ती आणि तो (निरागस प्रेम) भाग 10 (अंतिम भाग)

Written by

ती आणि तो

भाग 10

(निलेशचा पार रंगच उडाला होता)

(हा आज घडीचा सगळा प्रवास शालिनीच्या डोळ्यासमोर फिरला आणि ती मनोमन सारंगचा विचार करत होती )

डॉक्टर : आबा शालिनीचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे, आपण परवाच तिच्या डोळ्यांच ओपरेशन करून टाकू…..
आबा : चांगली बातमी दिली डॉक्टर…. Thank you …..

(operation यशस्वी पार पडल, आज तिच्या डोळ्यांवरची पट्टी काढणार आहे )

डॉक्टर : “Hello” शालिनी!! Little excited??? (पट्टी काढत)

शालिनी : “Yes, doctor ” after two years I am going to see my near once…

डॉक्टर : आता हळू हळू आपले डोळे उघड….

(शालिनी हळू, हळू आपले डोळे उघडते, समोर आई, बाबा, सासूबाई, आबा , ऊर्मिला, सारंग आणि शेवटी पाणावलेले डोळे दिसले…
पाणावलेले डोळे निलेशचे होते…. त्याच्या डोळ्यांत आज पश्चाताप दिसत होता, पण अचानक अस काय झालं. शालिनी आश्चर्याने बघत होती…. निलेश सर्वांसमोर हात जोडून माफी मागू लागला…

निलेशने त्याची आत्तापर्यंतची शालिनीसोबतची सगळी वागणूक कबूल केली

निलेश : मला माफ करा, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली….. आज जेव्हा माझी मुलगी हरवली तेव्हा मला कळाळ….  माझ्या डोक्यात नको नको ते विचार येऊ लागले, कोणी पळवून नेले नाही ना, ते लोक काय करतील माझ्या पिल्लूच ??? न्यूजमध्ये रोज काहीतरी नवीन ऐकायला मिळत, लहान मुलीवर बलात्कार करून खून केला…. अस काही तर नसेल ना…माझ पिल्लू अजून खूप लहान आहे, निट बोलताही येत नाही तिला…….रडून रडून पार डोक्याचा भुगा झाला….. कसे व्यसनाधीन लोक असतात निष्पाप मुलींचा नाहक बळी घेतात… आपणही वासनेच्या आहारी गेलो होतो….. सारंगमूळे मला या सर्वाची जाणिव झाली…..

सारंग : पिल्लू हरवल्याच नाटक करण गरजेच होत मित्रा, त्याशिवाय तुला तुझी चूक कळली नसती… मला तुझी माणसं तुझ्यापासून न तोडता तुला धडा शिकवायचा होता….

(घरातील सगळेच निलेशचा राग करायला लागले)

शालिनी : मला वाटतय की खरंच निलेशला त्याची चूक कळलीये, आपण आता त्याला माफ करायला हव….. चूका सगळ्यांकडून होतात पण जो चूक कबूल करतो तो शिकतो……

( सगळेच निलेशला मोठ्या मनाने माफ करतात)

शालिनी आता खूप खुश असते… दुपारी घरी बेल वाजते…..
कुरिअर असेल बहुतेक ?? …… ती दार उघडते…..

ती : तु??? आत्ता ??? यावेळेला कस येण केल???

तो : का? माझ्या घरी मी कधीही येईन … . (तिच्या जवळ जात)

ती : नाही तस नाही ….. (एक पाऊल मागे टाकत)

तो : मग कस? (गुलाबाच्या पाकळ्या तिच्यावर उधळत )

ती : आज स्वारी भलतीच रोमँटिक दिसतेय… .

तो : हो का???? (तिला त्याने अलगद उचलून बेडवर झोपवले आणि एकटक पाहत बसला. )

ती : असा काय बघतोस????

तो : काय ग?? ? तुझ्या डायरीत तर तु खूप रोमँटिक असतेस, मग इथे अशी गप्प का???

ती : माझ्या डायरीतल्या ती पेक्षा तो जास्त रोमँटिक आहे… पण काय फायदा प्रपोज तर मलाच कराव लागल ….. म्हणून तर आपल लग्न तरी झाल नाहीतर त्या करियरच्या नादात already बरीच वर्षे घालवली होतीस….

तो : हो का???

तिच्या चेहर्‍यावर पडणारी तिच्या केसांची लट बाजुला करत त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले आणि काही क्षण त्यातच हरवून गेले …..

तो : I love you शालिनी …..

ती : Love you सारंग

समाप्त…..

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा