ती कोण असते?

Written by

ती कोण असते??

ऑफिस सुटलं आणि शैलेश चा ग्रुप रस्त्याच्या कोपऱ्यावर असलेल्या चहा टपरीवर चहा घ्यायला थांबले.

एकाने आपला मोबाईल काढला, जोरजोराने हसू लागला…

“काय झालं रे तुला इतकं हसायला?”

“हा जोक ऎक..”

असं म्हणत दीपक ने नवरा बायको वरचा जोक ऐकवला, शैलेश सोडून सर्वजण हसायला लागले…मग एकेकाने पुन्हा नवरा बायकोचे नवनवीन जोक ऐकवायला सुरवात केली…सर्व जोक बायकोची खिल्ली उडवणारे होते. सर्वजण पोट धरून हसत होते…शैलेश मात्र तेवढा शांत होता…

सर्वांनी शैलेश ला चिडवायला सुरवात केली…

“काय रे? बायकोला घाबरतोस का? हसू नाही येत तुला??”

“नाही हसू येत, आणि बायको ही काही विनोदाची गोष्ट नाही….”

“मग कोणाची गोष्ट आहे समजावं बघू”…दात विचकावत दीपक ने प्रतिप्रश्न केला…

“कदाचित तुम्ही बायकोला ओळखलं नसेल, पण मी मात्र ओळ्खलंय….कोण समजता रे तुम्ही तिला?”

“अरे काय तू शैलेश, काय असते सांग बघू ती…आपण इथे मर मर मरायचं, आणि तीने तिथे आरामात झोपा काढायच्या..आपण पैसे कमावतो म्हणून तर चालतं ना सर्व…”

“नाही, चूक…मी सांगतो ती कोण असते ते…

जिच्या गर्भात भविष्याचं बीज असतं अशी मृत्यूच्या दारातून परत येणारी रणरागिणी असते ती….जिच्या संस्कारांनी उद्याचा नागरिक घडतो अशी शिक्षिका असते ती…

घरातली आजारपणं काढणारी बिनपगारी डॉक्टर आणि नर्स असते ती….

घरातला कोपरा अन कोपरा तिच्या चैतन्याने भरवणारी अभियंता असते ती…

पै पै जमवून संसाराचा गाडा हकणारी, काटकसर करून अडीअडचणीला हळूच आपली थैली बाहेर काढणारी फायनान्शिअल एडवाईजर असते ती…

संसाराचे स्वप्न आपल्या सारख्या विचित्र माणसांसोबत राहून रंगावणारी चित्रकार असते ती….

मुलांना चांगली वळणं लावून त्यांचा व्यक्तिमत्वाला आकार देणारी मूर्तिकार असते ती….

संसाराच्या व्यापातही देव धर्मासाठी वेळ काढणारी निस्वार्थ भक्त असते ती…

घराची मालकीण आणि मोलकरीणही तीच असते….

मुलांच्या भांडणात वकीलही तीच असते आणि चुका पोटात घालणारी आईही तीच असते….

आपण कितीही छळलं तरी आपल्या आयुष्यासाठी वडाला पूजणारी सावित्रीची तीच असते…

आयुष्याचा चांगल्या वाईट वळणावर साथ देणारी आपली सहचारिणी असते ती…

मित्रांनो, बायको आहे म्हणून आपण घर बिनधास्तपणे तिच्या भरवशावर सोडून बाहेर पडू शकतो…

मग अशा स्त्रीवर विनोद करणं मला तरी पटत नाही….”

मित्रांना विचार करायला भाग पाडून शैलेश तिथून निघून गेला….

(लेख कसा वाटला जरूर कळवा, आणि असेच लेख वाचण्यासाठी खलील फेसबुक पेज नक्की लाईक करा)

https://m.facebook.com/irablogs/

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत