ती मला उमगली #कथालेखन

Written by

सुजय आणि मानसीचे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर पाहुणे मंडळी गेली आणि नव्याची नवलाई संपली. त्यांच्या घरी भरपूर श्रीमंती होती. सुजय हा स्वतःचा व्यवसाय करत होता लग्नानंतर मानसी आपले पूर्ण लक्ष संसाराकडे वळवून घेतले. ती फक्त काम करत होती. थोड्या दिवसाने मानसीला दिवस गेले.आता तर ती पूर्णपणे संसारात रमून गेली. मानसी शिकलेली होती. तिने नोकरीला महत्व न देता आपल्या मुलाबाळांकडे दिले आणि संसाराकडे लक्ष दिले. मुले आता मोठी झाली होती.
असेच एकदा सुजयला एक महत्त्वाची फाइल सापडत नव्हती. मानसीने त्याला विचारले, “काय हवे आहे?”
सुजय, “एक महत्त्वाची फाइल सापडत नाही शोधतोय.”
मानसी “कोणती फाइल?”
सुजय तिच्या अंगावर एकदम ओरडला “तुला काय कळतंय त्यातलं? एखादी वस्तू ठेवली वेंधळ्यासारखं की ठेवून द्यायचं. व्यवस्थित ठेवायला येत नाही?”
मानसीला वाईट वाटले ती काही बोलली नाही.
आणखी थोड्या दिवसानंतर सुजयला कोणतेतरी टेन्शन आलं होतं? आता तो ऑफिसचं काम घरी सुद्धा करू लागला.
मानसीने विचारले, “इतके काय टेन्शन आहे?”
तो पुन्हा तिला ओरडला “तुला काय कळणार आहे का त्यातलं? आणि कामाच म्हणलं तर तू काय मला सोल्यूशन देणार? तुमची जागा ही फक्त चूल आणि मूलच आहे. तुम्हाला कोणत्या गोष्टी कळणार आहेत आणि त्यातल्या? आणि बायकांना येतं तरी काय?” असे म्हणून तो निघून गेला.
त्यावेळी मानसीची मैत्रीण तिथे होती तेव्हा ती तिला म्हणाली, “अगं त्याच ऐकून का घेतलेस? आणि तू काही करत का नाहीस?”
मानसी म्हणाली, “आता काय करणार आहे. मुले थोडी मोठी झाली आहेत. पण आता मी काय करू? कॉलेज होऊनही इतकी वर्षे झालेली आहेत आणि इतका वर्षाचा मध्ये ग्याप आहे. आता काय करू शकणार आहे?”
मानसीची मैत्रीण “अग तू आधी फॅशन डिझायनिंग खूप सुंदर करायचीस. तुला कॉलेजमध्ये असताना मी पाहिले आहे. मग त्याचा काहीतरी उपयोग कर ना”
मानसी म्हणाली “आता काय करणार आहे मी?”
“एक काम कर मला पेपरवर काढून दे. एका कंपनीमध्ये बघूया काय होते ते” असे म्हणून मानसीची मैत्रिणी ते सगळे पेपर्स घेऊन एका कंपनीमध्ये सबमिट करते. थोड्या दिवसांनी मानसीला मेसेज येतो की तिचे डिझाइन्स कंपनीला खूप आवडलेले आहेत आणि त्यांना आणखीन डिझाईन्स हवे आहेत. त्याबद्दल ते चांगली सॅलरी सुद्धा देतो असे म्हणाले. मानसी खूप खुश झाली आणि परत कामाला लागली.
असेच काही महिने गेल्यानंतर एकदा तिचा नवरा सुजय काहीतरी काम करत असताना त्याचा असिस्टंट तेथे आला. तो सुजयला काहीतरी सांगू लागला आणि सुजयला आता टेन्शन आलं होतं. “काय झाले आहे.” मानसी.
“तुला काय कळणार आहे का त्यातल? तुला काय येते काय कधी?” असे म्हणाला. तेव्हा ती सरळ जाऊन असिस्टंट ला विचारते. असिस्टंटने सांगितले की परवाच रॉ मटेरियल घेतला आहे. त्याचा पेमेंट करून झालेला आहे आणि आता टेंडर पास करण्यासाठी दहा लाख रुपये भरायचे आहे. त्यातील थोड्या पैशांची सोय झालेली आहे. बाकी पैसे भरायचे आहेत शिल्लक आहेत आणि सरांचा स्वभाव कुणाकडे मागायचे नाही असा आहे. रविवार असल्याने आपण बंद आहेत काय करावे ते कळेना असे म्हणून तो निघून गेला. इकडे माणसे थोडा विचार करून उरलेल्या पैशांचा एक चेक सुजय समोर ठेवते तर सुजयला आश्चर्याचा धक्का बसतो हे काय आणि कुठून आले? मानसीने तेव्हा सगळ्या हकीकत सुजयला सांगते. तेव्हा त्याला स्वतःचीच लाज वाटू लागते.
त्याला समजले की बाईने मनात आणले की ती काहीही करू शकते आणि त्याच वेळी तो म्हणाला ती मला उमगली.

Article Categories:
मनोरंजन

Comments are closed.