ती दळभद्री नाहींच मुळी (मुग्धा ) भाग4

Written by

लग्नाला होकार  द्यायचा की नाही हे घरच्यांनी परस्पर मुग्धा वर सोपवलं होत … इतके दिवस कामामुळे ओरडणारा तो खडूस बॉस आज चक्क मुग्धा ला मागणी घालायला आला होता … ही गोष्ट कितीही खरी असली तरी पचवणं अवघड होतं ….        त्या रात्रभर मुग्धा ला झोप लागली नाही… राघव म्हणजे मुग्धा चा बॉस .. त्यांच्या मनात माझ्याविषयी हे ,अगदी लग्नापर्यंत , कस काय त्यांनि कधी जाणवू पण दिलं नाही .. ती तर आपलं काम एके काम ह्या विचाराची … कदाचित हेच गुण आवडले असतील त्यांना माझे … पण मी असं तडकाफडकी निर्णय नाही घेऊ शकत … आदी मला नक्की त्यांच्या मनात काय आहे माझ्याविषयी हे जाणलं पाहिजे ..
झालं दुसरा दिवस उजाडला , मुग्धा नेहमी प्रमाणे तयार होऊन ऑफिस ला जायला निघाली … पण आजच ऑफिस ला जाणं थोड्या प्रमाणात वेगळं होतं … पटापट आपला नाश्ता उरकून ती जायला निघाली , आईने हाक मारून आठवण करून दिली , डबा घेऊन जा नाहीतर विसरून जाशील .. रोजच्याप्रमाणे …
ती ऑफिस मध्ये पोहचली , सगळेजण तिचीच वाट बघत होते ,तिला समजलं नाही हे अचानक सगळे माझी वाट का बघतायतं… ती पोहचताच सगळेजण टाळ्यांच्या कडकडात तिचं स्वागत करतात … काही जळणारे मागेचं उभे होते पण काही तिचे मित्र मैत्रिणी तिला येऊन बुके देऊ लागले , तिचं अभिनंदन करू लागले ..

तिच्या चेहऱ्यावर मात्र एवढं मोठं प्रश्नचिन्ह ..  मी तर लग्नाला होकार दिला नाही मग हे बॉस मला न विचारता परस्पर असं कसं करू शकतात … ती मैत्रिणीला जवळ बोलावते नि तिला विचारणार हे काय चाललंय .. तेवढ्यात राघव मुग्धाचा बॉस समोर येतो .. नि अनौसमेंट करतो … की मिस मुग्धा , आपल्या कंपनी च्या कामात जो बहुमोलाचा सहभाग आहे त्यामुळे मागची काही टेंडर्स आपण अगदी बिनरोध पास झालो आहोत … आणि तुमची कामातील ही  प्रगती बघता आम्ही तुम्हाला प्रमोशन द्यायचं ठरवलं आहे … आजपासून तुमची स्वतंत्र केबीन ..

सगळेजण टाळया वाजवतात ,खरं तर सगळ्यांना माहीत असतं मुग्धा आपल्या कामाच्या बाबतीत किती प्रामाणिक आहे त्यामुळे एक दोन वगळता कोणाला तिच्या प्रमोशन मिळण्याचा काही प्रॉब्लेम नव्हता … पण मुग्धा मात्र हे सगळं बघून जाम चिडते .. तिला असं वाटतं की बॉस हे सगळं मुद्दामून करतायत ..
सगळे कर्मचारी आपापल्या जागी पांगल्या वर ही बिना परमिशन घेताचं डायरेक्ट बॉस च्या केबिन मध्ये जाते नि त्यांना झालेल्या सगळ्या प्रकाराबद्दल सूनवु लागते .. तरी ते म्हणत असतात अगं थांब , ऐकून तर घे …  पण ही काही ऐकायला तयार नसते …
तेवढ्यात मुग्धाचा फोन वाजतो , आईचा असतो .. ती तिथेच उभं राहून उचलते …आई सांगते …अगं ,मुग्धा ….. काल तर तुला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायलाच विसरलो आम्ही सगळे … तुझे बॉस घरी येण्याचं खरं कारण आम्ही तुला सांगितलंच नाही .. ते तर तुझ्या प्रमोशन ची बातमी घेऊन आले होते घरी … पण  त्यांच्या तुला मागणी घालण्याच्या गोष्टीमुळे ,हे प्रमोशन चं आम्ही संगायचं राहून गेलो … तू आता त्या बॉस ना काही वेड वाकडं बोलू नको … रात्री बोलू आल्यावर असं म्हणत मुग्धाने फोन ठेवला ..

हे सगळं कळल्यावर तिने शरमेने मान खाली घातली .. की एवढे मोठे बॉस त्यांना आपण नको नको ते बोललो सुनावलं …
आणि तिने हळूच आवाजात im sorry … राघव …i mean boss .. असं म्हणत जीभ चावली …
आता जर समोरून  होकार आला तर मुग्धा राघव ची होणारी बायकोचं होती … त्यामुळे तो आता तिला ओरडू शकतं नव्हता .. तिला त्याने खाली बसायला सांगितलं नि आदी तू शांत हो म्हणला … मग आपण या विषयावर बोलू …
त्या दोघांत काय बोलणं झालं यासाठी ,, to be continued …

धन्यवाद

 

©वैशू पाटिल

Article Categories:
नारीवादी

Comments are closed.