तुझी आठवण आता कमी येते

Written by

तुझी आठवण आता कमी येते

अस मुळीच नाही

तुला विसरून जगण्याचा

विचारही मनाला शिवत नाही

तू दूर असलास तरी

माझ्यातच तू सामावला आहेस

आठवणीतल्या प्रत्येक क्षणासोबत

डोळ्यांतच येऊन थांबला आहेस

मनी उसळल्या लाटांनी

तुझ्या प्रेमाचा पसारा मांडला आहे

धडकून त्या हृदयी, जणू सांगत आहेत

तू फक्त माझा फक्त माझाच आहेस

©सरिता सावंत भोसले

Article Categories:
प्रेम

Comments are closed.