तुझ्यावर पहिला अधिकार माझाच आहे..

Written by

तुझ्यावर पहिला अधिकार माझाच आहे……                           ©जयश्री कन्हेरे सातपुते 

सागर आपल्या संसारात छान रमला होता…तो, सुधा त्यांची दोन मुलं…नोकरीसाठी सागर व त्याच कुटुंब बाहेरगावी राहायचं..सुट्ट्यांमध्ये व सणावाराला जायचा गावाला..ते दोन चार दिवसांसाठी..
तो आला कि खूप खुश असायच्या सविता काकू आणि तो परत गेल्यावर त्यांना फार एकट वाटायचं.
त्याच्यासाठी किती गोष्टींचा त्याग केला होता काकूंनी त्यातली एक म्हणजे त्यांची नोकरी..

सागरला खूप जपलं होतं काकूंनी.
तो म्हणायचा “आई सोबत राहा आमच्या”…

पण….

सुधाची धुसफूस कळत होती काकूंना…सुधाला नको होती सासू…त्यांचा संसार सुखाचा करण्यासाठी काकू एकट्याच राहायच्या..

जगापेक्षा नऊ महिने जास्त ओळखत होत्या त्या सागरला..

त्यांच मन म्हणायचं “सागर तुझ्यावर पहिला अधिकार माझाच आहे” जो प्रत्येक आईचा असतो आपल्या मुलांवर पण हे त्याला म्हणू शकल्यानाही काकू.

100शब्दांची गोष्ट समाप्त... ©जयश्री कन्हेरे -सातपुते 

फोटो साभार गुगल 

Article Categories:
सामाजिक

प्रतिक्रिया व्यक्त करा