तुझ्या आईची …..

Written by

तुझ्या आईची …..काय टायटल वाचून अगदीच बेक्कार वाटलं असेल ना? …..वाटायलाच हवं नाही का? ……

आज हे वाक्य ज्याच्या- त्याच्या तोंडी सर्रासपणे वापरलं जातं. तुझ्या आईची पासून सुरुवात होत पुढे ‘आई’ लावत बरेच घाणेरडे शब्द ज्याला आपण सोज्वळ भाषेत शिवी म्हणतो आज त्यांचा मुक्त वापर जो तो करताना दिसतो नाही का ?

बरं आता आई झाली की, मग बहिणीचे टायटल लावत पुढची शिवी द्यायला सगळे मोकळे नाही का? पण शिव्यांसाठी बाई हवीच ……         

बरं स्त्रीला मधे घेत त्यावरून तिचा बाजार मांडत आपण खरंतर आपल्याच आई- बहिणीला शिवी घालतोय असं ह्या शीवेकरांच्या ध्यानीही नसावं याचं मात्र मला जाम नवल वाटतं.

जो तो उठतो तो आई- बहिणीवर शिव्यांनी तोंडसुख घेऊन मोकळा होतो. ज्या आईच्या योनीतून तो जन्म घेतो त्यालाच तो कलंकीत करताना ह्याची जिभ कशी झडत नाही?……

असले हे शिवी देणारे शिवी बहाद्दर खरंतर त्यांनी माणसाचा जन्मच का घेतला असावा ह्याचा प्रश्न मला सारखा सतावतो.

लोकांच्या आया बहिणींना शिव्या देत स्वतः च्या आया – बहीणींना सेफ करण्याचं कसलं तंत्र असेल ह्यांचं?…… रात्रीच्या अंधारात स्वतः च्या बायकोलाही हीच शिव्यांची लाखोली वाहत हवं ते ओरबडून घेण्यात ह्यांना कसला पुरूषार्थ वाटत असेल …..

आया बहीणींच्याच पोटी त्यांच्याच योनीतून जन्म घेऊन त्यांच्याच स्तनातून दुध पिऊन आज हा एवढा मोठा झालाय की, त्याच्या आया बहिणींच्याच वयाच्या इतर बायकांना पाहताना वासनेची लाळ टपटप गाळत ‘जवळ आली तर ठिक नाहीतर’ परत, तुझ्या आईची …… करत तिला लुटायचं …….

आज स्त्रियांनी स्वतःचं वेगळं असं अस्तित्व सिद्ध केलंय पण हे “तुझ्या आईची …..ची शिवी” कधी बंद होणार?

घरातल्या देवीला पुजायचं आणि हाडामासांच्या स्त्री ला मात्र तुझ्या आईची करत बोलायचं कीती हा विरोधाभास नाही का? …

आईची शीवी देणे हे आजकाल फॅशन झालीयं. कधीकाळी आईची महती सांगता- सांगता शब्द पुरत नव्हते त्याच ठिकाणी आता शिवीसाठी शब्द थांबत नाही हे आजचं दुर्दैव आहे आणि तरीही त्यांनी न चुकता म्हणायचं की,

स्वामी तिन्ही जगाचा आईवीना भिकारी …..
आईवीना भिकारी……

©Sunita Choudhari.

(आजचा ब्लाॅग लिहिताना मनात खुप चिड आलीये. जिथे बघावं तिथे आया बहीणींची शीवी मग आता आपण नक्की पुढारतोय का मागसलोय हे ज्यांने त्याने ठरवावं. सरसकट सगळ्या पुरूषांना हे म्हणत नाहीये मी पण सर्रासपणे हेच सगळीकडे चाल्लंय ह्याची खंत वाटते ह्यावर थोडा विचार व्हावा म्हणून हा ब्लाॅग लिहिण्याचा खटाटोप ….काही चुकले असल्यास क्षमा असावी, धन्यवाद.)

Article Categories:
नारीवादी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत