ती आणि तो (निरागस प्रेम)

Written by

ती आणि तो

भाग 5

 

दुपारी दोन च्या सुमारास गाडी फार्महाऊसवर येऊन पोहोचली. आलो बाबा एकदाचे, माधवी ताई म्हणाल्या.

निलेश : आई आबा तुम्ही पुढे व्हा मी सामान घेऊन आलो.

ऊर्मिला : वहिणी तु हो पुढे मी निलेश ला मदत करते सामान आणायला …

शालिनी : हो…. तुम्ही या आरामात..

(तिघांचीही आपसात नजर भेट होते आणि तिघेही हसतात)

मागोमाग शालिनीचे आई वडील हि येतात,

मम्मी , पप्पा तुम्ही इथे????

हो … तुला सरप्राइज म्हणून नाही सांगितलं, तशी अॉर्डर होती ऊर्मिला आणि प्रतीकरावांची….

ऊर्मिला : काय पप्पा….. “आॅर्डर वैगरे काही नाही ओ”

शालिनी : पण तुम्ही आलात ते बरं केलं, चला आधी आत चला.. . ऊर्मिला मम्मी पप्पांच सामान????

ऊर्मिला : ते पण आम्ही आणतो. ..तुम्ही जा आत. . .

शालिनी : (हळूच ऊर्मिलाच्या कानात) तेवढाच तुम्हाला एक्स्ट्रा वेळ काय????

ऊर्मिला लाजून थॅंक्स म्हणते …

(आबा शालिनीच्या आई वडिलांना)
या या प्रवासात काही त्रास नाही ना झाला ????

या रश्मीताई कशा आहात?? (माधवीताई म्हणाल्या)

(रश्मी आणि वसंतराव देशपांडे शालिनीचे आई बाबा)

आबा : अहो आधी जेवनाच काय ते बघा गप्पा तर होतच राहतील. .
तेवढ्यात हर्ष चे काही मित्र मैत्रिणी जे आधीपासून तयारी साठी हजर होते ते म्हणाले

सगळं तयार आहे तुम्ही जेऊन घ्या आणि आराम करा, इथे सगळी तयारी झालेली आहे ..

वसंतराव : वाह!!! तुम्हा मुलांच खरोखर खूप कौतुक वाटत…
आबा : हो ना, आयुष्यात असे मित्र असायला नशीब लागत. .

काका आमची तारीफ पूरे आता, तुम्ही जेउन घ्या आणि आराम करा. ..

सायंकाळ झाली आणि इथे रात्रीच्या सरप्राईज पार्टी ची तयारीही सुरू झाली, वसंतराव आणि आबा गरमागरम चहा आणि कांदे भजीचा आस्वाद घेत गप्पा रंगवत बसले होते.

माधवीताई : अरे!!! “प्रतीक आणि बाकीचे सगळे निघाले की नाही??? फोन केला का कोणी त्यांना?? ”

ऊर्मिला : आई ते आत्ताच निघाले मुंबईहून, पोहचतील रात्री वेळेत…

रात्रीच्या जेवणात छान श्रीखंड -पुरी, मसालेभात, कांदाभजी, कोशिंबीर, पापड, लोणचे असा बेत केला होता .

निलेश : आबा, मी प्रतीक ला फोन केला, त्यांना यायला उशिर होईल, ट्रॅफिक मध्ये अडकले आहेत.

मग आता काय करायचं??? चला पत्ते खेळूया… वसंतराव म्हणाले.

ऊर्मिला : वहिनी चल आपण वरती मजा करु, बघ तरी आम्ही काय तयारी केली आहे ती.

(निलेश आणि बाकीचे फ्रेंडस already वरती गाण्यांच्या भेंड्या खेळत असतात)

निलेश : (ऊर्मिलाला बघून) तुम आए तो हवावो मे एक नशा हे, तुम आए तो फिजावो मे रंग सा हे. . ये रंग सारे, हे बस तुम्हारे…और क्या??

ऊर्मिला : कभी कभी मेरे दिल में, खयाल आता हे, के जैसे तुझको बनाया गया हे मेरे लिये.

शालिनी : याद आ रही है, तेरी याद आ रही है, याद आनेसे तेरे जाने से, जान जा रही हे.

हर्ष : तुमने पुकारा और हम चले आए, जान हथेलीपर ले आए रे .. …

(शालिनीची कळी एकदम खुलते , दोघेही हातात हात घेऊन आपलीच गाण्यांची भेंडी खेळतात, फक्त मनातल्या भावना गाण्यात मांडतात )

शालिनी : हमे तुमसे प्यार कितना ये हम नहीं जाणते, मगर जी नही सकते तुम्हारे बिना…

हर्ष : तेरे चेहरे पे वो जादू हे, बिन डोल खिंचा जाता हूं, जाना होता हे और कही , तेरी और चला आता हूं।

शालिनी : हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए,
गुलों की शोखियाँ जो भँवरे आके लूट गए, बदल रही है आज
ज़िन्दगी की चाल ज़रा, इसी बहाने क्यूँ ना मैं भी दिल का हाल ज़रा, संवार लूं, संवार लूं

हर्ष : लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो,
शायद फिर इस जनम में मुलाक़ात हो न हो……
दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून जातात ….

(इतक्यात ऊर्मिला शालिनीला हळूच कोपर मारुन, ईशारा करते कुठे हरवलीस म्हणून)

शालिनी गालातल्या गालात हसते आणि उठून बाल्कनीत जाते… मागून कोणीतरी येत आणि तिचे डोळे मिटून, तिच्या कानावर फुंकर मारत. .

तो हर्ष आहे हे शालिनी बरोबर ओळखते. ..

शालिनी : ए काय रे! ! किती उशिर केलास???? कधीची वाट बघतेय मी!
हर्ष : (बाहेर पडणार्‍या पावसाचे थेंब तिच्यावर उडवून) चल आपण भिजूया. ..
शालिनी : आता????
हर्ष : हो आता… .अस म्हणत तो तिला पावसात भिजवतो. ..

(तीही त्याच्या सोबत मनसोक्त भिजण्याचा आनंद घेते. )

हर्ष : (आपले दोन्ही हात पसरवून ) लग जा गले कि फिर ये हसीं रात हो न हो,

ती पळत येऊन त्याला घट्ट मिठी मारते…
I love..you शालिनी. .. I love you शालिनी …. I love you ……( हर्ष जोर जोरात ओरडत असतो)

इतक्यात निलेश धावत येतो.. .”वहिनी चल ”

शालिनी : अरे हळू. काय झालं?? (मागे वळून ) हर्ष बघ ह्याला किती दम लागलाय. ..

निलेश : (शालिनी ज्या दिशेला बघत बोलते, तिथे आश्चर्याने बघत) तु आधी चल… (आणि निलेश जवळपास तीचा हात धरूनच तिला घेऊन येतो)

शालिनी जिन्यावरून उतरणार इतक्यात ती खाली हॉल मधला वातावरण बघून पूर्ती गोंधळली . खाली पोलिस उभे होते, वसंतराव त्यांच्याशी बोलत होते. मालतीताई हंबरडा फोडून रडत होत्या. आबा तर शॉक मध्येच बसले होते.

ऊर्मिला धावत जाऊन शालिनीला बिलगून म्हणाली, ” वहिनी ” (पुढे तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते आणि ढसाढसा रडायला लागली)
त्यांच्या आणखी एका मैत्रिणीने ऊर्मिलाला सावरले.

निलेश : हर्षच्या गाडीला अपघात झाला, त्यांची गाडी दरीत कोसळली

शालिनी स्तब्ध होऊन जाते तिला मगाचचा बाल्कनीतला क्षण आठवतो , आत्ताच तर आपण हर्ष सोबत होतो, आता तर मी त्याच्या मिठीत होते, तो पाऊस, त्याचा तो आवाज तिला ऐकू येतो ” I love you Shalini, I love you ” …. तिच्या डोळ्यासमोर अचानक अंधारी येते आणि शालिनी जिन्यावरून खाली पडते……

 

क्रमशः

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा