तुच माझी भाग 14

Written by

#तूचमाझी
भाग 14
दोघे हॉस्पिटलमध्ये गेले तर बाळ मस्त हसत होत …,उर्वशी आणि उत्तम थोडावेळ त्याच्याशी खेळले आणि उत्तमला आठवलं की अंकुशला फोन करायचा राहिला ..त्याने अंकुशला फोन केला ..
अंकुश : हम्म इतका उशीर हॉस्पिटलमध्ये जायला ?
उत्तम : नाही हो बराच वेळ झाला येऊन..पण बाळाशी खेळण्यात विसरून गेलो फोन करायला..
अंकुश : अरे वाह !बाळ खेळायला पण लागलं का? छान छान …उर्वशी कुठे आहे?
उत्तम : बाळशीच खेळतीये ..
अंकुश : बर ती थांबेल तिथे, तिच्याकडे तुझं क्रेडिट कार्ड देऊन ठेव काही खर्च झाला तर ..ऑफिसची काम राहीलीत..ये तू लवकर
उत्तम : अहो पण पप्पा ..अस कस येऊ माझं कार्ड तिला देऊन?? तुमचं ना काहीपण असत
अंकुश : अरे कुठे किती पैसे लागतील आपल्याला काय माहीत ..म्हणून म्हटलं कार्ड दे तिला ..
उत्तम : एक दिवसाने काम काही पळून नाही जाणार ..मी थांबतो इथेच ..
अंकुश : (मनातल्या मनात होका इतकी काळजी तुला ..त्या बाळाची …हम्म ..) उत्तमला -बर ठीक आहे ..पण तू काय रोज बसणार का जाऊन अस हॉस्पिटलमध्ये?
उत्तम : रोज कशाला ?त्याची काही गरज वाटत नाही ..मी थोडे पैसे काल दिलेत त्यांना ..आजपण देतो आजून ..
अंकुश : बर कर तुला जे योग्य वाटेल ते …
उत्तम : थँक्स पप्पा ..मला समजून घेतलत..
अंकुश : हम्म चल ठेवतो आता फोन….बाय काळजी घे स्वतःची पण आणि तिची पण..आणि हसतच फोन ठेवला ..
उत्तम : विचार करत बोलला :तिची कोणाची ? बाळाची काय ? आणि काहीतरी समजून एकदम हसला ..
उर्वशी ने पाहिलं त्याला अस हसताना : सर काय झालं ? असे एकटेच काय हसताय ? मला पण सांगा की..
उत्तम : काही नाही ग ..असच ..
उत्तम बिलिंग काउंटर ला गेला आणि किती पैसे भरायचेत विचारलं …तर आज काही नव्हते भरायचे आता डिस्चार्ज देताना भरा अस सांगितल.मग दोघे बाळाच्या रूम मध्ये गेले ..
उत्तम : ताई आत्ता काही बिल नाही भरायचं आहे ..आता मी निघतो उद्या येऊ परत ..,आणि काळजी करू नका ..(आणि मग एकदम विचार करून) तुमचा नंबर द्या बर मला जर कधी येता नाही आलं तर फोन करत जाईल मी ..आणि हे माझं कार्ड घ्या तुम्हाला काहीपण मदत लागली तर फोन करा ..
बाळाची आई : अहो साहेब माझ्याकडे नाहीये फोन ..इथे खायला पैसे पुरत नाहीत आणि हे फोनचे शौक कोण हो करणार?
उत्तमने उर्वशी कडे पाहिलं आणि दोघे बाहेर पडले… अर्ध्या तासात दोघे परत दवाखान्यात हजर ..सगळे गोंधळले ..
बाळाची आई : काही राहील का साहेब? लगेच परत आलात?
उत्तम : हो ही महत्त्वाची वस्तू राहिली …आणि उर्वशीने एक बॉक्स उघडला त्यातून एक मोबाईल बाहेर काढला आणि त्या माऊलीच्या हातात दिला ..
उर्वशी : मी याच्यात मराठी भाषा सिलेक्ट केली आहे ..माझा आणि सरांचा नंबर सेव केला आहे ..ठीक आहे
त्या माऊलीच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं ..क्षणाचाही विलंब न करता तिने सगळ्यांसमोरच उत्तमला साष्टांग घातला ….उत्तम तर एकदम गोंधळूनच गेला ..त्याने उर्वशीला खुनवल ..तिने त्यांना उठवलं ..
उर्वशी : ताई …आम्ही आमच कर्तव्य केलं हो ..अस पायांवर पडून साहेबांना कोड्यात नका पाडू हो ..काळजी घ्या तुमची आणि बाळाची ..रडू नका …आम्ही आहोतच …उर्वशीच लक्ष अचानक उत्तमकडे गेलं तर हा चक्क रडत होता लहान मुलासारखा रुमालाने डोळे पुसत …उर्वशीला गालातल्या गालात हसू आलं ..आणि त्याच बरोबर कौतुक पण ..
उर्वशी : चला सर आपण निघुया का ? तुमचं पाणी संपलं असेल तर ..
उत्तम : काय ? कसलं पाणी ?
उर्वशीने त्याच्या डोळ्यांकडे बोट दाखवलं आणि खुनवल त्याला समजलं ..मग दोघे निघाले ..गाडीत बसल्याबरोबर उर्वशी जोर जोरात हसू लागली ..उत्तम खूप गोंधळला
उत्तम : मिस उर्वशी …तुम्हाला वेड्यांच्या इस्पितळात सोडून येऊ का ? काय होतंय तुम्हाला ?
उर्वशी : एका माणसाला मी आज लहान मुलासारखं रडताना पाहिलंय …कोण बर तो माणूस ? ओळखा पाहू ..
आता उत्तमने एकदम तिला जवळ घेतले आणि तिच्या हसणाऱ्या ओठांना आपल्या ओठांनी शांत केले ..त्याने तिला स्वतःच्या घटट मिठीत पकडून ठेवलं होतं ..उर्वशी स्वतःला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न करत होती ..पण तो प्रयत्न मनापासून नव्हताच ..त्यामुळे ती सुटू शकत नव्हती …आता उर्वशी खूपच शांत झाली उत्तम मिश्कीलपणे तिच्याकडे पहात होता ..ती शरमेने चुर चुर झाली होती ..
उत्तम : मी पण आत्ता एका माणसाला एकदम गप्प झालेलं पाहिलंय …महितीयेका कोण आहे ते ..(त्याने उर्वशी चा हात हातात घेतला ), उर्वशी हा हात मी आता कधीच नाही सोडणार ..
उर्वशी ला काहीच समजत नव्हतं ..काय बोलावे ..काय करावं ..ती आता खूपच शांत होती ..त्याने गाडी ऑफिस कडे आणली ..पूर्ण रस्त्यात त्याने तिचा हात पकडूनच गाडी चालवली होती ..पण दोघेही काहीच बोलत नव्हते ..पार्किंगमध्ये गाडी आली आणि उर्वशीने पटकन दरवाजा उघडला आणि लिफ्टमध्ये धावतच गेली ..उत्तम तिला आवाज देत होता पण तिने लक्षच नाही दिल ..
सरळ ती वॉशरूम मध्ये गेली ..तिची छाती धडधड करत होती ..ओठ थरथर कापत होते ..हाता पायांना कंप सुटला होता …काहीतरी अनामिक अशी भावना तिला छळत होती ..ती खूप बैचैन झाली होती …सतत तो प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येत होता ..ती विचार करत होती ..मला त्याचा तो स्पर्श का हवाहवासा वाटत आहे ? हे काय आहे? आणि पुन्हा स्वतःलाच समजावत होती ..नाही उर्वशी नाही ..हे चूक आहे …,तिने तोंडावर पाणी मारले ..ओढणीने तोंड पुसून ती अंकुशच्या केबिनमध्ये गेली ..तिथे उत्तम बसला होताच ..
उर्वशी थोडी विचलीत दिसत होती ते पाहून अंकुश : काय ग ? तुला काही होतंय का? बरी आहेस ना ?
उर्वशी : एकदम स्वतःला सावरत – कुठे काय ? काय नाय ..मी चांगली आहे ..काही नाही झालं मला …
अंकुश : बर बर ठीक आहे …आता तू अस कर घरी जा आणि आराम कर ..
उत्तम : फटकन – का ? घरी का ? आजून वेळ आहे की
अंकुश : अरे नीट बघ तिच्याकडे मला तिची तब्येत ठीक वाटत नाहीये
उत्तमने तिच्याकडे पाहिलं आणि अंकुशकडे पाठ करुन तिला डोळा मारला ..उर्वशी एकदम दचकली ..उत्तम : काय हो मॅडम तुमची तब्येत ठीक नाही काय ?डोस जास्त झाला वाटत?
अंकुश : ,कसला रे डोस ? म्हणजे तिला बर नाहीना ..
उत्तम : होना पप्पा …त्यामुळे मीच दिला एक डोस त्यांना …आणि गालातल्या गालात हसू लागला
अंकुश : अरे गाढवा ! तू काय डॉक्टर आहेस का ? काय औषध दिलंस तिला? त्याचाच त्रास होतोय वाटत तिला ..
उत्तम : ,पप्पा वाटेल बर त्यांना …त्यांना त्या डोस ची सवय नाहीना म्हणून त्रास झाला .. होईल सवय मग नाही होणार त्रास
अंकुश विचारात पडला : च्यायला असला कसला रे डोस ? बर मुली मला सांग तू आता बरी आहेस का आणि काम करू शकणार आहेस का ? की घरी जातेस तू?
उर्वशी : मी बरी आहे सर ..करूया आपण काम
अंकुश : अरे वा ! छान आणि मग त्यांच्या कामाला आज सुरुवात झाली .. अंकुश तिला आणि उत्तमला बरीचशी काम सांगत होते आणि त्यावर ते काम करत होते…,कधी 7 वाजून गेले समजलच नाही ..
अंकुशच घड्याळाकडे लक्ष गेलं ..अरे बापरे उशीर झाला की ..उर्वशी तू तरी सांगायच ना किती वाजलेत ते
उर्वशी : सर मी इतकी गुंग झाले होते कामात की मला पण लक्षात नाही आलं ..
अंकुश : वाह ..अशीच मुलगी हवी होती मला इथे ..बर चला आपण निघुया
उत्तम : आपण ? म्हणजे?
अंकुश : अरे तिला मी घेऊन जातो ..तात्या सोबत जाईल ना घरी ती
उत्तम : एकदम चेहरा पडून ..अरे हो ..आणि थोडावेळ विचार करून ..पप्पा आज मी पण गाडी चालवून दमलोय ..मी माझी गाडी ऑफिसमध्येच ठेवतो आणि येतो तुमच्या सोबत .चालेल का?
अंकुश : अरे चालेल काय ..पळेलकी..तुझाच हट्ट असतो वेगळ्या गाडीचा नाहीतर आपण रोजच सोबत येऊ जाऊ शकतो.
आता उर्वशी तात्याजवळ पुढे बसली आणि मागे हे दोघे पूर्ण रस्त्यात त्या गाडीच्या आरश्यातून उत्तम तिला पहात होता . ,आणि ही लाजून लाजून स्वतःची नजर चोरत होती …आता मांजर डोळे मिटून पिल तर काय दिसत नाही का ? ,हेच या दोघांच झालं अंकुशला सगळं लक्षात आलं होतं ..
अंकुश : तात्या गाडी सरळ तुझ्या घरी घे ..
तात्या : का हो साहेब
अंकुश : अरे तू आणि उर्वशी जा ना आणि मग उत्तम चालवेल की गाडी..
तात्या : बर .चालतय की …आणि तात्यांनी गाडी घरी आणली आणि दोघे खाली उतरले ….उत्तम आणि उर्वशीने बाय केला उर्वशी घरी गेली तरी उत्तम त्या दिशेलाच बघत होता …
अंकुश : उत्तमराव गेली ती आता आज तुम्हाला इथेच थांबायचं का?
ऊत्तम : काय पप्पा तुम्ही पण आणि त्याने गाडी चालू

पूनम पिंगळे
क्रमशः

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा