ती आणि तो (निरागस प्रेम)

Written by

ती आणि तो

भाग 4

 

दुपारच जेवन आटपून शालिनी आणि ऊर्मिला उद्याच्या तयारीला लागतात, इतक्यात फोनची रिंग वाजते. शालिनी फोन उचलते…

हॅलो…. बोला राणीसरकार काय करताय?? ?

शालिनी : (लाजत) काहीनाही ….

हर्ष : मला वाटलं माझी आठवण काढत असशील…

शालिनी : आठवण येण्यासाठी विसराव लागत… तु थोडीच मला विसरायला देणार आहेस…

हर्ष : हो का??? ऐक ना!!! रागवणार नसशील तर बोलु ???

शालिनी : हमम् बोल ना…

हर्ष : साॅरी…. मी.. .. रात्री. .. जरा जास्तच सतावल ना????

शालिनी : शुss… तुझ आपल काहीतरीच. ..

हर्ष : पण, मी तरी काय करु?? तु आहेच इतकी गोड.. .अगदी मधासारखी. ….

शालिनी : प्रोफेसर शिकवणीवर लक्ष द्या बाकी आपण नंतर बोलु. …

हर्ष : नंतर काय? ?? थांब तुला आल्यावर बघतो. ..

ऊर्मिला मधेच त्यांच बोलन तोडून, दादा मी आहे ना इथे म्हणून…. .

शालिनी : हो आपण नंतर बोलु…

(दोघेही गालातल्या गालात हसत बाय करुन फोन ठेवून देतात)

सायंकाळी हर्ष घरी येताना सिनेमाची दोन तिकिटे घेऊन येतो.. आई, आबांना सांगून दोघेही निघतात. थिएटरच्या गेटवर शालिनीला उभी करून तो गाडी पार्क करायला जातो .. तेवढ्यात एक कार वेगाने हर्षच्या गाडी समोर येते.. कर्ररररर असा आवाज होतो.. प्रसंगावधान राखून दोघेही एकदम ब्रेक दाबतात, म्हणून मोठ संकट टळत… पण इथे शालिनी मात्र प्रचंड घाबरते… ती पळत हर्षकडे जाणार इतक्यात हर्ष तिला खुणेनेच सांगतो की मी ठीक आहे तु तिथेच थांब मी येतो . …

हर्ष गाडी पार्क करून येतो तस शालिनी त्याला घट्ट मिठी मारते, तो थोडा वेळ तिला बिलगून तसाच उभा  राहतो , एव्हाना त्याच्या लक्षात आलं की येणारे जाणारे लोक आपल्यालाच बघतायत, तो हळूच तिला म्हणाला जायच का आत सिनेमा बघायला???? सगळे आमच्या रडूबाईला बघून हसतायत…. तिने मान हो म्हणून डोलावली. ..

त्याने मस्त कॉर्नर सीट बुक केली होती. . दोघेही बसले , सिनेमा सुरूही झाला होता…. तो छान चित्रपटात मग्न झाला होता पण त्या अंधारातही तिची नजर काही त्याच्यावरून हटत नव्हती… थोड्यावेळाने त्याच्याही ते लक्षात आलं, त्याने तिला मिठीत घेतलं, अजूनही तिचा हात थरथरत होता …

ए वेडाबाई अशी काय घाबरतेस मी ठिक आहे , “look I am absolutely fine ” …..

ती मात्र तशीच शांत असते.

अच्छा! तु अशी नाही ऐकणार,  तुझी भिती मी आता घालवतो…असं म्हणत त्याने तिला आणखी जवळ घेतलं आणि आपल्या बोटांनी तीची हनुवटी पुढे घेत तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले…. पुढची दहा मिनिटे तरी दोघेही आपले भान हरपून बसले होते ..  आपसूकच सारा क्षण मोहरून गेला…

सिनेमा संपल्यानंतर दोघांनी मिळून शॉपिंग केली… तिने त्याच्यासाठी छानसा लेदर चा जॅकेट घेतला… रात्री बाहेर डिनर करून घरी परतले तेव्हा खूप दमले होते दोघेही,   चेन्ज करून दोघेही आरामात पडले, ती फोन ठेवायला टेबल लॅम्प जवळ वळली तसे तिच्या मानेवरचे केस बाजूला सरकले आणि त्याची नजर तिने तिच्या मानेवर काढलेल्या नावावर गेली, छान मेंदीने हर्ष आणि हार्ट च चित्र काढल होत… तिच्या गोर्‍या मानेवर मेहंदीचा रंग उठून दिसत होता….

मग! मला गिफ्ट काय देणार??? आपली हाताची बोटे तिच्या मानेवर फिरवत तो म्हणाला,

हर्ष नको ना रे . .गुदगुल्या होतात मला , तु ना ऐकणार नाही .., मीच लाडावून ढेवलय तुला. .. .काय हवय गिफ्ट तुला??? ?

हर्ष ने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला “तु अशीच माझ्यावर भरभरून प्रेम करत जा आणि नेहमी हसत रहा ”

पक्का प्रॉमिस… Love you lot… (शालिनी म्हणाली)

Love you too…शोना … . म्हणत हर्ष ने तिच्या माथ्यावर किस केल, आणि मग दोघेही गार झोपून गेले …. .

सकाळी हर्ष कॉलेजमध्ये गेल्यावर निलेश दारात गाडी घेऊन ठरल्याप्रमाणे हजर होता. सगळे जण तयारच होते, निलेश ने सामान गाडीत ठेवण्यासाठी मदत केली आणि सगळे फार्महाऊसवर रवाना झाले…

 

क्रमशः

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा