ती आणि तो (निरागस प्रेम) भाग 8

Written by

ती आणि तो

भाग 8

सारंग : (मिठी मारून) ” Thanks dad, I do my best ” love you Dad……

संध्याकाळी सांरगने आबा आणि माधवीताईंची भेट घेऊन त्यांना शालिनीच्या पुढच्या उपचाराची सविस्तर कल्पना दिली. थोडावेळ विचार करून त्यांनीही संमती दर्शविली…. मग ठरल्याप्रमाणे रोज आबा शालिनीला कधी तिच्या कॉलेजच्या आवारात फिरायला घेऊन जायचे तर कधी लहान मुलांनी भरलेल्या गार्डनमध्ये घेऊन बसायचे , एकदा सारंग ने कॉलेजच्या नाटकाच्या सरावाला हजर राहण्यास सांगितले, अर्थात ते सर्व त्यानेच अरेंज केल होत खास शालिनीसाठी ……

कॉलेजच्या जमान्यात त्याने आणि शालिनीने एकत्र ज्या नाटकात काम केले तेच नाटक आज परत खास तिच्यासाठी योजल होते….

सारंगच्या सांगण्यावरून आबा शालिनीला घेऊन आले, काहीवेळातच नाटकाचा सराव सुरू झाला. ठरल्याप्रमाणे आबा शालिनीला तिथेच बसवून बाहेर गेले, नाटक छान रंगात आले होते. सारंगने बरोबर सुचना देऊन ठेवल्या होत्या की नक्की नाटकाच्या कोणत्या वळणावर चूकायच, कुठे विसरायच हे सगळं. तो दुरूनच तिच्या हालचालींवर नजर ठेवून होता.

असेच पंधरा दिवस झाले, हा रोजचाच दिनक्रम सुरु होता. एक दिवस अचानक सारंग शालिनीच्या घरी गेला. आबा घरी नव्हते, माधवीताई किचनमध्ये काम करत होत्या, शालिननीची चौकशी केली असता कळाल की ऊर्मिला तिला घेऊन घराच्या मागच्या अंगणात (घरच्या गार्डनमध्ये) गेली होती….

सारंग तिला घरच्या खिडकीतून न्याहाळत होता…. तिथुन ती त्याला स्पष्ट दिसत होती, ऊर्मिला थोड्यावेळाने तेथून निघून गेली आणि हर्ष तिथे आला…. सारंगला आश्चर्य वाटले की हर्ष इथे कसा???  कोणी पाहिल तर??? येवढ्यात माधवीताईंनी सारंगला चहा आणून दिला…. सारंग चहा पिताना संपूर्ण घर न्याहाळत होता, परत येऊन बघतो तर तिथे कोणीच बसल नव्हत…. माधवीताईंची परवानगी घेऊन तो शालिनीच्या खोलीत गेला…. खोलीच निरीक्षण करून तो थेट कॉलेजच्या नाटकाच्या सरावाच्या ठिकाणी गेला….. तो त्याच ठिकाणी जाऊन बसला जिथे शालिनी रोज बसते…. तो सारख हाच विचार करत होता की अजून काय करता येईल, जेणेकरून शालिनी नॉर्मल होईल….. तिच्या घरातून बाहेर निघाल्यापासून त्याच्या डोक्यात विचारचक्र सुरु होते… की हर्ष त्याठिकाणी कसा????

आणि त्याच लक्ष बेंचवर जात… त्यावर काही कोरल होत ……”एकांत भेट” कोणी लिहिल असेल आणि का????
त्याला आठवल की नाटकाचा सराव सुरू असताना शालिनीच कधीच नाटकाच्या सरावाकडेे  लक्ष नसायच, ती सतत बेंचवर काहीतरी ओरबाडत असे…. सारंग विचार करू लागला कदाचित हे शालिनीने लिहिल आहे…. पण का???? काही सांगायच असेल का तिला, का ती तिच्या Day dreaming मध्ये हे करतेय….

( याच विचारात तो घरी येतो)

आज शालिनीची डॉक्टरांकडे appointment होती , आबा तिला नेहमीप्रमाणे हॉस्पिटलला घेऊन आले…. यावेळेस त्यांनी शालिनीला डॉक्टरांकडे बसवले आणि स्वतः काही कामासाठी निघून गेले, जाताना डॉक्टरांना एवढच सांगुन गेले की शालिनीला न्यायला माधवीताई येतील …

शालिनी कॅबिन मध्ये बसून होती, इतक्यात तिला कोणीतरी तिच्या कमरेला हात लावलेल जाणवत… ती पटकन तो हात दूर सारून ऊभी राहते… तर ती व्यक्ती शालिनीच्या अजून जवळ जाते तिला स्वतःकडे ओढू पाहते…

ती व्यक्ती : शालिनी मला तु मला आवडतेस…. ( आणि तिला दोन्ही हातांनी आपल्या जवळ ओढतो)

शालिनी : (त्याच्या पकड मधून स्वतःला सोडवत जोरात ओरडून) Behave yourself……. “सारंग”!!!! Don’t touch me….     शीsss……मला तुझ्याकडून ही….. अपेक्षा नव्हती….

(ती व्यक्ती म्हणजे सारंग हे शालिनी बरोबर ओळखते)

सारंग : पण मला हिच अपेक्षा होती तुझ्याकडून……

शालिनी : म्हणजे???

सारंग : म्हणजे तु एकदम ठिकठाक आहेस आणि तु कोणत्याही depression मध्ये नाहीस…. मग हे अस का वागतेस ???? बोल माझाशी शालू काय झालंय???

(शालिनी रडतच खाली बसते)

शालिनी : माझ लग्न होऊन मी या घरात आले…. लग्नाच्या पहिल्याच रात्री मला कळाल की माझा नवरा म्हणजे हर्ष समलिंगी आहे… माझी फसवणूक झाल्याचा मला खूप राग आला होता पण त्याची बाजू ऐकून घेता, मला त्याची दया आली….. माझ्याकडे त्याने काही दिवसांची मुदत मागितली की तो लवकरच ही गोष्ट घरी स्पष्ट करेल……

आमची छान मैत्री जमली होती… आम्ही खूप गप्पा मारायचो, फिरायला जायचो…. त्याच्यासोबत बोलल्यानंतर मला कळल की समलिंगी लोकांच आयुष्य किती खडतर असत…..

एक दिवस हर्षचा मित्र निलेश घरी आला, त्याला हर्ष ने जेवायला आमंत्रित केल होत.. आईआबा त्यावेळी फार्महाऊसवर गेले होते…. मी किचनमध्ये काम करत असताना अचानक त्याने मागून येऊन मिठी मारली…… मी स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवल त्याला काही बोलणार इतक्यात ऊर्मिला तिथे आली… तिने त्याला I love you म्हणत मिठी मारली… पण तिच्या मिठीत असताना त्याची नजर माझ्यावरच खिळली होती….

जेवण झाल्यावर आम्ही झोपायला गेलो तेव्हा हर्ष ने सांगितले की ऊर्मिला आणि निलेशच्या लग्नाचा विचार सुरु आहे… मग मला वाटल कदाचित त्याने ऊर्मिला समजून आपल्याला मिठी मारली असेल… म्हणून मीही त्यावेळी इग्नोर केल…

पुन्हा काही दिवसांनी जेव्हा आम्ही मुव्ही बघायला गेलो तिथेही त्याने एकांतात माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला पण यावेळेस मी त्याला कानाखाली लगावली आणि त्याच वेळेस हर्षने पाहिले… मी आतापर्यंत घडलेला सगळा प्रकार त्याला सांगितला…… हर्षने त्याच्या या वागणुकीमुळे ऊर्मिला सोबत त्याच लग्न न होण्याचा इशारा दिला.

हर्षच्या समलिंगी असण्यावरुन निलेशने वाद निर्माण केला आणि ही समलिंगीची गोष्ट घरी सांगणार याची धमकी दिली….

हर्षने स्वतःहून घरी सगळं खर सांगायच अस ठरवल आणि आम्ही घरी आलो….

क्रमशः

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा