ती आणि तो (निरागस प्रेम) भाग 7

Written by

ती आणि तो

भाग 7

हर्ष : She is still my wife OK!!! and I really care about her….

(इतक्यात डॉक्टरांचा फोन वाजतो आणि रिसेप्शन त्यांना काहीतरी सांगते)

डॉक्टर : हर्ष… ” you just go inside ” तुझे बाबा येत आहेत इथे……

(हर्ष आत पडद्याआड उभा राहतो, सारंग काही बोलणार इतक्यात डॉक्टरांनी त्याला खूणेनेच गप्प राहण्यास सांगितले )

आबा : डॉक्टर ही फाईल माझ्याकडेच राहिली होती .. ( हातातील फाईल पुढे करत)

डॉक्टर : It’s okay आबा!!!! बाहेर रिसेप्शनला दिली असती तरी चालल असत…..

आबा : आमची शालिनी बरी होईल ना डॉक्टर … आम्ही आहोत तोपर्यंत ठीक आहे पण .. आमच्या नंतर कस व्हायच ???? या म्हातारपणात पोरीची अशी अवस्था बघवत नाही हो….. माझे दोन्ही मुलगे गेले आता ऊर्मिला आणि शालिनी याच आमच आयुष्य…. यांच आयुष्य मार्गी लागल की आम्ही मरायला मोकळे….. (आपले अश्रू पुसत)

डॉक्टर : आबा…… शांत व्हा….. होईल सगळ नीट…. काळजी घ्या…..

(आबा निघून गेल्यावर हर्ष बाहेर येतो… )

सारंग : “this.. is…. too much ” यांना पण फसवलस???

डॉक्टर : सारंग…. “You please calm down ”
आधी त्याच ऐकून तर घे…

हर्ष : मी… मुद्दाम नाही केल काही, please जरा समजून घे….

सारंग : Ohhh really??? तु खरच मुद्दाम नाही केलस…आणि काय रे तुझा अपघात झाला होता ना??? मग हा सगळा काय प्रकार आहे ????

हर्ष : त्या दिवशी आम्ही फार्महाऊसवर सगळे निघालो होतो, एक सिगारेट ओढायची म्हणून मी गाडीतून बाहेर पडलो. .. प्रतिकच्या बाईकची चावी घेतली आणि मी एकटाच बाईकवर निघालो… प्रतिक आणि बाकीचे फ्रेंडस गाडीने येत होते…. गाडी ओवर टेक करताना रात्रीच्या वेळेस रस्ता चुकला आणि गाडी दरीत कोसळली…. क्षणभर काहीच कळेनासं झालं… येवढ्या रात्री निर्जन स्थळी मदत मिळण पण कठीण होतं…
स्फोटाचा आवाज आला आणि मी भानावर आलो… लवकरात लवकर मदत मिळावी म्हणून मी बाईक भरधाव वेगाने पळवत सुटलो…
एका वळणावर बाईक स्लिप झाली नी, मी खाली पडलो … सकाळी जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो… डॉक्टरांना मी विचारपूस केली तेव्हा कळलं की मी गेले 10 दिवस तिथेच होतो….
माझा फोन, पर्स मी गाडीतच विसरलो होतो …. जवळच्या पेशंट कडून फोन घेऊन मी घरी फोन केला पण तो बंद येत होता….
अपघाताच्या रात्रीची चौकशी केली तर कळल की कोणीच वाचल नाही म्हणजे आई, आबांसाठी मीही त्याच अपघातात मरण पावलो होतो…. मग मीही विचार केला अनायसे आपण मृतच आहोत सर्वांसाठी तर ते असच राहू दे….
मी आणि शालिनी या लग्नाच्या बंधनातून सुटू….. आई आबांना आपल्या समलिंगी असण्याच्या त्रासापेक्षा आपण मृत झालोय याचा कमी त्रास वाटेल …..

सारंग : किती मतलबी आहेस तू…… ईथे पण आपला स्वार्थ साधलास…. देव तुला कधी माफ नाही करणार……

हर्ष : बरोबर आहे तुझ…. त्याने नाहीच माफ केल… माझे आईवडील आणि भावंड माझ्यापासून दूरावले आणि माझा एक पायसुद्धा……

सारंग : (थोडा नरमाइने त्याच्याकडे बघत) मग आता इथे का आलास????

हर्ष : येणार नव्हतोच, मी “Bangalore” ला शिफ्ट झालो होतो, पण तिथे अचानक निलेश भेटला आणि मी त्याला खर काय ते सांगुन टाकल… त्यानेच मला शालिनीची ही अवस्था सांगितली….
मला वाटल मी जिवंत आहे हे कळाल तर कदाचित तिला आनंद होईल आणि ती यासर्वांतून बाहेर येईल….. गेल्या महिनाभर मी तिला हिथे येऊन भेटतोय पण……

डॉक्टर : ती स्वप्नांच्या दुनियेत वावरतेय…. तिच्या मनात जो हर्ष आहे तो हा नाही, ती ह्याला ओळखतसुध्दा नाही.. द्रुष्टी गेल्यापासून तिला काही दिसत नाही पण आवाज आणि स्पर्शाने तरी तिने हर्षला ओळखायला हव होत पण नाही…
मी तिला हर्ष बद्दल जेव्हा विचारलं ” I was totally shocked ” या हर्षमध्ये आणि तिच्या स्वप्नातल्या हर्षमध्ये खूप फरक आहे…..

हर्ष : पण डॉक्टर आज तुम्ही मला का बोलावलं???

डॉक्टर : सारंगच्या सांगण्यानुसार जर आपण experiment केला आणि जर तो successful झाला तर good नाहितर ती त्याला हर्ष समजून बसेल…. “do you understand Mr. Harsh, what I mean ” आणि सारंग तुला कळतय का????

सारंग : मी तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे, मी कायमचा तिचा हर्ष बनुन राहीन…..

हर्ष : (काहीसा रागावून) why are you so possessive about her?? She’s my wife and मी आहे तीची काळजी घ्यायला…..

(सारंगच्या मनातल्या भावना त्याच्या बाबांनाही कळल्या)

डॉक्टर : हर्ष या experiment साठी मला तुमची परवानगी लागेल तिचा नवरा म्हणून….काय आहे ना शेवटी आपली बायको दुसऱ्याच्या प्रेमात पडलेली कोणत्याही नवर्‍याला आवडणार नाही.. “afterall she’s still your wife ” (ते हर्ष जवळ थोडी नजर रोखूनच बोलले)

हर्ष : (स्वतःची चूक मान्य करत) ठिक आहे डॉक्टर…… तुम्हाला जे योग्य वाटते ते करा, माझी काहीच हरकत नाही….
(आणि हर्ष निघून जातो)

डॉक्टर : सारंग ” are you really serious about Shalini ”

सारंग : I love her Dad, कॉलेजपासून माझ तिच्यावर प्रेम आहे, करिअर आधी सेट करायच म्हणून मी तिला माझ्या मनातलं कधीच नाही सांगितलं….

डॉक्टर : मी ते मगाशीच ओळखलं, Go ahead….. मला खात्री आहे तु नक्कीच तिला बर करशील … फक्त मला जास्त आनंद तेव्हा होईल जेव्हा ती तुला हर्ष म्हणून नाही तर सारंग म्हणून स्वीकारेल….

सारंग : (मिठी मारून) ” Thanks dad, I do my best
love you Dad……

क्रमशः

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत