ती आणि तो (निरागस प्रेम)

Written by

ती आणि तो

भाग 3

झाल का तुमच???

ती मागे वळली तशी सासूबाईंनी साद घातली… बस…. इथे…. आधी नाश्ता करुन घे….

अगं … होत अस कधीतरी…. गाढ झोप लागते… म्हणून मी काय तुला ओरडत बसू.. या घरात मीही राहते मग घरातल्या कामात मीही हातभार लावला पाहिजे. तुच लवकर उठून हे केल पाहिजे अस मला नाही वाटत …  सासूबाईंच बोलन ऐकून शालिनी थोडी सुखावली..

नाश्ता करता करता ती परत सकाळच्या स्वप्नात हरवली.. आपण एवढे छान स्वप्न पाहिले, किती छान रोमॅन्टिक प्लॅन होता हर्ष च्या बर्थडेचा.. . पण….   आईंनी हाक मारली आणि सगळ फूस्स…

मग तिला जाणवलं की हा रोमॅन्टिक प्लॅन कसा काय जमणार… या घरात एकूण सहा जण रहातात.. सासूसासरे, आम्ही दोघे, दीर आणि नणंद…….
बरं नाही वाटणार… मग काय करू मी… शी …  बाई .. काहीच सुचत नाहीये…

तेवढ्यात ऊर्मिला (शालिनीची नणंद) येते…

वहिनी अग यातला कोणता ड्रेस घालू दादाच्या बर्थडे पार्टीला????

शालिनी ने हसून एक ड्रेस सिलेक्ट करून दिला

शालिनी :  हा !! हाच .. छान दिसेल तुला….

ऊर्मिला : वाहह!! मस्त… मलाही तोच हवा होता…

आबा : सूनबाई तुम्हीपण बॅग भरा,  आपल्याला सकाळी फार्महाऊसवर जायच आहे…

मालती ताई : हो यावर्षीचा वाढदिवस त्याच्या मित्रांनी आणि या दोन भावंडांनी मिळुन  प्लान  केलाय आपल्या लोणावळ्याच्या फार्महाऊसवर.

ऊर्मिला : वहिनी तुझ्यासाठीपण सरप्राइज पॅकेज आहे तिथे..

शालिनी : हो का???  मलाही आवडेल ….. ए मी काही मदत करू तुम्हाला???

आबा : सूनबाई  यांची खूप आधीपासून तयारी  सुरु आहे..

प्रतीक : hiii वहिनी..  (खुर्चीवर बसत)

शालिनी : Hello…

प्रतीक : आबा…All done!!  सगळी तयारी झालेली आहे.. आणि दादाचे दोन मित्र Already  पोहचले सुद्धा…

माधवी ताई : अरे पण प्लान काय आहे तुमचा???

शालिनी : ए हो!! मलाही सांगा ना… Please ….

प्रतीक : हो हो सांगतो… आई त्याला प्लान नाही प्लॅन म्हणतात ….

माधवी ताई : हा तेच ते…

(सगळीकडे एकच हशा पिकतो)

प्रतीक : बरं… ऐका आता… आई, आबा आणि वहिनी तुम्ही,  उद्या सकाळी म्हणजे दादा काॅलेज ला गेल्यावर फार्महाऊसवर जायच, तुम्हाला निलेश (हर्षचा मित्र) इथून पिक करेल.. ऊर्मिला तु सुद्धा आई आबांबरोबर जाणार आहेस…

ऊर्मिला : ओके!!! (निलेश नाव ऐकताच ऊर्मिला जरा जास्तच खुलून म्हणाली)

(यावेळी शालिनी ने तिचा चेहरा बरोबर टिपला)

आबा : आणि हर्ष ??

प्रतीक : सांगतो… आधी पूर्ण ऐकून घ्या… मी आणि दादाचे बाकी मित्र त्याला कॉलेजवरुन kidnapped करणार..

काय??? ? (शालिनी आणि आई एकदम ओरडतात)

आबा : आणि मग मला खंडणीसाठी धमकी देणार की काय ?? (प्रसंगाची मजा घेत )

मालती ताई : तुम्ही गप्प बसा ओ!!

शालिनी : प्रतीक नीट सांगशील का??

प्रतीक : (हसत) नाही ग ” my dear वहिनी” तुझ्या नवर्‍याला पळवून नाही नेणार, गंमत केली थोडी…

मालती ताई : प्रतीक!!! मार खाशिल हं माझा…

प्रतीक : sorry… ( दोन्ही कान पकडून )

ऊर्मिला : तु पुढे सांग ना आता….

प्रतीक : हा ….  दादाला आम्ही रिसोर्टला जायच  सांगुन घेऊन येणार आहे.. बाकी सगळं तिथे गेल्यावर कळेल तुम्हाला……

क्रमशः

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा