ती आणि तो (निरागस प्रेम) भाग 9

Written by

 

ती आणि तो

भाग 9

 

 

तीनचार दिवसांनी निलेश घरी आला आणि आमची माफी मागू लागला…. म्हणाला त्याच्याकडून चुकून झाले, ऊर्मिला समोर तो गयावया करू लागला…. पण त्याची ती नजर खूप काही सांगून गेली होती…. ऊर्मिलासाठी हर्षने त्याला माफ केले….

सगळ नीट चालू होत आणि हर्षच्या सरप्राईज बर्थडे पार्टीची तयारी सुरू झाली. बर्थडेच्याच दिवशी सगळं घरी सांगून टाकायच अस हर्षने ठरवल होत……

आम्ही सगळे फार्महाऊसवर मजामस्ती करत होतो, मम्मी पप्पा, आबा आणि आई थकून लवकरच झोपले. … हर्ष, प्रतीक आणि त्यांचे मित्र यांना यायला उशीर होणार होता…..

गाण्यांच्या भेंड्या संपवून सगळे आपापल्या खोलीत झोपायला गेले. मला झोप येत नव्हती म्हणून मी माझ्या खोलीत बाल्कनीत उभी राहून पावसाचा आनंद घेत होती…..थोड्याच वेळात तिथे निलेश आला आणि परत त्याच तेच……

पाऊस खूप जोरदार सुरू होता, माझ्या बाल्कनीत निलेश कधी आला कळच नाही….

मी स्वतःला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत होते…

निलेश : शालिनी मला तु खूप आवडतेस. … तु खूप मोहक आहेस…. कोणाला काही कळणार नाही त्या हर्षकडून  तुला काय मिळणार आहे, मी तुझ्या गरजा पूर्ण करेन… बघ मी ऊर्मिलावर पण अन्याय नाही होऊ देणार .. मी तुम्हा दोघींनाही खूष ठेवेन…. ऊर्मिलासोबत लग्न झाल्यानंतर पण मी तुला काही कमी पडू देणार नाही…. तु हो बोल फक्त…

शालिनी : सोड मला…. जा तू इथुन….. नाहीतर मी हर्षला सांगेन. …

निलेश : तो माझ काहीही वाकड करू शकणार नाही… आणि इथे तुझा आवाज कोणीही ऐकणार नाही… .

(आणि तो जबरदस्ती करु लागला)

कसतरी करून त्याच्या तावडीतून सोडवून मी खाली पळत सुटले, मी खूप घाबरले होते .. जिन्यावरून खाली उतरणार तोच त्याने माझा हात पकडला, मी जोराचा हात सोडवला…. त्याच बिंग फूटेल म्हणून त्याने मला जिन्यावरून धक्का मारला…… आणि मी खाली पडले…..

जेव्हा जाग आली तेव्हा मी हॉस्पिटलला होते…… गुंगीमूळे मला हालचाल करता येत नव्हती पण सर्वांच बोलन स्पष्ट ऐकू येत होत…. तिथे निलेशही होता…

निलेश सर्वांना सांगत होता की हर्षच्या अपघाताचा फोन ऐकून मला चक्कर आली आणि म्हणून मी खाली पडले…
पूर्ण शुद्धीवर आल्यावर कळाल की मी आता बघू शकत नाही… निलेश या गोष्टीचा जास्त फायदा घेणार म्हणून मी depression च नाटक करतेय…..

सारंग : Ohhh my God….. शालिनी…. अग  कोणालातरी विश्वासात घेऊन सांगायच होतस….

शालिनी : मी हे सगळं सांगणार होते पण निलेश आणि ऊर्मिलाच्या लग्नाचा विषय जोर धरून होता… कारण आमची ऊर्मिला प्रेग्नंट असल्याचं कळलं होतं….

माझ काही सांगन चारहीजणांच आयुष्य खराब करून गेल असत….

सारंग : कस सहन केलस दोन वर्ष….. या अंधपणाचा फायदा घेतला असता त्याने….

शालिनी : हो… अजूनही प्रयत्न करतो तो, पण माझ्या या अवस्थेमध्ये सतत कोणी ना कोणी माझ्या बरोबर असत म्हणून मी अजूनतरी शाबूत आहे…..

पण तुला कस कळाल की मी  नाटक करतेय….???

सारंग : काल जेव्हा मी तुला हर्ष सोबत तुमच्या घराच्या गार्डनमध्ये पाहिल, तेव्हा तु त्याच्यासोबत खूप uncomfortable होतीस….. तुझ्या खोलीत फोटो पाहिले तर मला संशय आला आणि तु त्या बेंचवर केलेल्या खूणा “एकांत हवा” वैगरे … बर तुझ्या खोलीत मी भेटलेल्या हर्षचा एकही फोटो नव्हता …     म्हणून मी आजचा प्लॅन केला…

शालिनी : काय ?? काल?? हर्षसोबत???……

तो हर्ष नव्हता…. ” सारंग ” …. तो निलेश होता…..

सारंग : Wait a minute…. जर तो निलेश होता तर आम्हाला त्याने हर्ष म्हणून का introduce केल ???

शालिनी : कारण त्यालाही असच वाटतय की मी हर्षसाठी depression मध्ये आहे आणि हा हर्ष बनून आला तर परत त्याला माझ्यासोबत वेळ घालवता येईल… कालही त्याच तेच सुरु होत…

सारंग : तिच्या डोक्यावर हात ठेवून, don’t worry!!! आता मी आहे तुझ्यासोबत…. तुला घाबरायच काही कारण नाही…. मी सांगतो तस करूया ……

शालिनी : हम्मम्

(तिचे डोळे पाणावले आणि अश्रूंचा बांध फुटला)

सारंग : (तिच्या गालावर ओघळणारे अश्रू पुसत)   ए….. वेडाबाई….. आता रडायचे दिवस संपले. .. . आता फक्त हसायच….. सर्वात आधी आपण तुझ्या डोळ्यांच ओपरेशन करून घेऊ… . Hmm….

(शालिनी मानेने होकार देते)

दोघांनाही एकमेकांच आलिंगन हव होत तसे ते पुढेही सरसावले होते पण आहे तिथेच थांबले….

ती विचार करते की त्याला काय वाटेल आणि तो विचार करतो की ती काय म्हणेल, परत आपल्यावरच रागवेल……

(माधवीताई शालिनीला घरी नेण्यासाठी येतात)

शालिनीला आता नॉर्मल होताना बघून घरी सगळेच खूप खुश होतात…
सारंग रोज घरी येतो शालिनीला भेटण्यासाठी…..

एक दिवस सारंग आबांजवळ शालिनीला लग्नाची मागणी घालतो….
अर्थात नकार देण्यासारखे काही कारण नसत…. आबा होकार देऊन ही बातमी शालिनीच्या आई वडिलांना सांगण्यासाठी उठून जातात….

(आबा गेल्यावर शालिनी काही बोलणार इतक्यात)

सारंग : I am sorry … मी तुला न सांगताच आबांना खोट बोललो… … पण निलेशच खर रुप समोर आणण्यासाठी हे सगळ गरजेच आहे…. तु ठिक झालीस आणि लग्न करतेस म्हटल्यावर तो चिडून नक्कीच काहीतरी हालचाल करेल……. ” just wait and watch ”

(आणि तो निघून जातो)

(शालिनीच्या आईवडिलांना फोनवर बातमी सांगून आबा परत ईथे येऊन बसतात)

(निलेश आणि ऊर्मिला येताच)

आबा : या या जावईबापू…. अग ऊर्मिला ….. सारंगने शालिनीला मागणी घातली आहे लग्नाची… आम्ही तर धन्य पावलो….

माधवीताई : मी तर देवाजवळ साखरपण ठेवून आले… . सुखी रहा रे पोरांनो…..

निलेश : (थोडासा हडबडून) Ohhhh ….. Congratulations….

(निलेशचा पार रंगच उडाला होता)

 

 

क्रमशः

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत