तुझ्यासवे तुझ्याविना ( भाग 11)

Written by

         चल मुक्ता तुला उशीर होत असेल न निघायचं.

निघायचं काय निघायचं? तु जेवायला माझ्या घरी  येणार आहेस कळलं!

हे कधी ठरलं.

मी निघतानाच आई ला सांगितलं होतं तस! की तू आलाय तर तुला जेवायला बोलवलं आहे.

हे बघ मुक्ता मी तुझ्या घरी कुणालाही ओळखत नाही आणि अस एकदम जेवायला! नाही मला नाही जमणार सॉरी.!

अरे मी तुला जमणार नाही जमणार अस कुठे विचारल मी सांगितिये की तुला जेवायला यायचंय. आणि आता तू नाही आला न तर तुला आणि मला दोघांनाही बोलणे खावे लागतील बर!

नाही मुक्ता हे अति होतंय ह मला असा त्रास द्यायला नाही आवडत कुणाला.

अरे त्रास कसला आहे त्यात आम्ही जेवणार नाही का संध्याकाळी त्यात तू एक ऍड फक्त. आणि माझ्या आई ला आवडत उलट कुणी अस आलेलं.

अग नाही यार मी नाही येणार !

ऐ आता उगाच रडू नको ह तुला यायचं आहे.

नको मुलींच्या घरी गेल की उगाचच इंटरव्ह्यू होतात. त्यामुळे मला नाही यायचं.

कुणी घेणार नाही तुझा इंटरव्ह्यू माझ्या घरचे कूल आहेत सगळे.

नाही कूल तर माझ्या घरचे पण आहेत, पण माझा past experience आहे की घरचे खूप प्रश्न विचारतात.

नाही विचारणार कुणी बघ तू! ही माझी जबाबदारी. आता काही शंका काढू नको ह! मुक्ता ने त्याला चांगलच बजावलं.

आता त्याच्या कडे पर्यायच उरला नव्हता. कुठे फसलो यार मी , मी ज्याच्या साठी आलोय ते तर राहील बाजूला आणि आता काय तर तिच्या घरी जाऊन जेवण करणार वा अर्णव !!! तो स्वतःलाच म्हणाला.
अर्णव मुक्ता च्या घरी आला . तिने सगळ्यांशी ओळख करून दिली. मुक्ता म्हणाली तशी तिच्या घरचे सगळे कूल असल्यामुळे त्याला काही अवघडल्या सारखे वाटलं नाही आणि तो पण मस्त त्यांच्या मध्ये मिसळला. आणि अर्णव चा स्वभाव ही मुळात बोलका असल्यामुळे तिच्या घरच्यांनाही तो आवडला.

फार मस्त आहे हा तुमचं घर! अर्णव म्हणाला. आणि समोरच गार्डन तर एकदम मस्त !

हो मुक्ता च बघते ते सर्व तिला फार आवड आहे. आता ती इथे नाही तर आम्हीच लक्ष देतो.तिच्या आई ने सांगितलं.

काय ग मुक्ता त्याला आपलं औरंगाबाद दाखवलं की नाही?तिच्या आई ने विचारल.

हा म्हणजे आपले सिडको त ले मंदिर वगैरे दाखवले. ती म्हणाली.

काय ग तू पण त्याला बाकीच दाखवायचं न बिवी का मकबरा,पाणचक्की तू काय फक्त सिडकोच दाखवत बसली. तिचे बाबा म्हणाले.

पप्पा, तो थांबणार आहे उद्या सगळं दाखवते  मग. की पुन्हा कधीच तो औरंगाबाद विसरला नाही पाहिजे. ती त्याच्या कडे बघत म्हणाली.

तिच्या बोलण्यातला रोख त्याला कळाला आणि तो पुढे म्हणाला आता तर मी औरंगाबाद विसरायचं म्हंटल तरीही नाही विसरणार.

बर चला जेवणाचे पान मांडलेत जेवून घ्या. मुक्ताच्या आईने सगळ्यांना जेवायला बोलवले.

सगळे सोबत जेवायला बसल्या मुळे त्याला एकदम घरचा फिल आला.
आमच्या घरी पण बाकी काही असलं तर संध्याकाळ च जेवण सोबतच करायचं असा नियम आहे. त्या मुळे मला एकदम घरचीच आठवण आली. तो म्हणाला.

अरे हो आमच्या घरी पण हाच नियम आहे. मुक्ता म्हणाली.

काकू जेवण एकदम मस्त बनवलं ह! खूप दिवसांनंतर घरच जेवण जेवतोय मस्त वाटतय एकदम!

अर्णव तू काहीच खात नाही आहेस अजून घे लाजू नको. तिची आई म्हणाली.

काहीही काय बोलतेय आई चांगला तर जेवतोय आणि हा कुठे आला लाजणाऱ्यात ला.मुक्ता मनातच म्हणाली.

तरीही मुक्ताच्या आई चा आग्रह चालूच होता.

अग आई घेईल न तो त्याला लागलं तर इतका का आग्रह करतीये.

तू थांब ग किती दूर राहतो तो बिचारा घरापासून त्याला कुठे घरच जेवायला मिळत. अर्णव घे अजून एक पोळी.

काकू खूप खाल्लं मी आता बास !

अग तो नाही म्हणतोय तर का इतका आग्रह करतीये त्याला जावया सारखा! तिचे बाबा मिश्कीलपणे म्हणाले.

हे ऐकून अर्णव ला ठसकाच लागला.

हळू पाणी घे! तिच्या आई ने पाणी दिल.

पप्पा!!!! काहीही काय ? मुक्ता त्यांच्या कडे पाहून म्हणाली. मुक्ता ला मात्र एकदम awkward feel झालं.

just kidding! तिचे बाबा म्हणाले.

तिने अर्णव कडे बघितले आता तो एकदम नॉर्मल झाला होता त्याने डोळ्यांनीच विचारल काय झालं?

ती त्याच्या कडे बघून हसून लाजली. आणि तिने   नकारार्थी मान हलवली.

अर्णव च्या नजरेतून तीच हे लाजन काही सुटलं नव्हतं.

सगळ्यांनी जेवण आटपले. जेवणानंतर त्यांनी थोडा वेळ गप्पा मारल्या. चला आता मला निघयला हवं! इथे कॅब मिळतात न ?
अर्णव म्हाणाला.

मिळतात न म्हणजे आमचं काही खेड थोडी आहे . मुक्ता थोडं रागानेच म्हणाली.

अरे कॅब कशाला बुक करतोय मुक्ता सोडेल न तुला तसाही फार काही उशीर नाही झाला. तिचे बाबा म्हणाले.

नाही खरच नको काका जाईन न मी.

मुक्ताची मात्र आता चांगलीच पंचाईत झाली तिला सोडायला येते म्हणून अर्णव ला आग्रह पण नव्हता करता येत आणि नाही येत असही तिला म्हणता येत नव्हतं. त्यामुळे आता तिने शांत बसण्याचा पर्याय निवडला.

आणि एकदाच अर्णव तिच्या सोबत जायला हो म्हणाला. तसा तिला मनातून आनंदच झाला. आणि त्यालाही . पण दोघांनीही तो शिफायतिने लपवला.

अर्णव ने सगळ्यांचा निरोप घेतला आणि ते निघाले.

खूप मस्त आहेत ह मुक्ता तुझ्या घरचे म्हणजे परक्यांनाही आपलं करतील असे.

हो अरे अस काही नाही सगळे आपलेच तर असतात मुक्ता म्हणाली.

ऐ एक मिनिट आपला येतानाचा रस्ता वेगळा होता आता कुठे घेऊन चाललीस मला?

इतक्या छान जेवणानंतर पान नको! मुक्ता म्हणाली.

म्हणजे तू पानटपरी वर जाणार? आईशप्पथ!!! घरी माहिती आहे का तुझ्या?

ऐ गप!! मी काही पान टपरी वर वगैरे नाही घेऊन जाणार तुला औरंगाबाद ची अजून एक स्पेशालिटी आहे ही पान! इथले पान सेंटर जगभरात फेमस आहेत.

ohhh अस आहे का? चला तर मग आता हे पण try करू.

आम्ही तर नेहमी येत असतो मुक्ता म्हणाली.

ती त्याला तारा पान सेंटर ला घेऊन आली.
तिथली गर्दी पाहून तर तो ही अचंबित झाला इतके लोक फक्त पान खाण्यासाठी!

त्याने जाऊन दोघांसाठीही मसाला पान आणले.

मस्त यार भारीच आहे खरच! तो म्हणाला.

अरे मग म्हणून तर आणलं तुला. मुक्ता म्हणाली.

भारी आहेस यार मुक्ता तू खरच म्हणजे आवडलं आपल्याला हे! म्हणजे तुझ्या कडे बघून वाटणार नाही की तुला ही पण आवड असेन!

हे बघ test test असते शेवटी. पण तुला आवडलं न?

हो तर.

बर चल नाहीतर पप्पांचा कॉल येईल परत उशीर झाला म्हणून.

हो हो चल .

बर अर्णव उद्या सकाळी शार्प 6 ला रेडी हो आपण सुरवात ट्रेकिंग पासून करूया .

wow इथे आहे ट्रेकिंग साठी जागा .

मग काय तू फक्त सकाळी तयार राहा मी येईल घ्यायला.

नको मी येतो उद्या माझी गाडी घेऊन.

नाही उद्या आपण माझ्या च गाडीवर जाणार आहोत उगाच फोर व्हीलर नको पार्किंगचा प्रॉब्लेम येतो परत . तू फक्त रेडी राहा.

ओके मॅडम ! तुम्ही म्हणाल तस! तो म्हणाला.

आणि तिने त्याला हॉटेल वर सोडलं. आणि ती घरी आली.

ती घरी आली तेव्हा अर्णव च कौतुक चालू होतं. किती मोकळा आहे न अर्णव बघ न इतका शिकलेला आणि इतकं मोठं research करत असून सुद्धा त्याला थोडाही गर्व नाही. तिची आई म्हणाली.

hmmm हे खरंच आहे आई तो तसाच आहे तो प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ वेगळ्या ठेवतो. ती म्हणाली.

आता पुढच्या वेळेस आला न मी म्हणणार आहे त्याला लग्न करून घे म्हणून किती जेवायचे हाल होतात बिचाऱ्याचे.पहिल्यांदा च आला म्हणून काही बोलले नाही मी.

आई झालं पुन्हा चालू नको हा होऊ आणि आपलं ठरलं न दुसऱ्यांना काही सल्ले नाही द्यायचे त्याच आयुष्य आहे तो बघून घेईल न! ती थोडी चिडलीच.

बर बाई नाही बोलणार पण तो कुठे दुसरा आहे तो तर आपलाच आहे न !

आता तो आपला कधी पासून झाला ? मुक्ता चा पुढचा प्रश्न.

तुझ्याशी बोलणं न अवघड आहे मुक्ता. मला फक्त काळजी वाटली म्हणून मी बोलली.

आई नको न आता तो विषय जाऊ दे बर ती म्हणाली.

त्यांच्या अश्याच थोड्या वेळ गप्पा चालल्या आणि मग ते सगळे झोपायला गेले एकंदर काय तर तिच्या घरच्यांना अर्णव चांगलाच आवडला होता.

        सकाळी ठरल्या प्रमाणे मुक्ता अर्णव ला   घ्यायला गेली. आणि तो ही रेडीच होता.
काय मग रात्री झोप लागली की नाही?  मुक्ता ने विचारल.

कशाची झोप माझी झोपच उडलीय! तो मनातच म्हाणाला. आणि फक्त होकारार्थी मान डोलावली.

तुझं काय? त्याने विचारल.

तुझ्या सारखीच माझी परिस्थिती आहे तीही मनातच म्हणाली आणि त्याला फक्त हो म्हणाली.

मुक्ता ने आपलं हेल्मेट घातलं आणि गाडी स्टार्ट केली. आणि त्यांचा औरंगाबाद दर्शन चा प्रवास सुरु झाला.

क्रमशः
©Neha R Dhole.

Article Categories:
प्रेम

Comments are closed.