ती कोण होती भाग 14

Written by

#ती कोण होती
भाग14
अमोल ऑफीस ला गेला ..आता सोनल एकटीच होती घरात ..तिला अचानक मघाशी घडलेला प्रसंग आठवला ..हे काय होतंय आल्यापासून आम्ही ? तिने सुगंधाला फोन केला
सोनल : आई मला खूप भीती वाटतीये हो
सुगंधा : का ग ? काय झालं ? नीट पोहोचले ना तुम्ही? काल शनी अमावास्या होती सांगितलं होतं जाऊ नका ..तू ठीक आहेस ना ग?सगळं नीट आहे ना?
सोनल : नाही काहीच नीट नाहीये ..सकाळी मी उठल्यापासून बघतीये खूप विचित्र घटना घडतायेत ..
सुगंधा : म्हणजे ग? काय होतंय नक्की ?
सोनलने सकाळपासून घडलेल्या सर्व घटना सांगितल्या …सुगंधाने कपाळावर हात मारला …जोरजोरात बाळासाहेबांना आवाज दिला : अहो बाळासाहेब बघा जे नको ते घडलंच
बाळासाहेब : काय झालं ?
सुगंधा: बोला सोनलशी ..पोर पुरती घाबरलीये हो …बाळासाहेब सोनलसोबत बोलत असतानाच सुगंधा बेडरूममध्ये….गेली तिने उर्मिलाला आवाज द्यायला सुरुवात केली ..पण उर्मिला काही यायलाच तयार नाही ..आता हे काय ताई कुठे गेल्या …की ताईच गेल्यात त्यांच्या बरोबर ? आत्तापर्यंत जे घडलेलं सांगितलं… त्यात या दोघांना कासल्याहीप्रकारे इजा झाली नाहींये..हम्म नक्कीच उर्मिला ताई गेल्यात सोबत
सुगंधा बाळासाहेबांच्या जवळ आली तोपर्यंत त्यांनी फोन ठेवला होता …खूप टेन्शन मध्ये दिसत होते ते ..
सुगंधा : अहो मला वाटतंय उर्मिला ताई गेल्यात सोनलसोबत काही त्रास होऊ नये म्हणून ..रात्री आपण सगळे झोपलो तेव्हा अमोल गेलांय ना सोनलला घेऊन ..मग काळजीपोटी या गेल्यात बरोबर नक्किच
बाळासाहेब : नाही ग ती अशी न सांगता नाही जाणार
सुगंधा : अहो तिला वेळ नसेल मिळाला तुम्हाला सांगायला
बाळासाहेब पण उर्मिलाला आवाज देऊ लागले पण उर्मिला समोर आली नाही ..आता या दोघांची खात्री पक्की झाली ..ती सगळी मदत करणारी नक्कीच उर्मिला ..बाळासाहेबांनी लगेचच पुण्याला जायचे ठरवले ..सुगंधाला बॅग भरायला लावली..कोणालातरी फोन केला आणि गाडीत जाऊन सुगंधाची वाट पाहू लागले..
सुगंधा बॅगा घेऊन आली ..बडबड करतच गाडीत बसली ..अस कुठे असत होय?..लगेच गाडीत येऊन बसले तुम्ही …बॅगेत काय घ्यायचं बघायला नको ..
बाळासाहेबांचं सुगंधाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं ते फक्त गाडी चालवत होते …त्यांनी गाडी एका वाड्यासमोर थांबवली …एक खूप म्हातारी पण तेजस्वी बाई त्यांच्या गाडीत येऊन बसली …हो रेणूकाच होती ती …बाळासाहेबांनी तिलाच फोन केला होता …आता सगळे थेट पुण्याला जाणार होते ..सुगंधाने बाळासाहेबाना न राहवून विचारले : या आजी कोण हो? आपण यांना का घेऊन जात आहे सोबत ?
बाळासाहेब : ही माझी आजी रेणुका आहे ..जर उर्मिला अमोलबरोबर गेली आहे तर नक्कीच ती परत आली असणार …माझी उर्मिला मला न सांगता अशी कधीच जाणार नाही …जर तिच्यासमोर उर्मिला कुठे कमी पडली तर आजीची खूप मदत होईल …मागच्यावेळी पण तिला अजीनेच बंदी केलं होतं …पण यावेळी तिला बंदी नाही तिचा निकालच लावायचाय… काय ग आजी बरोबर ना ?
रेणुका : हो रे बाळा …मी खूप तप साधना केली आहे यासाठी …आज नाही सोडणार तिला ..शिवाय यावेळी आपल्यासोबत उर्मिलाही आहेच …बघूया कस काय होतय ते …आपण आपले पूर्ण प्रयत्न करूया
सुगंधा ने गाडीतच रेणूकाला हात जोडले …तिच्या डोळयातून पाणी वाहू लागले …आजी माझ्या पोराला आणि सुनेला वाचवा …पोर खूप घाबरली होती हो …
रेणुका : पोरी घाबरू नको शेवटी देवाची इच्छा …मी काहिजरी केलं तरी मातेच्या मर्जीशिवाय काही होऊ शकत नाही बघ …जगदंब जगदंब …आई सगळं ठीक करेल .आता तीच मार्गदर्शन करेल आपल्याला …बाळासाहेब गाडी चालवत होते आणि या दोघींचा संवाद चालूच होता …सकाळी 12 च्या सुमाराला ते निघाले होते …
इकडे सोनल खूपच घाबरलेली होती …तिला माहीत होतं आपण फोन केला की आईबाबा येणारच …ती त्यांची वाट पहात होती …माहीत होतं त्यांना पोहोचायला कमीतकमी 5 तास तर लागणारच ….सोनलला घरात एकटीला खूपच भीती वाटत होती …इतक्यात किचनमध्ये काहीतरी जोरात आवाज आला ..सोनल घाबरली …तीने हळूच आत वाकून पाहिलं ..एका मांजराने दुधाचं भांड खाली पाडलं होत …ते पाहुनपन सोनलला आत जाऊन ते अवरायची हिम्मत होत नव्हती…,ती अशीच आत बघत राहिली …आता खरच ती वेडी होईल की काय तिला अस वाटू लागलं होतं …
अहो सांडलेले दूध मॉब पुसत होता …,सोनल खरच खूपच घाबरली …ती पुन्हा स्वतःच्या खोलीत गेली .. तिला हे सगळं असह्य झालं होतं …,तिने ठरवलं हे नक्की कोण आहे आपण शोधायचंच …
सोनल : जोरात ओरडून – कोण आहे रे इथे ? आमच्या घरी का आला आहेस ? काय विचार काय आहे तुझा ?
तिला जोर जोरात हसायचा आवाज ऐकू येऊ लागला …ती पळतच हॉल मध्ये गेली आणि टी. व्ही लावून बसली …
पण त्यावर पण सगळे हॉरर मुव्ही आणि सिरिअल्स लागले होते …सोनल : बाई ग आता मात्र हद्द झाली ..का असे सगळेच माझ्या मागे लागलेत काही समजेना बाई ….तिने टी व्ही बंद केला आणि बेडरूम मध्ये आराम करण्यासाठी गेली ..तिला अस वाटत होतं कोणीतरी आपल्याला पाहतय …घरात खुप थंडी वाजत होती..सोनलला वाटलं आपल्याला ताप आला आहे तिने टेम्प्ररेचर पाहण्यासाठी थर्मामिटर घेतला आणि ताप चेक केला तर नॉर्मलं …ती विचार करत होती मग ही थंडी कसली ?
तिला बेडरूम मध्ये सारख कोणाचीतरी सावली आहे असं वाटत होतं ..तिने परत विचारलं कोण आहे समोर या ..काय हवंय तुम्हाला ? पुन्हा जोरात हसण्याचा आवाज
सोनल आता खूपच चिडली होती ..हे बघा मला चिडायला लावू नका …तुम्ही जे कोणी आहात समोर या ..आणि समोर नसेल यायचं तर चालते व्हा आमच्या घरातून ….पुढच्या क्षणात ती सावली तिच्यासमोर उभी होती …सोनलला भरपूर घाम फुटला होता ..अशी सावली येईल समोर याची तिला कल्पना पण नव्हती …अचानकपणे त्या सावलीला पाहून ती गप झाली..तिने हनुमान चाळीसा म्हणायला सुरुवात केली …तिची भीती कमी झाली…तिने डोळे बंद करून घेतले होते …पण घडणाऱ्या घटना घडतच होत्या …
ती सावली पुन्हा हसू लागली आणि सोनलला म्हणाली : गुणांची आहेस बघ पोरी तू …मला घाबरू नकोस …मी तुझ्या मदतीसाठीच आलीये ..बाळ तुझं काही खर नाही …ती पण आलीये तुमच्या पाठोपाठ ..
सोनल : खूप हिम्मत करून अडखळत – प..पन तुम्ही कोण ? मलां मदत का करताय? सकाळी मला गाडीतून उचलून लिफ्टमध्ये आणणाऱ्या , भाजी चपाती बनवणाऱ्या तुम्हीच का?पण का केलंत तुम्ही अस
उर्मिला : पोरी मी तुझी सावत्र सासू आहे ..बाळासाहेबांची पत्नी …माझ्यानंतर त्यानी तूझ्या सासुशी लग्न केलं..मी त्यांची पहिली पत्नी …आणि तू माझी सून आहेस …हो सकाळी मीच तुला गाडीतुन उचलून लिफ्टजवळ नेऊन ठेवलं ..तू अमोलला उचलून घे बोलत होतीस बिचारा रात्रभर गाडी चालवून दमला होता ..आणि तू तुझा हट्ट सोडायला तयार नव्हतीस ..”मग काय करणार मीच उचलून नेलं तुला लिफ्टपर्यंत …मला तुला एकटीला सोडायच नव्हतं …तू गरोदर आहेस ..इतकं चिडण , हट्ट करणं ..तुझ्यासाठी चांगलं नाही पोरी …तू रात्रभर प्रवासात जरी झोपली होतीस तरी आखडून झोपली होतीस …इतकं दमून भागून तू स्वयंपाक करणार होतीस ..तुला तो त्रास नको म्हणून मी बनवली भाजी चपाती
सोनल : सगळे बोलतात तुम्ही खूप सुंदर होतात …मला आज समजलं तुम्ही फक्त रूपाने नाही मनाने पण सुंदर आहात ..पण तुम्ही का आलात आमच्या इथे ?मला मदत करायला का?
उर्मिला मनापासून हसली : …हो ग पोरी …अमोल इतक्या रात्री निघाला तुला घेऊन ..मला खूप काळजी वाटत होती तुमची …मुळात तुम्ही तिथुन गेल्यावर खूप वेळानंतर समजलं मला …तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत नाहीत पोरी …आणि अमोलचा तर विश्वासच नाही या गोष्टींवर …तुझा आहे की नाही माहीत नाही ..पण मला असं समोर पाहून नक्कीच विश्वास बसला असेल तुझा…जीवाला धोका आहे ग तुमच्या ..आणि त्यातून तुम्हाला वाचवण्यासाठी मी आले ..इतके वर्ष त्यासाठीच तर अशी भूत योनीमध्ये आहे मी ..जोपर्यंत तिचा अंत होत नाही मलापण मुक्ती नाही मिळणार ..सोनल : कसल्या गोष्टी ? काय धोका ? आणि तुम्ही जीवंत कश्या ?
उर्मिला : नाही ग ..मी जीवंत नाहीये ..पण मी गेली कित्येक वर्षे तपसाधना केली आहे ।…आणि आज त्यामुळेच मी तिचा सामना करू शकणार आहे
सोनल : तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाहीये ..,फक्त एकच समजलं सकाळपासून तुम्ही मझी खूप मदत केली ..आता ही ती कोण याची उत्सुकता आहे …
उर्मिला : समजेल लवकरच तुला ..आत्ता ती पण आहे या घरात पण ती काहीही हालचाल करू शकत नाही …मी तिला काल रात्रीपासून थोपवून ठेवलंय …ती खूप प्रयत्न करत होती ..तुम्हा दोघांपैकी एकाच्या शरीरावर कब्जा घेण्याचा..पण मी माझ्या शक्तींनी तिला अडवून ठेवलं आहे ..आता मी तिला नाही सोडणार …तू मघाशी गावी फोन करून खूप छान केलंस ते लवकरच येतील
सोनल : हो मी खूप घाबरले होते त्यामुळे केला होता फोन ..माझ्या हे लक्षातच आलं नाही मला घाबरलेल पाहिलं की सगळे लगेच येणार …तुम्ही बोलताय ती आली आहे इथे ..कुठे आहे हो …
उर्मिला : येईल ना लवकरच
इतक्यात दरवाजे खिडक्या एकमेकांवर आपटू लागले …खूप भयानक हास्य ऐकू लागले : तुला मला भेटयचं का ग ? या उर्मिलाला सांग …बघ कस अडवून ठेवलंय हिने ..हिला सांग मला थोडं मोकळं करायला …
उर्मिला : सोनल तू लक्ष देऊ नकोस या बाईकडे …चल जेऊन घे …आणि आराम कर जोपर्यंत मी आहे ..तोपर्यंत तुला कसलाही त्रास होऊ देणार नाही मी …
अमोलची मीटिंग खूपच छान झाली …सगळेजण त्याच्यावर खुश होते …4 वाजता तो घरी आला …आणि झोपला… घरात काय चालू आहे याचा त्याला तपासपण नव्हता …
आता पुढे कस हरवणार तिला ??काय होणार बर??

@पूनम पिंगळे

Article Categories:
भयपट

Comments are closed.