ती कोण होती अंतिम भाग 15

Written by

अंतिम भाग
#ती कोण होती
#भाग15
अमोलला अचानक काहीतरी जोरजोरात आवाज येऊ लागला ..तो दचकून जागा झाला आणि धावतच हॉल मध्ये आला ..जे चालू होतं ते पाहून त्याला काय करावं हेच समजत नव्हतं …सोनलला कोणीतरी कधी इकडे तर कधी तिकडे खेचत आहे असं वाटत होतं …ती एका बाजूला बघून ओरडत होती आई मला वाचवा हो …आणि दुसरीकडे बघून जोरात ओरडत होती ..सोडा मला नका असा करू ..पाया पडते मी तुमच्या ..माझ्या बाळाला त्रास होईल हो ..काय हवंय तुम्हाला माझ्याकडून ? मी ते करते तुमच्यासाठी ..इतक्यात जोरात आवाज घुमला घरात : मला …हाहाहा …तुझं शरीर हवं आहे …आणि …आणीना हा …हा अमोल हवाय …
अमोलची बोबडीच वळली होती त्याला काही बोलताच येत नव्हतं ..एकतर आजपर्यंत त्याचा अस काही असत यावर विश्वासच नव्हता …
इतक्यात उर्मिलाचा आवाज : पोरी घाबरू नकोस हिम्मत ठेव ग ..मी तुला आणि अमोलला काहीही होऊ देणार नाही …
अमोल एखादा हॉरर मूवी बघावा असा खाली बसून सुन्न पणे बघत बसला होता …त्याला हे सगळं स्वप्नच वाटत होतं …तो स्वतःशीच बोलत होता …हे कालच अमावस्या प्रकरण मला भलतंच बधलेल दिसतंय ..काहीपण भास होतायत मला ..मी का बसलोय असा ?तो उठला आणि सोनलला आवाज देऊ लागला : सोनल आग ए सोनल ..तुम्ही लोकांनी ना काल ते अमावस्या आमावस्या करून ना माझ्या डोक्याचं कल्याण करून टाकलंय बघ ..मला असा भास होतोय तुला आपल्या घरात दोन भूत ओढतायेत आणि तू ओरडतीयेस..काहीही न …
सोनल : अरे अमोल हा भास नाहीये हे खरं आहे सगळं …तू देवाजवळ जाऊन बस आजिबात इथे येऊ नकोस …हिला तू हवा आहेस ..प्लिज नाही म्हणू नकोस ..माझ्यासाठी जारे हातात देव घेऊन बस
अमोलने स्वतःला एक चिमटा काढून बघितला आणि आता मात्र त्याची वाट लागली.. तो धावतच मंदिराकडे निघाला ..पण कोणतीतरी शक्ती त्याला पुढेच जाऊ देत नव्हती …तो हवेत उडू लागला ..आणि हवेतच जागेवरच पळू लागला …
अमोल : अरे ए कोण आहे हे ?..अरे खाली उतरवा मला .. मी जागेवर उभा राहतो पण सोडा आता मला ..काय कटकट आहे ही ..ए सोनल कोण आहे ग हे?…
सोनल : तुझी मोठी आई उर्मिला ..आणि ती
अमोल : ए ..काहीपण काय मोठी आईला जाऊन खूप वर्ष झालीत …ती कसली येतीये .. आणि हे काय ग ती ? म्हणे ती आलीये ..कोण ही ती?
उर्मिला : अमोल मी तुझी मोठी आई उर्मिला आहेरे ..बरोबर बोलतीये सोनल ..मी मरूनपण तुमच्या सगळ्यांसाठी जिवंत आहे …तू प्रयत्न कर आणि जा मंदिराजवळ बस एखादा देव पण जवळ घेऊन बस ..मग आम्ही दोघी तुझ्या जवळपण येऊ शकणार नाही …
अमोल : काय आहे हे सगळ?? खर आहे की खोट आहे हे ? मी आजूनपण झोपेत आहे की काय? असं कसं शक्य आहे ?
सोनल : अरे अमोल तू आता हवेत उडत आहेस तरी तुला विश्वास कसा नाही ..
दोघाना पकडायच्या नादात तिची सोनलवरची पकड सैल झाली ..सोनल एकदम उर्मीलाच्या हातात गेली ..आणि ती आता अमोलच्या जवळ गेली …पण तिला फक्त अमोल पुरे नव्हता …एक स्त्रीचे शरीर पण हवे होते …उर्मीलाने पटकन सोनलला मंदिरात पाठवले आणि काही झालं तरी देव हातातून खाली ठेवू नकोस असे सांगितले …बिचारी दमलेली , घाबरलेली सोनल पटकन मंदिराजवळ गेली …तिने तिथली देवीची मूर्ती हातात घेतली …आणि गायत्री मंत्र म्हणू लागली …पण तिच्या गायत्री मंत्रामुळे उर्मिलाला पण त्रास होऊ लागला …
उर्मिला : सोनल नको ग नको …मंत्र नको …नाहीतर मी काहीच करू शकणार नाही पोरी
सोनलने मंत्र म्हणायचे बंद केले ..किती वेळ नक्की गेला समजलं नाही पण आता दारावरची बेल वाजली ..आता दरवाजा कसा उघडायचा मोठा प्रश्न सोनलला पडला ..आणि आता आलंय तरी कोण ? इतक्यात तिला आठवलं नक्कीच आई आणि बाबा असणार . पण जर ते आत आले तर ती त्यांना पण त्रास देईल ..कदाचित ती आईंच्या शरीरात प्रवेश करेल ? ती आतूनच जोरात ओरडली तुम्ही परत जा ..जीवाला धोका आहे तुमच्या ..कोणीही दरवाजा उघडणार नाही ..जा तुम्ही
बाहेरून सुगंधा बोलली : पोरी काही होत नाही आम्हाला तू दार उघड ग ..
येतानाच रेणुकाने दोन मंतरलेल्या माळा बाळासाहेब आणि सुगंधाच्या गळ्यात घातल्या होत्या त्यामुळे त्यांना काहीच होणार नव्हतं ..तशाच आजून दोन माळा बाळासाहेबांना आणि सुगंधाला देऊन ठेवल्या होत्या..बाळासाहेबांनी बाहेरून दरवाजावर धडका मारायला सुरुवात केली …सुनबाई दरवाजा उघड ग …शेजारी पण बाहेर येऊन पाहू लागले ..सुगंधाने सांगितलं अहो घरची चावी लॉक झालीये म्हणून कुलूप तोडतोय ..
तिला खूप आनंद झाला होता ..आता तिला फक्त एक स्त्री शरीर हवं होतं ..आणि सुगंधा आत येतच होती …ती म्हणू लागली ..ये ग सुगंधा ये ..ये ग लवकर ये ..मग माझा आत्मा तुझ्यात ..आणि तुझा आत्मा?…तुझा आत्मा कैद… हाहाहाहा.. ये ग ये बाई लवकर ये ..
अमोलला तिने आजूनपन जमिनीवर सोडले नव्हते ..त्याला धरूनच ती हवेतच होती …अमोल : माफ कर मला सोनल ..तुझं ऐकलं नाही मी काल …मला हे असलं कधी खर वाटलंच नव्हतं ग ..माफ कर मला ..माहीत नाही आता माझं काय होणार आहे ..पण खरंच सांगतो …अगदी मनापासून… I Love You So much dear ..पुढच्या जन्मी पण मला तुझाच नवरा व्हायला आवडेल ग ..आता माझं काही खर नाही … आपण कोणीच वाचणार नाही बघ ..आई बाबा ..तू ..मी ..आपलं बाळ ..आणि तो जिवाच्या आकांताने रडू लागला .ए अग सोडणा मला ..तू एक स्त्रीच आहेस ना ? तुला थोडी पण दया माया नाही का ग ? एकदा मला सोनलला गळ्याशी धरू देनाग …सोड ना मला
ती : अरे मी तर बोलतीये तिला ये माझ्याजवळ.. मग तीच राहील बघ कायम तुझ्याजवळ ..मी काय करू ती येतच नाहीये बघ ना ..
अमोल : नाही आजिबात नको ..नको येउ ग सोनल इथे तू ..इकडे बाळासाहेब दरवाजावर लाथ मारतच होते . आणि एकदाच दरवाजा उघडला …
सुगंधा पळतच घरात गेली तिने सोनलला शोधलं तिच्या गळ्यात माळ घातली ..ती पण तिच्या मगोमाग निघाली ..पण रेणुकाने त्या क्षणाला तिच्या अंगावर कुंकू टाकले अमोल तिच्या हातातून निसटला आणि खाली पडला ..बाळासाहेबानी ताबडतोब माळ अमोलच्या गळ्यात घातली ..अमोलची सुटका झाल्यावर उर्मिला निश्चिंत झाली …उर्मिलाने तिला लालकारले : ये ग आता तू माझ्या समोर ये …आता तुला नाही सोडणार मी ..खूप वर्ष या दिवसाची वाट पहात होते मी …
तशी बरेच वर्ष बंद असल्यामुळे ..तिची शक्ती कमी झाली होती ..तिला शक्ती साठी काहीही हवन करता आले नव्हते ..त्याविरुद्ध उर्मिला आता खूप ताकदवर झाली होती …तिचे हवन , पूजा चालुच होते ..शिवाय तिच्यातल्या चांगुलपणाची ताकत पण तिच्या सोबत होतीच …
उर्मिलाने वेगवेगळे मंत्र जोरजोरात म्हणायला सुरुवात केली …ती तडफडू लागली …जोरात ओरडली : माझ्याकडूनच सगळं शिकलीस तू ..आणि आज मलाच त्रास देतेस ? नाही सोडणार तुम्हाला कोणालाच मी ?सगळ्याचा जीव घेणार …
रेणुका : तू कोण आहेस ? तुला अस काय दुःख आहे म्हणून तू अशी पुरुषांच्या मागे लागतेस …स्त्रीच्या शरीरावर कब्जा घेतेस बोल ? बोल ? काय झालं होतं तुझ्याबरोबर ज्याचा सूड तू सगळ्यांवर घेतेस …असपन यावर उपाय काढू ..तुला मुक्त करूया ..तुला पुढचा जन्म नक्कीच चांगला मिळेल पोरी …बोल कोण आहेस तू ?
ती आता रडू लागली …आई …आई …मला आजपर्यंत अस कोणीच विचारलं नाही …तुलाच माय माझी अडचण समजली …
खर आहे तुझ. मी सुडच घेत आहे या पुरुष जातीवर ..खूप वाईट आहे ही जात ..
रेणुका : अग सगळेच सारखे नसतात ग ..तुझ्या सुडापाई तू चांगल्या माणसांना त्रास दिलास ग ..माझा बाळा, ती उर्मिला काय गुन्हा होता ग त्यांचा ? तुझ्या सुडात ते जीव होरपळून निघाले ना ग ?
तुझी ओळख दे पोरी ..कोण तू ? तुझं नाव काय ?
ती : माझं नाव ? मी अलका …बल्लाळपुरची …एका ब्राह्मणाची मुलगी …
माझे वडील आमच्या ग्राममंदिरात पुजारी होते …माझी आई आशा खूप सुंदर होती …तसाच तिचा आवाज होता …
आमची परिस्थिती खूपच बेताची होती ..माझे वडील सगळ्यांना मदत करण्यातच सगळे पैसे घालवायचे …आई आणि वडिलांचं रोज भांडण होत असे ..घरी कित्येकदा जेवायला पण नसायचं ..असच उपाशी झोपावं लागायचं …मी हळू हळू मोठी होत होते ..आमच्या गावचा सरपंच विक्रांत खूप वाईट माणूस …तसेच त्याचे भाऊ …तशीच त्याची माणस …त्याने एकदा माझ्या आईला पाहिलं आणि वडिलांना बोलला ..कायमची मला देऊन टाक बायको तुझी …तिची मी सोन्यानी तुला करतो आणि सगळ सोन तुला देतो…माझे वडील खूप चिडले : चांडाळा लाज नाही वाटत तुला अस परस्त्री बद्दल बोलताना .?कुठे फेडशील ही पाप ? मला तुझ्या घरी येऊन तुझ्या घरच्यांना हे सांगावच लागेल …इतक्यात कोणीतरी मागून त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड घातली ..माझे वडील जागेवरच गेले …त्यांचं मृत शरीर घेऊन विक्रांत आणि त्याची माणस आमच्या घरी आली …
तो आईच्या जवळ गेला …तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलला ..काळजी नको ग करुस राणी ..मी आहे ना तुझ्यासाठी.. मी आतल्या खोलीत होते ..तिथूनच त्याला बघत होते …माझी आई वडिलांचं मृत शरीर पाहून जोर जोरात रडू लगली ..शेजारीपाजारी जमा झाले …त्यांनी वडिलांचे अंतीमसंस्कार केले ..विक्रांत पण त्यात पुढे होताच तेव्हा मी 11 वर्षाची होते . मला विक्रांतचा खूप राग येत होता …वडील गेल्यानंतर आम्हाला आमचं रहात घर सोडावं लागलं ..ते घर फक्त मंदिराच्या पुजाऱ्यासाठी होत …आम्ही दोघी रस्त्यावर आलो …सगळे पुरुष आम्हा दोघींना अधाशी नजरेने बघत होते …पुरुषांना फक्त ती स्त्री आहे इतकंच पुरेस असत मग तीच वय , जात , काहीही चालत त्यांना अगदी अपंग स्त्री पण चालते …आम्ही दोघीपण त्यात खूप सुंदर …गावातल्या बायका आमच्यासाठी पुढे आल्या पण त्यांच्या नवऱ्याने , वडिलांनी आमची मदत करू दिली नाही …कशाला नसता भार ग घरात नकोच …आम्ही दोघी रस्त्यावरच राहू लागलो …मी वडिलांची सामानाची छोटीसी पोटली काढली मला त्या सामानात इच्छापूर्तीसाठी अघोरी पूजा असे पुस्तक सापडले …मी उत्सुकतेपोटी ते वाचायला सुरुवात केली ..त्यादिवशी आई झोपली होती मी रात्री जंगलात गेले सगळं सामान गोळा केल..एक जीवंत कोंबडी लागत होती मला.. ती मी एकाच्या अंगणातून चोरली …त्यात दिल्याप्रमाणे सर्व पूजा केली ..मला खूप छान वाटू लागलं जणूकाही माझ्यामध्ये काही शक्तीचा शिरकाव होत आहे ..पूजा करून येऊन गुपचूप आईच्या बाजूला येऊन झोपून घेतलं ..नंतर माझा तो नित्यक्रम झाला ..जवळ जवळ 15 दिवस मी रोज पूजा करत होते..माझा दोन कोंबड्यांचा बाळी देऊन झाला होता ..अजून 9 वेळा दर 8 दिवसांनी अशी पूजा मला करायची होती ..त्यामुळे मी अमर होणार होते आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती मला मिळणार होती …
इतके दिवस सरपंच आमच्या जवळ आले नव्हते ..मग समजलं ते काही महत्वाच्या कामासाठी परगावी गेले होते …
त्यादिवशी माझी पूजा लवकर झाली …समोरच दृश्य पाहून मी चक्रावले …माझी आई पूर्ण झोपेत होती आणि सावकाराचा पोरगा तिच्यासोबत दुष्कर्म करत होता …आई अजिबात हलत नव्हती …हा काय प्रकार …मी धावत जाऊन त्याला मागे खेचलं त्याच्या सनासन कानशिलात लगवल्या …अवघा 16-17 वर्षाचा होता तो …पण पैश्याचा माज दुसरं काय ..
मी विचारलं : ए काय लाज वाटते की नाही तुला अस करताना ? अरे तुला तर ना मी हात उगारला तर तो घाबरला
सा. पोरगा : मी रोज माझ्या आजोबांना बघतो इथे येऊन ते असच करतात …ही गोळी त्यांच्या तोंडात घालतात …आणि हे असं करतात …आज त्यांना बर नव्हतं वाटत मी ही गोळी त्यांच्या खिशातून घेतली आणि स्वतः आलो म्हटलं बघावं करून
मी फक्त 11 वर्षाची असून इतकी समजूतदार आणि हा ? …खूप राग आला होता मला ..त्या कसल्या गोळ्या होत्या ते काही समजलं नाही …पण त्यामुळे माझी आई क्षणात बेशुद्ध होत असे आणि हे लांडगे अस कुकर्म करत होते …त्याला उद्या रंगे हात पकडायचा आणि गावातल्याना पण बोलवायचं अस मी ठरवलं .मग त्यांना शिक्षा पण द्यायची ..पण तो म्हातारा काय किंवा इतर कोणी काय आलंच नाही …पण त्यांच्या नादात माझा आठवडा वाया गेला मी पूजा नाही करू शकले …आणि कोंबड पण राहील …
दुसऱ्या दिवशी सरपंच आला ..आम्हाला अस रस्त्यावर बघून रडू लागला ..त्याला खूप वाईट वाटलं म्हणे …माझ्या आईला त्याने मिठीत घेतल : अग तू अशी रस्त्यावर राहण्यासाठी नाहीस ग तुला मी आमच्या वाड्यात एक खोली देतो …चल तू …माझ्या आईला वाटलं खरच काळजीपोटी घेऊन चालला आहे …आणि त्याच प्रेम आहे तिच्यावर …पण नाही हो राक्षस होता तो …रात्री त्याच्या 3 मित्रांसोबत आला तो आईकडे तीच गोळी आईला दिली …त्यांनी रात्रभर माझ्या आईला ….ती (अलका) सांगता सांगता रडू लागली खूप रडली …
रेणुका : खूप वाईट झालं ग पोरी हे ..पण मग तू कशी काय ?म्हणजे तुला कोणी मारलं की ?
ती : माझ्या आईच्या अंगाचे अक्षरशः लचके काढले होते या लोकांनी …ती पूर्ण रक्तबंबाळ झाली होती …तेव्हा ती शुद्धीत नव्हती ..पण जेव्हा तिला शुद्ध आली तीला त्या वेदना सहन होत नव्हत्या …ती जोरजोरात ओरडू लागली …आवाज ऐकून सावकार आला …त्याने तिला लाथा घातल्या आणि ती गोळी परत तिच्या तोंडात घालून गेला …बिचारी परत बेशुद्ध झाली
त्याचा हा खेळ जवळ जवळ महिनाभर चालू होता …तो आईला अजून काहीतरी औषध देत होता ..ती काही खात नव्हती म्हणून सलाईन लावत होता …तिला त्याने जीवंत ठेवण्याची पुरेपूर काळजी घेतली होती …आणि मी लहान असल्यामुळे काहीच करू शकत नव्हते..या नादात ते मला विसुरून गेले होते …पण मी माझी पूजा पुन्हा चालू केली होती …एक महिन्याने माझी आई देवाघरी गेली …सावकाराने परस्पर कोणाला न कळू देता तिचा अंतीमसंस्कार केला …
मी खूप रडत होते मला काहीच सुचत नव्हत …मी दुसऱ्या गावी गेले ..तिथे लोकांची धुणं भांडी करू लागले …तिथे एक पडक घर होत त्यात राहू लागले …जे लोक द्यायचे ते घालायचे ..जे देतील ते खायचे ..माझे 11 कोंबडीचे बळी पूर्ण झाले आणि आज माझी परीक्षा होती …मी एका आत्म्याला माझ्या कबज्यात करायचा प्रयत्न केला आणि तो अगदी सहजपणे झाला …मी त्याच्याकडून बरीच काम करून घेऊ लागले …पण माझा चेहरा आता खुप करारी आणि भयानक दिसु लागला होता …मी फक्त 11 वर्षाची होते पण 18 -19 ची वाटू लागले होते …मी आता आजून 2 भूत काबीज केली.. ती पण मला मदत करु लागली …गावातली लोक त्यांच्या कामांसाठी माझ्याकडे येऊ लागले .. मी फक्त बायकांनाच मदत करायचे पुरुष आला तर त्यालाच इजा करून पाठवायचे …मी त्या सावकाराच्या बापाला , आणि त्या सगळ्या मित्रांना माझ्या भुतांकडून मारून टाकले होते …प्रत्येकाला खूप वाईट मरण दिले ..एक दिवस आईचा आत्मा आला माझ्याकडे …खूप वाईट हालत होती तिची …तिने मला सांगितलं या पुरुष जातीला धडा शिकवायलाच पाहिजे ..मला खूप वाईट मरण दिलंय यांनी …पैश्याचा ज्यांना माज आहे त्यांना सोडायच नाही …जस मला मारलं तसच मार सगळयांना ..आधी त्या सावकाराला …मी माझ्या भुतांकडून त्याला माझ्या जागी आणलं …त्याचे लचके तोडले …काठीने मारलं ..अंगावर जळू सोडले …त्याच्या अत्म्यावर पूर्णपणे कब्जा केला …मरण पण तसच दिल त्याला असाच रक्तबंबाळ केला .. तो तरी आईला ती गोळी देत होता त्यामुळे तिला त्रास समजत नव्हता ..मी ते पण नाही केलं …गावात मला सगळे चेटकीण , हडळ म्हणू लागले …एक दिवस त्यांनी मला दगडी मारून बेजार केले ..तिथल्या एका गुरवाने देवीच्या तलवारीने माझ्यावर वार केले …माझ्या शक्तींनी माझ्या शरीराची साथ नाही दिली ..पण माझ्या आत्म्याला बळ दिल …आणि मग माझी हीच मोहीम चालू झाली …मी दणकट आणि खूप श्रीमंत पुरुष शोधायचे…एखाद्या स्त्रीच्या शरीराचा आधार घेऊन मी बदला घ्यायचे …जे माझ्या आईसोबत झालं होतं तेच सगळं करत होते …जितका तगडा माणूस तितका जास्त त्रास द्यायचे मी …त्याच्या रक्ताने मी खुश व्हायचे …जेव्हा सावकार मेला तेव्हा माझ्या आईच्या आत्म्याला मुक्ती मिळाली …पण मला पूर्ण पुरुष जातीचाच नायनाट करायचा होता ..मी आजपर्यंत कोणाही स्त्रीला मारले नाही …आज अमोलला पाहून माझं मन थोडं हळवं झालं होतं हे खरं …उर्मिलाला वाटलं तिने मला कंट्रोल केलं …आग इतकी ताकत नाही तुझ्यात ..पण या दोघांच् एकमेकावरच प्रेम पाहून मी खूप खुश झाले होते ..मला खरच अमोलला किंवा सोनलला त्रास नाहीच द्यावासा वाटला …मी मुद्दाम भांडण होण्यासाठी त्या दिवशी सोनलच्या आवाजात अमोलला आवाज दिले …तो चिडून आला …सोनलला रडवल पण पुन्हा तितक्याच प्रेमाने माफी मागून जवळ घेतलं …हा नक्कीच त्या सावकारासारखा नव्हता ..म्हणूनच मी त्यालाही इजा केली नाही …
रेणुका : खूप वाईट झालं तुझ्या बरोबर …सगळेच वाईट नसतात ग …आजून किती वर्षे अशी भटकणार आहेस तू …जा पोरी जा आता मुक्त हो …रेणुकाने काही मंत्र म्हणत अंगारा , कुंकू तिच्यावर टाकायला सुरुवात केली .. अलका पण तिथून हलली नाही …इतक्या प्रेमळ पणे बोलणाऱ्या त्या रेणूकेच तिने ऐकलं …आज मुक्त झाली होती ती …जाताना तिने उर्मिलाची आणि सगळयांची माफी मागितली …
उर्मिलाला पण रेणुकाने मुक्त केले …
अलका : जाता जाता बोलली …आम्ही निघालो आहोत आत्ता ….पण अमच्यापासून तुमची सुटका नाही …काय ग सोनल …भेटू लवकरच
सगळे विचारात पडले आता कशाला येणार परत या सुटका झाल्यावर …दोन महिन्यात सोनलची डिलीव्हरी झाली तिने दोन गोंडस बाळांना जन्म दिला दोन्ही मुलीच होत्या …एक अगदी उर्मिला आणि दुसरी सुंदर होती …अलकाला कोणी पहिलच नव्हतं …,पण ती नक्कीच अलका होती …

तळटीप: शेवटी काय तर नेहमी वाईटावर चांगुलपणा मात करतो ..काही वाईट घटनांमुळे अलकाला वाईट बनवलं …पण अमोल आणि सोनलच प्रेम पाहून ती पाघळली…रेणुकाच्या प्रेमळ बोलण्याने ती पण माणसांमध्ये आली ..तिला पण माणुसकी समजली …

©पूनम पिंगळे

Article Categories:
भयपट

Comments are closed.