तुझीच…मी!!

Written by

स्वतःलाच विसरून रोज तुझेच नाव गुणगुणत असते…
तुझ्या आठवणीत चिंब न्हाऊन भिजत असते..
तुझ्या विचारात मश्गुल होऊन स्वतःच्याच केसांशी खेळत असते..
तुझ्या वाटेवर नयन खिळवून तुझी वाट बघत असते..
लुकलुकणाऱ्या चांदण्या जणू तुझं नाव घेऊन चिडवताय मला असं भासून मनोमन लाजत असते..
मधेच एक केसांची बट हळुवार माझ्या चेहऱ्यावर आणून वाऱ्याची झुळूक अलगद कानात हितगुज सांगून जात असते..

तुझा भास आहे त्या थंडगार वाऱ्यात, त्या मिणमिणत्या प्रकाशात,त्या लुकलुकणाऱ्या चांदण्यात…तुझ्याच वाटेवर आस लावून बसलेली फक्त तुझीच…मी!!☺️
©®सुवर्णा राहुल बागुल

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा