तुझ्यासवे तुझ्याविना ( भाग 12 )

Written by

 

  सकाळची गार हवा, अजून शहर पूर्णपणे जागे झाले नव्हते त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर ते दोघेच आणि मुक्ता नी गाडी बरीच स्पीड मध्ये होती.
अग ऐ हळू चालव न! अर्णव तिला मधेच म्हणाला.

मी हेल्मेट घातलय! ती म्हणाली.

आता हे काय लॉजिक आहे  हेल्मेट घातलं म्हणजे गाडी कशीही चालवायचं लायसन्स नाही मिळालं हा कळलं का!

अरे ही नॉर्मल स्पीड आहे आणि पोहचायच आहे न! बाय द वे अर्णव तुला मला बोलायचा काहीही अधिकार नाही कारण तू पण गाडी खूप स्पीड मधेच चालवतो.

अग हो पण मला कॉन्फिडन्स आहे मी कंट्रोल करू शकतो आपले पाय तरी पुरतात का? हाईट बघ एकदा.

बर इतकी पण कमी नाही मला उंची वरून बोलायची गरज नाही.

बर रस्ते बघ एकदा ते आहेत का तसे!

तो बोलतच होता पण मुक्ता ने काही त्याच ऐकलं नाही. तिचा मूड छान होता तिने मस्त गाणं म्हणणं सुरू केलं.

आणि गाणं म्हंटल्यावर काय अर्णव नि पण तिला साथ दिली. गाणे म्हणत म्हणत ते युनिव्हर्सिटी मध्ये पोहचले . एकदम शांत वातावरण आजूबाजूला झाडेच झाडे हलकासा पाऊस आणि धुके. खूप मनमोहक वातावरण होत ते. अर्णव ने लगेच आपला कॅमेरा काढला आणि फोटोज घ्यायला सुरुवात केली.

just amazing ! यार काय सुंदर जागा आहे ही. चला सुरवात तर चांगली झाली. अर्णव म्हणाला.

अरे ही तर सुरवात आहे अजून तर पुरा औरंगाबाद बाकी हे ! ती म्हणाली.

ते दोघे टेकडी च्या पायथ्याशी आले.
हे बघ अर्णव हे आमचं गोगाबाबा! मी ट्रेकींग ची सुरवात इथूनच केली. ती अभिमानाने गोगाबाबा टेकडी दाखवत म्हणाली.

मुक्ता seriously तू मला इथे ट्रेक साठी घेऊन आलीये! हे बघ लहानमुलांसाठी ठीक आहे हे आता आपण मोठे झालोय न ?

म्हणजे तुला काय म्हणायचं ?,

तो हसायला लागला i can’t believe की तू मला हे चढायला सांगतेय! अग हार्डली 15 मिनिटस लागतील चढायला. तो अजूनही हसतच होता.

मुक्ता चा चेहरा एकदम पडला. हे बघ इतकी काही छोटी नाही ही टेकडी. तू न ओव्हर रिऍक्ट करतोय.

अग मुक्ता आपण कळसूबाई सर केलेला आहे लास्ट वीक मध्ये हरिशचंद्र चढून आलो आणि त्या समोर हे म्हणजे.

मुक्ताला पण कळून चुकलं की आता अर्णव सोबत वाद घालून काहीही फायदा नाही त्याचा मुद्दा बरोबर होता.

हो तुझं खर आहे पण आता आलो तर चढू या न ! ती म्हणाली.

चल आता काय सकाळची झोप खराब केलीये ह्या साठी आता तर चढावच लागेल.

मुक्ता ने त्याला फक्त एक रागीट लुक दिला. आणि पण त्याने ignore केल.

अर्णव ने सांगितल्या प्रमाणे तो 15 मिनिटांत चढला पण.

अरे wow इथून सकाळी view ch खरच भारी दिसत आहेत. त्याने आपल्या कॅमेऱ्यामध्ये फोटोस काढले.

hey मुक्ता तो बिबी का मकबरा आहे न! तो मकबऱ्या कडे बोट दाखवत म्हणाला.

हो!!!

amazing यार! काय कलाकृती आहे.

अरे आपल्याला जायचं आहे तिथे नंतर बोल हे सगळं.आता इथून बघून घे सगळं तुला माहिती आहे का इथून सगळं औरंगाबाद दिसत.

हो खरच मग ते 56 दरवाजे दाखव न!

अरे ते न जाऊ न आपण त्या दरवाज्यांमधून असे नाही दिसणार.

बर मग तुमचं सिडको दिसत?

हा ते म्हणजे बघ त्या साईड ला आहे.

ohhh मग ह्या बाजूला नागपूर आहे आणि मागच्या बाजूला नाशिक आणि सरळ गेलं की पुणे. तो दाखवत म्हणाला. हे बघ मला फक्त इतकच म्हणायच आहे की इथून काहीही औरंगाबाद वगैरे दिसत नाही . उगचच चढवून सांगू नको.

मुक्ता आता शांतच झाली कारण खरच तिच्या कडे काहीही बोलण्या सारख नव्हतं.

आणि अर्णव च्या चेहऱ्यावर तर विजयी भाव होते.

बर नाही दिसत, पण जे दिसतंय ते तर दाखवू दे!ती म्हणाली.

तिने तो सगळा परिसर दाखवला आणि मग त्यांचा मोर्चा निघाला वेरुळ कडे.

      वेरुळ इतिहास संशोधकांच माहेरघर वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना. जागतिक पर्यटकांच केंद्रबिंदू. अशी ओळख मुक्ता ने करून दिली. तू आधी आलेला आहेस इथे?

हो म्हणजे शाळेच्या ट्रिप येतात न तेव्हा आलेलो पण तेव्हा काही कळत नाही खर सौन्दर्य तर आता कळतंय ह्या लेण्यांच.

    तिने एकेक करत सगळ्या लेण्या दाखवल्या  त्यात सगळ्यांच आकर्षण असलेली कैलाश लेणी ती बघून तर अर्णव थक्कच झाला.

मुक्ता काय ग्रेट लोक होती यार ही म्हणजे हे सगळं बघून तर i am speechless!

हो जवळपास कितीतरी पिढ्या गेल्या त्यांचं हे बांधकाम करताना. आणि ह्याच वैशिष्ट्य म्हणजे ह्या लेण्या एकाच अखंड दगडात वरून खाली कोरलेली आहे.

हो ना टेक्नॉलॉजी कितीही डेव्हलप झाली ना तरीही अस काही नाही करू शकत.

हम्मम!करेक्ट.

अर्णव चल समोरच न घृष्णेश्वराच मंदिर आहे.ती त्याला दाखवत म्हणाली.

चल आता काय नाव काढलच तर जाऊन येऊ.

आणि ती त्याला मंदिरात घेऊनच गेली. दोघांनीही दर्शन घेतलं. काय मुक्ता आता पुढे कुठे जायच?

ammm म्हैसमाळ? औरंगाबादरांच हिल स्टेशन!

चल ! आणि मुक्ता तू आधीच अश्या टॅग नको लावू ह माझ्या एक्सपेक्टशन खूप वाढतात मग. आणि समोर काहीच निघत नाही.

हे बघ मी स्पेसिफिकली मेंशन केलंय की औरंगाबादकरांच त्यामुळे तुला नक्कीच वाटणार नाही पण आमच्या साठी आहे.

बर आधी मला बघू तर दे मग ठरवू.

      ते म्हैसमाळ ला पोहचले. मुक्ता ला थोडी धाकधूकच  होती अर्णव ला आवडेल की नाही ही जागा पण पावसाळा असल्यामुळे तो एकदम खुश झाला ती जागा पाहून आणि मुक्ता च एक मोठं टेन्शन हलक झालं.

मस्त आहे यार ही प्लेस !, पण मुक्ता तुझ्या औरंगाबाद introduction च्या स्पीच मध्ये सांगितलं नाही हे.

आता काय आहे न अर्णव इतकं आहे  आमच्या कडे सांगण्यासारखं की गेले असेल हे विसरून. ती पण अभिमानाने म्हणाली.

ohh अच्छा म्हणजे अजून पण काही आहे का जे नाही सांगितलं.

ह खुलताबाद चल तिथेही जाऊ!

तिथे काय आहे?

मंदिर खूप मस्त आहे पाहण्यासारखं.

अजून एक मंदिर! मुक्ता यार seriously!

हे बघ aurangabad tour is incomplet with out Khultabad. so plz dont say no!

ok lets go!

आणि परतीच्या वाटेवरच त्यांना लागलं खुलताबाद. मंदिर आणि मारोतीच दर्शन घेऊन अर्णव ला कळलं की खरच म्हणत होती मुक्ता की मी किती चांगली जागा मिस केली असती.

बघ आवडलं न, मी म्हटलं होतं न तुला की आवडणारच!

खुलताबाद नंतर ते गेले बिबी का मकबरा!

हा आमचा दख्खनचा ताजमहमल. औरंगजेबच्या मोठ्या मुलाने त्याच्या आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ बनवलेला. ह्याला बनवायला जवळजवळ 10 वर्ष लागली. आणि त्या काळी ह्यावर 7 लाख खर्च केला गेला. तिने सांगितले.

nice! मस्त आहे.
अर्णव एक मिनिट इकडे ये तने त्याचा हाथ धरून जवळ जवळ ओढतच तिथे नेले हे बघ इथे न कॉइन टाकायचा आणि हा जर खाली त्या कब्र वर पडला तर आपली विष पूर्ण होते.

काहीही काय मुक्ता अस कुठे असत. अरे खरच तू try तर कर. बर ओके i will try! त्याने डोळे मिटून आपली ईच्छा व्यक्त केली आणि कॉइन टाकला. आणि मुक्ताच्या आवाजनेच त्याने डोळे उघडले. अर्णव बघ तुझा कॉइन पडला. wow ती आनंदी होऊन टाळ्याच वाजवत होती. काय मागितलं?

तुला……. तो हळूच म्हणाला.

काय म्हणाला? तिने शांत होऊन विचारल.

नाही काही नाही.खर तर तिला ऐकू गेलं होतं पण तिला अर्णव च्या तोंडून ऐकायचं होत . पण तो काहीच नाही बोलला. कसा आहे यार साधं इतकं पण बोलू शकत नाही? ती हसून स्वतःला च म्हणाली.

आता कुठे?

आता आजचा लास्ट पॉईंट सलीम अली सरोवर one of my favorite !

ह्म्म नावच जबसरदस्त वाटतय!

अरे जागा पण खूप छान आहे.

ती त्याला सलीम अली सरोवरावर घेऊन आली . हे बघ हे सरोवर आणि हे गार्डन ती त्यालागार्डन मध्ये घेऊन आली.

बापरे ! मुक्ता किती वेगवेगळे पक्षी आहेत इथे कधीही पाहिले नाही असे.

हो इथे विदेशी पक्षी पण येतात.

काय खरच मस्त च यार!

फार सुंदर जागा आहे ही चल कुठे तरी बसूयात. किती तरी दिवसांनी इतकं सुंदर गार्डन बघतोय.

हो समोर तो पूल दिसतोय न तिथे बसूयात.

आणि दोघेही तिथे जाऊन बसले.

   त्यांनी तिथे पुष्कळ फोटो, सेल्फीस काढल्या.  आणि नंतर अश्याच गप्पांना सुरवात झाली.

अर्णव तू मला सांगणार होतास इथे कासकाय आला आणि तुझ्या गर्लफ्रेंड ला भेटायला जाणार होता त्याच काय झालं?

अरे बापरे म्हणजे तुझ्या डोक्यात अजूनही आहे ते मी तर केव्हाच विसरलो!

काय !!! तू तिला भेटायचं विसरला.

अग कोण ती अशी कुणीच नाही आहे माझ्या आयुष्यात. तो हसून म्हणाला.

म्हणजे तू मला खोट का सांगितलं.

अग मी अशीच घेत होतो तुझी. ह्या जगात सगळ्यात सोपं काय आहे माहिती आहे तुला बनवणं. तो अजूनही तिच्यावर हसत होता.

अर्णव तू हसतोय तुला कळतय का तू कसली मजा घेत होता माझी अरे किती त्रास झाला मला.

त्रास झाला, का?

का म्हणजे तुझ्या आयुष्यात दुसरं कुणी आहे म्हटल्यावर.

मुक्ता मी काहीही म्हणेल आणि तू विश्वास ठेवणार का ग ? तू एकदाही विचार नाही केला की मी खरच इथे कश्या साठी आलोय.

तुझं काम होत न???

अग वेडी आहेस का तू माझं इकडे कुठलं काम असणार आहे आणि असत तर मी तुला बोललो असतो ना.

मग का आलास?

तुला अजूनही कळत नाही आहे का? इतकी कशी ग मंद तू? मी तुझ्या साठी आलोय मुक्ता तिचा हात हातात घेत तो म्हणाला.

काय??? अर्णव dont tell me की तू अजूनही माझी घेतोय.

नाही मुक्ता i swear ! आता मी खूप seriously सांगतोय. मी मला औरंगाबाद च काहीही माहिती नसताना आलोय ते फक्त तुला भेटण्यासाठी मला सवय झाली आहे तुझी खूप.  and i realize that I can’t live without you!

what……..

अग तूच विचार कर न काल पासून मी इथे आलोय माझं सगळं काम सोडून का? काय गरज होती मला.

हो तेच म्हणतिये मी तू मला नाशिक ला पण बोलू शकला असतास हे. म्हणजे मी उद्या येणारच होते.

ते च न मला माहिती होत की औरंगाबाद तुझं पाहिलं प्रेम आहे आणि म्हणून मी इथे आलोय.

अर्णव, किती वेडा आहेस तू इतका विचार करतो.

मुक्ता, तू वेडा म्हण नाहीतर काहीही म्हण पण हेच खरं आहे की मला खरच तू खूप आवडतेस i really love you!  म्हणजे तुझं गाणं, बिनधास्त राहणं, सतत विसरणं, तुझा प्रामाणिकपणा, तुझं रागावणं,आपली विदर्भ vs मराठवाडा भांडण हे सगळंच मला आवडत.तुझ्या सोबत मला वेळेचही भान राहत नाही. आणि न माझी एक ईच्छा आहे सगळं जग पालथं घालायचं आहे मला पण ते ही तुझ्यासोबत…………. देणार ना मला साथ? and if you feel the same then just say yesss!!!

अर्णव मला न कस रिऍक्ट व्हावं काहीही कळत नाही आहे. म्हणजे तुला भेटल्यावर पहिल्यांदा असच वाटलंकी माझ्या आयुष्यात जर कुणी मुलगा असेल तर तो अर्णव असावा किंवा त्याच्या सारखाच कुणी तरी आणि  yesss अर्णव मी तयार आहे तुझ्या सोबत कुठेही यायला तू जिथे म्हणशील तिथे.

दोघांनाही काय बोलावं काहीही सुचत नव्हतं. त्याने अलगद तिला मिठीत घेतलं.आणि तिची favorite जागा आज त्यांची favorite झाली होती आणि ते सरोवर त्यांच्या प्रेमाचा साक्षिदार….!!!!
क्रमशः
© Neha R

Dhole

.

 

Article Categories:
प्रेम

Comments are closed.