ती आणि तो (निरागस प्रेम)

Written by

ती आणि तो
भाग 1

कधीपासून बेल वाजवली कोणी दार का उघडत नाही. त्याने स्वतः कडील किल्ली ने दार उघडले. घरात सर्वत्र अंधार होता. खरंतर यावेळी ती नेहमी त्याची वाट बघत दारातच उभी असायची, चेहर्‍यावर एक गोड हास्य घेऊन. तिला अस बघून दिवसभराचा थकवा दूर पळून जायचा. नवीनच लग्न झाले होते त्यांचे एकच महिना झाला होता. हे असं काही न बोलता कुठे गेली असेल आणि घरात येवढा अंधार?? लाइट गेली असेल बहुतेक अस म्हणून त्याने तडक सोफ्यावर अंग टाकून आळस टाकला.
तेवढ्यात मंद दिव्यांची रोषणाई झाली. त्याने पाहील तर संपूर्ण हाँल छान सजवला होता. हार्ट शेप चे फुगे भिंतीवर लागले होते. इंद्रधनुष्य चे रंग असलेले कागदी फुलपाखरांची माळ छताच्या सीलिंग पासून खाली उतरल्या होत्या त्यांच्या टोकाला चंदेरी मोठे डूल लावले होते. त्या मंद प्रकाशात ते अजूनच चकाक होते. खाली फुलांनी एक अँरो काढला होता जो त्याच्या बेडरूमची वाट दाखवत होता. एव्हाना त्याचा थकवा कुठच्या कुठे पळाला होता. तो तडक बेडरूम मध्ये गेला. तिथेही अगदी तेच पण इथे जरा जास्तच खुलून दिसत होत. फरशीवर लालगुलाबाच्या पाकळ्यांनी I LOVE U असं लिहिलं होतं. सुगंधित मेणाच्या दिव्यांनी उजळून निघाला होता तो बेडरूम शिवाय गुलाबाच्या पाकळ्या त्याही होत्याच सर्वत्र. खूप सुंदर क्षण होता तो. आता तो तिला शोधत मागे वळला तर समोर ती तशीच गोड हसत उभी होती.. तिला एक क्षण तो बघतच बसला.. आहा… काय कमालीची सुंदर दिसत होती ती.. कमनीय देहयष्टी त्यावर गडद जांभळ्या रंगाची साडी गोल्डन रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज,दाट कर्ली आणि मधेच हायलाईट केलेले केस तिच्या डाव्या खांद्यावर मोकळे सोडलेले, तिच्या गोर्‍यापान शरीरावर खूपच सुंदर दिसत होते. लाइट मेकअप आणि नाजूक ओठांवर नॅचरल पिंक कलर ची लिपस्टिक, कानात अमेरिकन डायमंडचे ईअरिंगस्, जे मीच तिला आमच्या लग्नाचा पहिल्या रात्री दिले होते.. खुपच मोहक दिसत होती ती. ती तशीच जवळ येऊन मला बिलगली आणि म्हणाली…. शालिनी…. ए.. शालिनी…

क्रमशः

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा