“तुझ्या माझ्या मिलनाचा वसंत मोहरला” #प्रेमकथा

Written by

जया आणि महेश एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे पण त्यांच्या आयुष्यात कधी असा प्रसंग येईल अशी कोणी कल्पना केली नव्हती…

जया ज्या ‘बच्चू’ चा एवढा राग करायची त्या बच्चूने च महेश चा जीव वाचवला होता…
ते ही स्वतःचा प्राण गमावून…

जया ला फार पश्चात्ताप होत होता की तिने कधी या बच्चू ला का समजून घेतले नसेल???

महेश!!
कितीतरी दिवसांपासून ICU मध्ये होता… आज त्याला जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट करणार होते… म्हणजे जया आता त्याला नेहमी भेटू शकणार होती, त्याच्यासमोर जाऊन त्याला बघू शकणार होती…

ती महेशला सोडायला तयारच नव्हती…
किती समजावले जयाला पण ती कोणाचे ऐकायलाच तयार नव्हती..

महेश ला जनरल वॉर्ड ला शिफ्ट केले…
धोका टळला असला तरी डॉक्टरांनी त्याला ‘under observation’ ठेवायला सांगितले होते…

जया आता महेशला अगदी जवळून बघत होती… त्याच्या saline लागलेला हात हातात घेऊन ती कित्येकवेळ रडायची…
तिला पूर्वीचे दिवस आठवायचे…

(एक वर्षापूर्वी….)

महेश ला कुत्री फार आवडत असे…
आपल्या प्रेमळ स्पर्शाने तो सगळ्यांना आपलेसे बनवत असे… तो निरागस, घर नसलेल्या-बेवारस कुत्र्यांसोबत तासनतास घालवत असे…
त्यांचे सगळे लाड पुरवत असे… त्यांना रोज काही काही खायला आणत असे….

महेश नेहमी एका डोंगराच्या पायथ्याशी बसायचा…  तिथे जवळच असणाऱ्या स्कूल ची किनकिननारी घंटा, आकाशात भिरभिरणाऱ्या पक्षांची किलबिलाट, जवळून खळखळ वाहणाऱ्या ओढ्याचे संगीत आणि तिथे फिरणारी कुत्री हेच त्याचं आयुष्य होतं…

तो तिथे एवढा रमायचा की कधी सूर्य मावळतीला जायचा त्याला कळतही नसे…

असाच एक ‘कुत्रा!’, नेहमी पायथ्याशी बसून राहत असे… महेश त्याला बच्चू म्हणत असे… तो महेश चा अगदी प्रिय कुत्रा होता… त्याला कुत्रा म्हटलेलं महेशला कधीच आवडत नसे…
आज ही तो तिथेच बसून, बच्चू आणि त्याच्या मित्रांशी खेळत होता…

तो निघणार तेवढ्यात जया येऊन त्याला धडकली…

तिने महेशला फार कवटाळून पकडले होते… फार घाबरलेली वाटत होती… तिचे हात थरथरत होते…
तोंडातून शब्द फुटत नव्हता …
तिला धावून धावून धाप लागली होती… घामाने ओलिचिंब ती महेश ला घट्ट पकडत होती…

महेश ने जयाला सावरलं… तिला बाजूला करून विचारणार च होता की काय झालं तोच मागून तीन चार कुत्री भुंकत जयाकडे आली…

तशीच ती महेश च्या मागे जाऊन उभी झाली…

“ओह्हह!!!… 
यांच्यामुळे घाबरल्या तर तुम्ही…?
बसा इथे जरा… 
मी करतो यांना शांत…”

जयाला बाकावर बसवून महेश त्या भुंकत आलेल्या कुत्र्यांसोबत लडिवाळ करू लागला…
महेश च्या बोलण्या-बोलण्यांत कुत्री कधी शांत झालीत कळलंच नाही… एकमेकांसोबत ते सगळे असे खेळत होती जणू त्यांची खूप आधीची ओळख आहे…

जया सुध्दा त्यांना असं बघून गोंधळून गेली…
ती आता शांत झाली होती… धावून धावून तिला थकल्यासारखे वाटत होते… ग्लानी आल्यासारखेही वाटत होते…

महेशचे जयाकडे लक्ष गेले आणि त्याने जयाला सावरले…. जवळ असलेली बिस्किटे आणि पाणी दिलें… जयाला ही बरं वाटत होतं आता…

महेश जयाला विचारपूस करत होता…
कुठे राहतेस? तुला सोडून देऊ का? address सांग !!!
वगैरे वगैरे पण ही शब्द बोलेल तर शप्पथ!!!

महेश तिच्याशी बोलून बोलून थकला होता…
शेवटी तो उठला आणि निघायला लागला…

त्याने आपला काळा चष्मा डोळ्यांवर चढवला आणि आपली काठी घेऊन निघणार तोच जयाने त्याचा हात धरला…

तिला आत्ता कळले की, ती एवढ्या वेळची इशाऱ्याने बोलत होती  (sign language मध्ये) तरी महेश ला का कळत नव्हते…
कारण त्याचे डोळे इतरांसारखे असले तरी तो बघू शकत नव्हता…

जयाने महेशचा हात घट्ट पकडला आणि सोबत ओढत नेऊ लागली…

ती सरळ महेश ला आपल्या घरी घेऊन गेली…
घरी जयाची आई व दादा वाट च बघत होते… ती दिसल्या दिसल्या दादाने आईला हाक दिली…
आईची बडबड सुरू झाली…

“काय ग, कुठे गेली होतीस ???
लवकर नाही का यायचं???”

तसं दादाने आईला थांबवलं आणि महेशकडे बघत जयाला विचारलं…

“हे कोण???
आज काय नवीन उद्योग केलास???”

दादा महेश ला …
“या… तुम्ही बसा… तुम्ही ठिक तर आहेत ना???
आमची जया म्हणजे न ……..”

“नाही हो…”—महेश

जयाने सगळा वृत्तांत तिच्या बोटांच्या लयबद्धतीत होणाऱ्या तालावर सांगितले आणि आई दादा हसायला लागले…

महेश ला काही कळेना की का हसत आहेत… कारण त्याने फक्त “अ अअअअअअअ” असा आवाज च ऐकला होता…

तो दादांना विचारू लागला की काय झाले तेव्हा दादांनी सांगितले की, जयाने आम्हाला सगळं सांगितलं आता काय घडले ते…
ती जन्मापासून च मुकी आहे…
परंतु तिला ऐकू येतं…

तिला कुत्रे अजिबात आवडत नाही… खूप राग करते ती… आणि आज तिच्याच मागे कुत्रे लागलीत…

मात्र तिला बोलता येत नसले तरी ती आपल्या ला response देत होती…

आता महेश ला तो प्रसंग आठवला आणि समजलं की जयाने त्याला उत्तरं का दिली नाहीत…

तो जयाला ‘सॉरी‘ म्हणू लागला आणि जया मात्र डोळ्यांत आसू आणून त्याला “Thanks” म्हणत होती… तिने महेशसाठी आणलेला चहाचा कप महेशच्या हातात दिला…

महेश जिथे नेहमी बसायचा तिथेच बाजूला असणाऱ्या school मध्ये जया टीचर होती…
जया तिच्यासारख्या मुलांना sign language शिकवायची…

महेश एक लेखक आणि कवी ही होता…
Translation सुद्धा तो करत… त्यासाठी त्याला अवॉर्ड पण मिळाला होता… त्यानी अनेक books ब्रेन लिपी मध्ये translate केली होती…

महेश आणि जया यांनी दोघांनीही आपापल्या अपंगत्वावर मात करून आयुष्यावर विजय मिळवला होता…

जया आणि महेश यांची आता नेहमी डोंगराच्या पायथ्याशी भेट व्हायची… तिला बच्चू मात्र आवडत नसे… ती त्याचा राग करायची…

महेश आणि जयाची मात्र हळूहळू मैत्री झाली…
मैत्री प्रेमात बदलायला वेळ लागला नाही …

तासनतास दोघे ही प्रेमात आकंठ बुडालेले असायचे… एकमेकांच्या भावना त्यांना न बोलता, न बघता कळायच्या…
एकमेकांच्या मिठीत ते जग विसरायचे…
तो स्पर्श… ती त्यांची एकमेकांची भाषा…
त्यांचं एक वेगळं विश्व होतं… त्यातच ते रमायचे… दोघंही स्पर्शातून बोलायचे…

मनात आनंदाची लहर उठावी ना!! तसंच व्हायचं दोघांना एकमेकांना भेटून…
रोज नव्याने भेटून, नव्याने प्रेमात पडायचे…
त्यांची अबोल गुफ्तगु दाही दिशा उजळून टाकायची… दोघांचीही हात एकमेकांच्या हातात गुरफटून रहायची…
पक्षांमध्ये सुद्धा त्यांची गुटूर-गु famous झाली होती…????
महेश च्या हृदयाची धडधड हें च जयाचे आवडते संगीत होते…

महेश आपल्या अखंड बडबडीने तिच्या मनी
स्वप्न  जागवायचा आणि जयाच्या स्वप्नांमध्ये आपल्या प्रेमळ शब्दांनी रंग भरायचा…

“निशब्द प्रेम माझे-तुझे
स्पर्शातून जागले गं…
ओठी ओथंबलेले प्रेम तुझे
मनी माझ्या थिजले गं…
भावना तुझ्या-माझ्या
हाती माझ्या सजवले गं…
गुंतता हृदय तुझे-माझे
स्वप्न नवे रंगले गं…”

जया आणि महेश सोबत असतांना एकमेकांच्या मिठीत तर सोबत नसतांना एकमेकांच्या आठवणीत रमायचे..

कधी खट्याळ वारा जयाच्या केसांशी खेळून जाई आणि महेश ची अनुभूती करून देई…
तर कधी तिच्या गाली लाजेची गुलाबी खळी ठेऊन जाई…

आपले रूप ती आरशात वारंवार निरखु लागली…  कधी बांगड्यांची खणखणाट, तर कधी पायी असणाऱ्या पायल ची छुनछुन, तिला महेशच्या गुदगुल्यांची आठवण करून देई…

आता जागोजागी तिला महेश असल्याचा भास होत असे… त्याचा आवाज कानात गुणगुणत असे…

महेश चं ही असंच काहीसं होतं…
त्याला जयाचा स्पर्श कधी वाऱ्यातून, तर कधी ओढ्याच्या खळाळणाऱ्या पाण्याच्या थेंबांतून जाणवत असे… तिचा तो नशीला गंध आठवून तो प्रेमवेडा होत असे…

“ती साद घाली मनाला मनातून…
ती ओठी सजते माझ्या शब्दातून…
अंग अंग मोहरते तुझ्या-माझ्या स्पर्शातून…
सांग सखे, जाशील कुठे माझ्या हृदयातून…”

महेश अनेक रचना करून जयाला ऐकवत असे…
जया मोहरून जात असे महेश च्या रचनेने…

त्या दिवशी जयाने घरी आई दादांसोबत, Valentine day साठी जय्यत तयारी केली होती… आज ती महेश ला surprise देणार होती…

तिकडे महेश ची सुद्धा तयारी सुरू होती…
आज तो आईदादांकडे जयाचा हात मागणार होता…

महेश नेहमी आपल्या translation चं काम त्या डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यात, ओढ्याचे खळखळणारे संगीत ऐकत करत असे…

तो त्याच काम करत होता आणि त्याचा बच्चू बाजूला बसून सगळं बघत होता… मध्ये मध्ये महेश शी लडिवाळ ही करीत होता, पण महेश त्याला समजावत होता की आज काम पूर्ण करून त्याला जयाला surprise द्यायचे आहे… ‘मला काम करू दे रे बच्चू!!…
महेश पटपट काम संपवत होता…

अचानक वारा सुटला… आभाळ दाटून आले…
चारी दिशा अंधारून आल्या…
वीजा कडाडू लागल्या…
महेश थोडा घाबरला…
भर दिवसा अंधारून आले हे त्याला कळले नाही… पण बच्चू मात्र महेश च शर्ट ओढून त्याला ओढ्याच्या दूर होण्याचा इशारा करत होता…  त्याचा हात धरून ओढत होता…

इकडे जया सुद्धा अंधारलेल्या दिशांना बघून घाबरली… काहीतरी अघटीत घडणार असं तिचं मन सारखं तिला सांगत होतं…

ती महेशसाठी व्याकुळ होत होती…
तिची चिंता आईलाही कळत होती…
तिने देवाजवळ निरंजन लावली पण वारा एवढा होता की निरंजन विझली तसं दोघींच्याही जीवात चर्रर्रर्रर्रर्रर्र झालं…

जया अनवाणी पायाने भर पावसात धावत सुटली… सरळ त्या डोंगऱ्याच्या वाटेने…
तिच्यामागे दादाही धावत होते, पण ती एवढी पुढे गेली होती की दादांनाही दिसेनाशी झाली…

इकडे महेश ला मात्र निसर्गाने घातलेल्या थैमानाचा अंदाजच येत नव्हता… तो जयाच्या आठवणीत पावसाचा आनंद घेत होता…

बच्चू त्याला सारखा ओढत होता… पण आज महेश कोणाचेच ऐकणाच्या मूड मध्ये नव्हता…
तो जयाच्या प्रेमात होता…
तो जयासाठी आणलेली अंगठी बच्चूला दाखवत म्हणाला, “हे बघ, आवडेल ना जयाला???  तुझी जया आता तुला कधीच दूर करणार नाही !!!

अंगठी हातातून निसटली तशीच हातातून काठीही निसटली… अंगठी शोधतांना महेश चा पाय घसरला आणि तोल जाऊन तो ओढ्यात पडला… पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊ लागला…

कधी नव्हे ते आज ओढ्याचा प्रवाह एवढा होता की सामान्य माणूस त्यात टिकुच शकणार नाही…

जया पोहचली ओढ्याजवळ पण ती महेशला घसरताना बघून स्तब्धच झाली…
मागोमाग दादाही पोहचले…

बच्चूने मात्र हिम्मत दाखवली… महेशच्या मागोमाग ओढ्यात झडप घालून तो महेश ला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करू लागला…

बच्चूने महेशला ओढत ओढत एका खडकांवर आणून ठेवले… महेशच्या डोक्याला मार लागला होता… नाकातोंडात ही पाणी गेले होते…

बच्चू ही थकला होता… त्यालाही बराच मार लागला होता… ठिकठिकाणी खडकांना धडकून त्याच्या अंगावर चिरे पडले होते… महेशच्या पायाशी बसून बच्चू त्याचा पाय चाटत होता…

दादा जयाला घेऊन त्या खडकापर्यंत पोहचले…
महेश ची आणि बच्चू ची अवस्था पाहून जया ला काही सुचेनासे झाले होते…

बच्चूनीं महेशच्या हातून सुटलेली अंगठी आपल्या दातात अडकून ठेवली होती… जयाला बघताच बच्चूनीं ती अंगठी जयाला दिली आणि तिच्या हातात आपले डोके ठेवून तो कायमचा निघून गेला…

जयाने एकच टाहो फोडला आणि ती बेशुद्ध झाली…

जाग आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती…
म म म करत तिने हाताच्या saline काढल्या… आणि हॉस्पिटलमध्ये महेश ला शोधू लागली…

आईने तिला समजावले… महेश ला ज्या रूम मध्ये ठेवले होते तिथे नेले… तिला दुरून महेश दिसल्यावर तिचा जीव भांड्यात पडला…
पण बच्चूसाठी ती पस्तावत होती…

हळूहळू दिवस जाऊ लागले…
जया बरीच सावरली होती पण महेश मात्र कोमात होता…

(आजचा दिवस…)

महेशला जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट केलं होतं…
दादांच आणि डॉक्टर च बोलणं ऐकून जया भानावर आली…

वर्ष होत आलं होतं आता पण महेश ला जयाची आर्त हाक पोहोचतच नव्हती…

आज तोच दिवस होता…
ज्या प्रेमाच्या दिवसाने दोघांची अशी ताटातूट केली, तोच प्रेमाचा दिवस म्हणजे valentine day होता…

बच्चूनीं दिलेली अंगठी जयाच्या हातात होती…
तिनेही  महेशसाठी अंगठी आणली होती…
ती महेशकडे बघत रडत होती…
तिचे मोठेमोठे अश्रू महेशच्या हातावर पडत होते…
महेश च्या बोटांत तिने दादांच्या साक्षीने अंगठी घातली आणि आपल्याही बोटांत बच्चूनीं दिलेली अंगठी घातली… महेशच्या हातात आपला हात देऊन त्या ओंजळीत जयाने आपला चेहरा लपवला… तोच महेशच्या हातांची हालचाल झाली…

ती गोंधळली… परत हालचाल झाली… ती दादांना “म्म्मम्म्मम्म” करू लागली… दादाने डॉक्टरांना आवाज दिला… नर्स आणि डॉक्टर धावत आले…

आईला दादांनी निरोप पाठवला…
आईने देवाजवळ निरंजन लावली आणि महेशची आवडती काजूकतली घेऊन आई हॉस्पिटलमध्ये आली…

महेश कोमातून बाहेर आला…

आईने दोघांनाही काजूकतली चारली…
आणि त्यांना रूममध्ये एकांत देऊन आनंदाने सगळे बाहेर आले…

महेश आणि जया दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली…

महेश चं मन हळुवार गुणगुणू लागलं आणि शब्दांची सांगळ घालू लागला…

” ऋतू प्रेमाचा,साजणी असा बहरला…
मनमोराचा पिसारा फुलविला…
मधुर गाई कोकिळा अन्
तुझ्यामाझ्या मिलनाचा वसंत मोहरला…”

दिप्ती अजमीरे…

Article Categories:
प्रेम

प्रतिक्रिया व्यक्त करा