” तुझे सीक्रेट माझ्याकडे अगदी सुरक्षित आहे”.#100शब्दाची कथा

Written by

नेहा माहेरी अतिलाडकी होती. ती मनातले सीक्रेट आईसोबत सहजपणे व्यक्त करायची. आईसुद्धा समंजस,तिला योग्य असे सल्ले द्यायची.
लग्नानंतर सर्वच बदलले.मोठ्या कुटुंबात जावाभावामधे राहताना तिला जाणवले की, मनातल्या अनेक गोष्टी इतरांना सांगण्यात अर्थ नसतो. ती बिचारी सहजपणे मनातले बोलणार अन ते अगदी घरभर कळणार. कधीकधी तर वाद झालेतर अगदी नवरासुद्धा तीचे एखादे सीक्रेट सर्वांसमोर बोलून मोकळा व्हायचा.
मग तिने मनाशीच पक्के केले की जर माझे मनच सीक्रेट सुरक्षित ठेवू शकत नाही तर इतरांकडून काय अपेक्षा ठेवणार.मग तिने मोबाईलमधेच डायरी डाउनलोड करुन घेतली खास सीक्रेट लिहिण्यासाठी ,पासवर्ड टाकला. जणू तिला तिचा मोबाईल म्हणत होता, ” तुझे सीक्रेट माझ्याकडे अगदी सुरक्षित आहे”.

Article Categories:
मनोरंजन

प्रतिक्रिया व्यक्त करा