#तीच नाही चांगली….. !

Written by

परवा एक काकू भेटल्या.. बिचाऱ्या खूप काही उदास वाटल्या …गावी असतात येतात अधून मधून इकडे मुलाकडे … आल्यावर.. भेटल्यावर बोलतात.. विचारतात सर्वाबद्दल…थोडयाफार गप्पा होतात.. परवा त्या जरा जास्तच उदास वाटल्या म्हणून विचारलं का हो काय झाल अश्या उदास का तुम्ही?..
त्यावर त्या म्हणाल्या काही नाही.. मुलांची लग्न झाली.. सुना आल्या… तरी आई वडिलांची काळजी मिटते का कधी??मी आपल हो बोलले आणि घरी आले.. घरी आले तरी मनात तेच विचार..
काका काकू ना दोन मुलं..दोघांची लग्न झालेली… दोघे आपल्या आपल्या संसारात सुखी.. काका काकू गावी असायचे… अधून मधून यायचे मुलांकडे.. काका नि भरपूर कमावून ठेवलेलं.. अगदी मुलं बसून खातील इतकं..बर दोन्ही मुलं आणि दोन्ही सुना सगळे कमवतात. दोन्ही मुलांना एक एक मुलगा पण आहे.. म्हणजे सगळं अगदी हव तस. मग अरे अजून काय पाहिजे…
मी बऱयापैकी त्त्यांच्याबद्दल चर्चा ऐकलेली. मोठी श्रीमंत घरची असून खूप चंगली आहे वगैरे… लहान सून गरीब घरची म्हणून नाही चांगली.. तेंव्हाच मला हा मुद्दा पटलाच नव्हता.. गरीब घरच्या मुली शेफारतात वगैरे… गरज नसताना उगाच डोक्यात विचार घिरट्या घालत होते.. काही दिवसांनी समजलं कि काकू उदास आहेत कारण त्यांची लहान सून घर सोडून गेलीय. कारण काय तर म्हणे ती शेफारली… तिचा अति लाड करून शेफारून ठेवलं म्हणून ती आता अशी नाटकी करते.. वगैरे वगैरे अस ऐकायला आलं..
मी विचार केला अरे जर ती घर सोडून गेलीय तर तसच कारण असेल.. कारण मुलगा 6वर्षा चा झाल्यावर असा decision उगीच कोण कशाला घेईल… पण नाही.. सगळं दोष तिच्या अकाउंटवर जमा केला..
मी जरा अहो कडे चौकशी केली तेंव्हा समजलं कि काकू चा लहान मुलगा हाताबाहेर गेलाय. खूप व्यसनाधीन झालाय याच्या अदोगर पण ती बरेचदा गेलेली निघून पण आज नाही तर उद्या सुधारेल या आशेवर यायची. आता मुलगा मोठा झाला आहे हुशार आहे.. समजत सगळं त्याच्यासमोर हे रोज अस घडत.. त्याच्यावर इफेक्ट होत असेल.. म्हणून कदाचित ती गेली.
मग तीच चुकलं कुठे.?? तिने मुलासाठी decision घेतला.. जर तिने स्वतःसाठी केल असत तर इतके वर्ष त्याच्या बर संसार नसता केला… तिने तो तिच्या मुलासाठी एकदम बरोबर decision घेतला अस मला वाटतं… जर वडील रोज अश्या अवस्थेमध्ये दिसत असतील मुलांना.. घरी येऊन रोज आई वडील भांडण करतात.. तर मुलांवर कसे संस्कार घडतात..??? अशी मुलं कशी बनतील मोठी झाल्यावर..?? याचा खूप वाईट परिणाम होतो लहान मुलावर ..
मला नवल वाटतं ते लोकांच्या विचारसरणीच . सून चांगली नाही अस बोलून मोकळे होतात… मुलातील दोष नाहीत दिसत… तिने अस पाऊल उचलला कारण परिस्तिथी हाताबाहेर गेली… मला आश्चय वाटतं कि काहीही वाईट घडलं कि सून चांगली नाही.. आणि प्रगती झाली, मुलाला यश मिळालं कि आमचा मुलगा कर्तृत्ववान…
हेच जर मुलाने केल असत तर बोललं असत का कि तोच चांगला नाही.. तेंव्हापण असच बोललं गेलं असत कि तिच्यातच काहीतरी कमी आहे म्हणून तो गेला… आईवडील आपल्या मुलाच्या खूप मोठया चुका माफ करतात पण तेच आईवडील दोष मात्र सुनेला देतात..
मोठया घरची.. लहान घरची.. हा मुद्दा च नाही.. नवरा कसा वागवतो त्यावर बायको कशी राहते हे समजत.. दोष दोघांचेपण असतात… चुका दोघाच्या असतात.. गुन्हेगार मात्र सुनेलाच ठरवतात… अजून कितीतरी अशी उदाहरणं आहेत जिथे मुलाच्या चुकांच खापर सुनेच्या डोक्यावर फोडतात… तिला दोषी ठरवतात.. आपल्या मुलाला जसं सांभाळून घेतात तसंच सुने ला का नाहीत घेऊ शकत…? जसं मुलगा चुकतो.. तेंव्हा अस बोललं जात तिनेच काहीतरी केल असेल . मग जेंव्हा सून चुकते.. तेंव्हा का नाही बोलल जात कि मुलाकडून काही चुकलं असेल म्हणून तिने अस केल…
समाज सुधारला वगैरे काही नाही.. कितीतरी घर फक्त या भेदभाव आणि अश्या वागणुकीमुळे मोडतात… जी कमजोर असतात त्या सहन करतात.. ज्या खंबीर असतात त्या यातून मार्ग काढतात .. कधी कधी स्वतःसाठी खंबीर नसते स्त्री.. पण जेंव्हा आई बनते तेंव्हा तिच्या मुलाच्या भविष्यासाठी काही निर्णय घेते.. जे त्याच्यासाठी योग्य असतात .. मुलं मोठी झाली कि त्यांच्या आयुष्यात नको तितकं डोकं घातलं कि ते आईवडील तर सुखी राहत नाहीतच पण मुलांचे संसार पण सतत डगमगत असतात.. मुलाची काळजी करणे.. त्यांच्या भल्याचा विचार करणे हे आईवडिलांचं कर्तव्य असतंच. पण फक्त ईर्षेमुळे… किंवा अधिकार गाजवण्याचा भावनेने. मुलांच्या संसारात लुडबुड करून स्वतःला त्रास करून घेतात. कधी कधी मुलीच्या घरचे पण नको तितके involve होतात मुलीच्या संसारात.. अश्या situation मध्ये नवरा बायको मधील नात घडूळ बनत… मुलीच कस असत त्यांना सासरकडून माहेरसारखी वागणूक कधीच मिळत नाही.. म्हंणून त्या माहेर prefer करतात.. त्यात मग कधी कधी आई वडिलांची अति इन्व्हॉल्वमेंट दोघाच्या नात्यात अडथळा आणते..
मुलांची लग्न झाली कि त्याचं नात आणि त्याचा संसार संभाळण्याची जिम्मेदारी त्या दोघांवर सोपवावी..
आणि त्या दोघांनी ठरवावं काय करायचं ते…
जग पुढे गेलं म्हणतात पण अजून जुन्या पद्धती आणि विचार यामुळे कितीतरी पाय अडकलेले आहेत…
सून पण एक स्वतंत्र माणूस आहे.. तीपण कोणाची तरी मुलगी आहे.. जी मुलासारखीच लाडात मोठी झालेली असते… तिला मुलगी म्हणून नाही तर सून म्हणूनच अधिकार असुद्या… माणूस म्हणून जगु द्या.. दर वेळेला तीच चुकते अस नाही होत..
शेवटी संसार करणे.. मुलं मोठी करणे.. मुलांना एक चांगला माणूस बनवणे हे आई वडील दोघचं आद्यकर्त्यव्य आहे..
लग्न, संसार ही सामाजिक पद्धत.. रीत आहे.. जी निभावणे…मग ती कशी निभवायची? हे त्या संसार करणाऱ्या दोघांनी ठरवणे..
दोघांना दोघांच्या चुका दाखवून देण.. गरजेच्या वेळी आधारस्थंभ असणं हे जेष्ठ व्यक्ती च कर्त्यव्य. जे अनुभव असतात आयुष्याबद्दल चे ते सांगून आपण कुठे चुकलोत तिथे तुम्ही चुका करू नका असे मार्गदर्शन करावं. याउलट नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालून दरवेळी सून चुकते हा समज मनात रुजून घेतात जो चुकीचा असतो .. ती दुसऱ्या घरून आली म्हणून कायम तिला दुय्यम स्थान दिल जात.. मुलाच्या चुका तिच्यावर थोपवल्या जातात.. तीपण तिचा संसार च करत असते आणि जेंव्हा ती सगळ्या गोष्टीसाठी विरोध करते तेंव्हा मात्र तिची बदनामी करायला सुरवात होते…
प्रत्येक दुसऱ्या घरामध्ये हे असच चाललेलं असत… फक्त कारण वेगवेगळी असतात.. बऱयापैकी मुली स्वतःच्या पायावर उभ्या असतात त्यामुळे अश्या situation मधून मार्ग काढून स्वहिम्मतीवर मुलं घडवतात..
कधी कधी तिलापण समजून घेण्याची गरज असते… ती चुकतपण असेल बऱयाच वेळी पण चूक केली म्हणून तिला लगेच आरोपी च्या काडघरयात उभ करत राहिले तर ती कशी समजून घेईल दुसर्यांना… मुलगा चुकला.. अडखळला तर त्याच्या पाटी भक्कम उभे राहतात पण सुने ला मात्र शिक्षा… ती तरी का कोणासाठी अड्जस्ट करेल..?? का कोनाला समजून घेण्याचा प्रयत्न करेल…?? जेंव्हा हे बदलेल तेंव्हा प्रत्येक वयोगटातील व्यक्ती समाधानी असेल… बाकी प्रत्येकाचं स्वतंत्र असत सुख समाधान कशात आणि किती मानायचं पण निदान काही तरी फरक नक्की पडेल…

शुद्धलेखनाच्या चुका माफ असाव्यात.. 🙏

सौ प्रिया महेश पुरीArticle Categories:
मनोरंजन

Comments are closed.