थोडा बदल केलेला आहे
  कथा मोठी असुन पार्ट मध्ये लिहिली जाईल)

   

  अजय व निता च्या घरात आज सकाळी पासुन खूप धामधूम चालली होती. शुभेच्छा देण्यासाठी कितीतरी कितीतरी काॅल येत होते. आज गावीही तीचा भव्य सत्कार ठेवला होता.
  कालच upsc चा रिजल्ट आलेला आणि आपली नितु IPS झाली होती. नितु खिडकीतुन बाहेर बघत बसली होती. हळुच अजयने मागुन येवुन तीला मिठी मारली आणि हळुच कानात पुटपुटला, ” Thanks ”
  तीने वळुन त्याच्या कडे बघितले. तिचे डोळे भरून आले आले, तिच्या मनातील घालमेल त्यालाही समजली. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन त्याने नेहमीच वाक्य म्हणलं ” मी आहे ना! ” आणि ती गोड हसली. हे वाक्यच तर तीची ताकद होतं. तेवढ्यात सासुबाईंचा आवाज आला.
  “नितु कार्यक्रम ला जायला साडी कुठली घालु गं? ”
  आणि ती पटकन त्याच्या खोलीत पळाली.

  अजय व नितु च्या लग्नाला ५ वर्ष झाली होती २ वर्षाची गोड परी त्यांच्या आयुष्यात आली होती. मायाळू सासु, प्रेमळ सासरा, आणि भावासारखे प्रेम करणारा दिर
  सगळं कस गोकुळासारख घर होत. अजयला चांगली सरकारी नोकरी होती. आणि आज तर नितु ips झाली होती.
  पण हे सगळं नितु ला सहज मिळालं होतं का?
  तीचा भुतकाळ खरचं काय असेल .. . .

 •  

  दुपारी नितु सत्कारासाठी गावी जायला निघाली.गाडीच्या वेगासोबत तिच्या मनातील विचारांनी सुध्दा वेग घेतला .नकळत तिच मन भूतकाळात जाऊन पोहचल . रामावर आणि राधा बाईचं पहिलं आपत्य म्हणजे नितु लग्नाच्या 7वर्षानंतर झालेली. तिच्या पाठीवर भाऊ पुन्हा बहीण पुन्हा भाऊ असे 4 भावंडं झाले. नितु लहान पणा पासून हुशार होती. गोरी गोरी पान गोबऱ्या गालाची, छोटस नाक ,घारे डोळे असलेली नितु अगदी बाहुली सारखीच दिसायची बोलायला पण चुन चुणीत होती दिवस जात होते.नितु मोठी होऊ लागली रामरावांची नितुला शाळेत टाकले. छोटीशी नितु शाळेत जायला लागली.अभ्यास आवडीने करायची. कविता म्हणायची. भावंडासोबत मस्ती करायची. दिवस सरत होते. आणि नितु सोबत तिचा भावंड पण शाळेत जाऊ लागली. पण नितुच्या लहान भावाला मात्र अभ्यासात काही रस नव्हता.आता शाळेत व बाहेर दोघांची तुलना चालु झाली होती. जशी जशी नितु मोठी होऊ लागली तसतसं तिला एक गोष्ट जाणवू लागली. ती म्हणजे घरातील भेदभाव भेदभाव ???
  होय,भेदवावच ! मुलगा व मुलगी भेदभाव तस रामरावांच कुटुंब शेतकरी.घरी शेती पण भरपूर होती. पण विचार मात्र मागासलेले होते. अस म्हणायला हरकत नाही.
  रामरावांना वाटायचं मुलगा शिकुन मोठा अधीकारी व्हावा. पण त्याला अभ्यास सोडून इतर उद्योग आवडायचे. नितु हुशार, पण तरीही रामरावांना तीच कौतुक नव्हतं. दोन्ही मुलांना रामरावांनी चांगलं खुराक लावला. पण पोरींना रोजच जेवण मिळायचं.नितु पाचवीला गेली होती. तिचा अभ्यास वाढला होता आणि घरातलं काम पण वाढलं होत. सकाळी उठून शेण काढायचं दूध घालून यायचं , शाळेतून आलं की भाकरी शिकायच्या असा दिनक्रम चालु झाला . नितुला कामाचा कंटाळा यायचा . तिला पुस्तकं वाचावी वाटायची . कविता म्हणान्या वाटायच्या. पण काय करायचं……….
  एकदा नितु शाळेतून घरी आली तर रामरावांनी गावावरून सफरचंद आणले होते . त्यांनी मुलांना एक एक सफरचंद दिल. आणि नितुला आणि गीताला ( लहान बहीण ) अर्ध-अर्ध कापून दिल.नीताला खूप वाईट वाटलं तुने रामरावांना विचारलं ” बाबा तुम्ही भाऊ ला अन दादाला आख्य सेफ दिला आणि मला अन नीताला अर्धा का दिला आम्हाला पण आख्खा पाहिजे ” तेव्हा रामराव ओरडले.”पोर हायत ते . शाळेत मुलगा- मुलगी एकसमान असतात असं शिकणाऱ्या वर्षाच्या नितुला मुलाला पूर्ण फळ आणि मुलीला अर्ध का भेटत याचा अर्थ काही केल्या कळेना.
  एकदा असच आज्जीन लोणी कढवल तूप काढून उरलेल्या खरवडीत साखर टाकून भाऊला खायला दिल. ते बघून नितुन पण मागितलं खायला तर लगेच आजी खेसकली ” तुला कशाला पाहिजे पोरीच्या जातीला ” खातांन कुटून अन जातान उठून ” परक्याच धन ते ” नितुला काही कळलं नाही. नीतून भावाच्या वाटीत हात घालून तूप साखरेचा तोबरा भरला तेवढ्यात भावानं बोब जोरात बोब मारली ” आज्जे , हीन माझं तूप खाल्लं ! आज्जीन रागा रागात फुकणी फेकून मारली. नितुला वर्मी घाव बसला गळ्यातून हुंदका बाहेर पडला. डोळ्यातील पाण्यासोबत मनातील तूप खाण्याची वासना पण वाहून गेली.
  आज तिला कळलं होतं. तिच्या कडून पाप घडलय. हो ! मुलगी म्हणून जन्माला आल्याच पाप. रोज घरात मिळणारे धडे एवढे अनुभव देऊन गेले की शाळेतले समानचे धडे मात्र खोटे वाटायला लागले………
  तीच मन तिला एकच प्रश विचारत होता की मी मुलगी म्हणून जन्मले ह्यात माझं काय चुकलं ? क्रमशः

  ( काही अपवाद वगळता अजून ही खेड्यापाड्यात ही वास्तूस्थिती पाहायला मिळते, तुम्हाला काय वाटतं ).

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा