ती आणि तो (निरागस प्रेम) भाग 6

Written by

ती आणि तो

भाग 6

कोणाला काही कळायच्या आतच शालिनी जिन्यावरून खाली पडते, डोक्याला जबर मार बसल्यामुळे तिला ताबडतोब हॉस्पिटलला नेण्यात येते. घरच्यांवर तर आभाळच कोसळत, इकडे पोटची दोन्ही मुलं काळाआड गेली आणि शालिनी??? तिची  अवस्था तर गंभीर होती….. 3 दिवस झाले शालिनी ICU  मध्येच होती. अजूनही ती शुद्धीवर आली नव्हती….

अपघातात गाडी इतक्या खोल दरीत कोसळली होती की पोलिसांनाही फार शर्थीचे प्रयत्न करावे लागले शव बाहेर काढण्यासाठी, गाडी दरीत कोसळून स्फोट झाल्याने शवांची ओळख पटणही कठिण झाल होत…

हर्षच्या मित्रांच्या पालकांसाठीही हा मोठा धक्का होता, पोलिसांच्या मध्यस्थीने सगळयांचे अंतिम संस्कार एकाच ठिकाणी करण्यात आले.

आज सहाव्या दिवशी शालिनी शुद्धीवर आली, सगळ्यांना फार आनंद झाला खरा पण तोही जास्त काळ टिकला नाही कारण शालिनीला काहीच दिसत नव्हते, रश्मीताई तर देवालाच दोष देत होत्या, तरुणपणीच नवरा नेलास आणि आता मुलीची द्रुष्टीही नेलीस, इतका निर्दयी कसा झालास रे देवा, आता तिने आपल आयुष्य कस जगाव ??

इथे आबा आणि वसंतराव डॉक्टरकडे जाऊन विनंती करत होते की काहीतरी मार्ग असेल?? वसंतरावांनी तर दिल्लीहून मोठे डॉक्टर बोलावले…. सगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स काढण्यात आले. अॉपरेशन कराव लागणार होत पण शालिनीची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तेही शक्य नव्हतं….. ती अजूनही घडलेली घटना मान्य करत नव्हती.. .

असेच दिवसामागून दिवस जात होते पण शालिनीची प्रकृती स्थिर होत नव्हती. दोन वर्षे झाली तरी तेच, या दोन वर्षात शालिनीने तीनदा जीव देण्याचा प्रयत्न केला पण देवाच्या दयेने ती सुखरुप वाचली…. तिला रेग्युलर मानसोपचारतज्ज्ञ कडे नेले जात असे.

एक दिवस असच हॉस्पिटल मधून बाहेर पडताना सारंगने तिला पाहिले आणि “Hello!! ” करत हात पुढे केला, पण शालिनीने त्याला काहिच रिस्पॉन्स नाही दिला. त्याला आश्चर्य वाटले, कारण सारंग तिचा कॉलेज फ्रेंड होता. त्याला वाटले कदाचित तिच लक्ष नसाल म्हणून तो इग्नोर करून आत डॉक्टरांकडे जातो.

सारंग : Hii Dad, what’s up ??
(शालिनीचे डॉक्टर हे सांरगचे बाबा आणि एक  प्रसिद्ध  मानसोपचारतज्ज्ञ)

Nothing serious, but very critical (सारंग चे बाबा)

सारंग : Dad, शालिनी इथे का आली होती??

तु ओळखतोस तिला??? आणि मग त्यांनी सारंगला शालिनीची संपूर्ण कहाणी सांगितली.
सगळंच आश्चर्यचकित करणार आहे (सारंग म्हणाला )

हो ना, माझ्या इतक्या वर्षाच्या करियर मध्ये मी अशी केस कधीनाही पाहीली. (सारंगचे बाबा  म्हणाले )

संपूर्ण दिवसभर सारंग शालिनीचाच विचार करत होता, त्यातच त्याला एक कल्पना सुचली आणि ती त्याने त्याच्या बाबांना सांगितली.

थोडा विचार करून ते म्हणाले की आपण हे सगळ उद्या सकाळी बोलू (शेवटी ते एक डॉक्टर होते आणि पुरेपूर विचार करूनच निर्णय घ्यावा लागणार होता )

सकाळी उठल्यावर लगेच सारंग त्याच्या बाबांकडे गेला तर त्यांनी त्याला  स्पष्ट सांगितले “wait my boy, Have some patience” आपण दहा वाजता हॉस्पिटलला भेटू आणि ते बाहेर  निघून गेले.

सारंग 9.30 लाच हॉस्पिटलमध्ये हजर ..

(साहजिकच आहे शालिनी त्याच फर्स्ट क्रश होती, तिला या अवस्थेत बघन त्याला फार कठीण जात होत)

(सारंगला त्याचे बाबा आत बोलावतात)

सारंग : (खूर्चीवर बसत) “Dad” तुम्ही विचार केलात का यावर???

(इतक्यात एकजण आत येऊ का विचारतो)

Ohhh, please come, have a seat, meet my son “सारंग” and सारंग…He is “हर्ष”…..  शालीनीचे…… Husband….(सारंगचे बाबा दोघांना एकमेकांची ओळख करून देतात)

(सारंग पूर्णतः गोंधळून जातो)

सारंग : हा काय प्रकार आहे Dad?? तुम्ही तर म्हणाला होतात की तिचा husband अपघातात गेला म्हणून. . .

हर्ष : मी सांगतो …. शालिनी सोबत माझ लग्न झालं खर पण नवरा म्हणून तिला हव असलेल सुख मी नाही देऊ शकलो.

सारंग : म्हणजे ??

हर्ष : (एक मोठा श्वास घेत) सारंग….., Actually मला मुलींमध्ये काहीही interest नाही…… मी Gay आहे , समलिंगी आहे….. मला जेव्हा हे कळल तेव्हा माझासाठी सगळच अवघड होत….. घरच्यांना तर सहनच झाल नसत….. आपल्या सो कॉल्ड समाजामध्ये वावरण त्यांना कठीण गेल असत….

माझ्यासाठी शालिनीच स्थळ सांगून आल तेव्हा मी नकार देण्याचा खूप प्रयत्न केला पण ते शक्य नाही झाले. त्याआधीही मी बरीचशी स्थळे नाकारली ..  पण या वेळी नकार देण जमल नाही ..नकार द्यावा अशी  एकही कमी तिच्यात नव्हती. ….   मला वाटल शालिनी हुशार आहे , शिकलेली आहे तर तिला माझी घालमेल कळेल आणि ती स्वतःहून  लग्नाला नकार देईल…… त्यावेळी लंदनला Economics या विषयावर specialization कोर्ससाठी, आमच्या कॉलेजच्या वतीने माझी निवड करण्यात आली….. . लग्न ठरलं आणि दोन दिवसांत हि संधी चालून आली. I guess she’s lucky for me. कारण या संधीची मी तीन वर्षापासून वाट बघत होतो आणि इथेच मी थोडा स्वार्थी झालो…..

सारंग : (काहीसा चिडून) मग फोन करायचास ना? फोनवर सांगायच होतस तिला…..

हर्ष : मला तशी संधीच नाही मिळाली. लंदनवरुन आल्यावर आठवड्याभरात आमच लग्न झालं सुद्धा. खरंतर मी थोडा स्वार्थी झालो होतो . शालिनी मला आवडत होती, ती सोबत असावी असच वाटायचं… मला वाटल मी तिला हव ते करण्याची मुभा दिली तर तिलाही काही हरकत नसावी,  आई आणि आबा पण खूश होते त्यांना हवी तशी सून मिळाली होती… ..

सारंग : तु तिला फसवल आहेस, कळतय का तुला????

(सारंग खूपच चिडला होता)

हर्ष : “I am sorry ” but या सगळ्यासाठी मी एकटा जबाबदार नाहीए.

डॉक्टर : शालिनी “Day dreamer ” आहे. फक्त एवढंच नाही तर ती continues त्याच विश्वात असते.

हर्ष : मी लग्नानंतर लगेच सगळ तिला सांगितले आणि घरी कोणालाही याबाबत सांगू नकोस अशीही विनंती केली… तिला हव तशी लाईफ ती जगू शकते हेही सांगितल…   आधी तर तिला सगळी मस्करी वाटली पण नंतर तिला ते पटल कदाचित….. मला वाटल तिने हे नॉर्मली घेतल…. पण नाही, आता ती स्वतःच्याच विश्वात असायची …  तिची ड्रिमींग तर वाढतच चालली….. कदाचित तिची घुसमट होत असावी, ” I don’t know ”  या सगळ्यातच ती depression मध्ये जात गेली…..एकटीच फोनवर गप्पा मारायची, सतत काहीतरी विचारात असायची…..

सारंग : what rubbish????  अस कधी होत का Dad???

डॉक्टर : मी तिचे रिपोर्ट्स काढले, अती विचार करण्याने तिच्या नर्व्हस सिस्टीमवर परिणाम झालाय  त्यात भर म्हणजे हर्ष चा अपघाती मृत्यू! या सर्वांचा जबरदस्त धक्का तिला बसलाय….. “सारंग ” …. तु म्हणतोस तसा experiment जर आपण केला तर ती एकदम बरीही होऊ शकते किंवा???

सारंग : नाही!!! ती पूर्णपणे बरी होणार, मी तिला मदत करेन…. & you.. Mr. हर्ष!!! “you just stay out-of it..”

हर्ष : She is still my wife OK!!! And I really care about her……

क्रमशः

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा